अन्याय निवारण समिती आघाडीचे उमेदवार एक नगराध्यक्ष व आठ नगरसेवक उमेदवार यादी पत्रकार परिषदेत जाहीर.- लोकांची सेवा हाच आमचा धर्म. – प्रा. सुधीर मुंज
आजरा.- प्रतिनिधी.
आजरा नगरपंचायत निवडणुकीच्या सुरुवात होणार आहे. दि. २१ रोजी माघारची अंतिम तारीख झाली. यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी ६ तर सहा नगरसेवक पदासाठी ५८ अर्ज शिल्लक राहिले.
यामधील अन्याय निवारण समितीचे उमेदवार.
नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. श्रद्धानंद ठाकूर
नगरसेवक पदाचे उमेदवार. पुढील प्रमाणे
प्रभाग क्रमांक २) संजय इंगळे.
प्रभाग ४) जावेद पठाण, प्रभाग ११) डॉ. स्मिता कुंभार, प्रभाग १२) दत्तराज उर्फ गौरव देशपांडे, प्रभाग १३) रवींद्र पालपोलकर, प्रभाग १५) परशुराम बामणे, प्रभाग १६) श्रृती पाटील, प्रभाग १७) आरती मनगुतकर
असे एकूण आठ नगरसेवक पदासाठी व एक नगराध्यक्ष पदासाठी अन्याय निवारण समिती आघाडीचे उमेदवार असल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले.
यावेळी आघाडी बाबत बोलताना प्रा. सुधीर मुंज म्हणाले मागील सत्ताधारी मंडळी यांनी एका व्यक्तीच्या मागे सर्कशी प्रमाणे केला. कर वाडीच्या मुद्द्यात सत्ताधारीतील एक ही नगरसेवक जनतेच्या बाजूने उभारला नाही. कालावधीत संपताना याच मंडळींनी कर वाढीचा कारभार केला होता. आता त्यांना पुन्हा निवडून दिला तर ही वाढीव कर वाढ पुन्हा तुमच्या डोक्यावर बसणार आहे. त्यावेळी हा करवाढीचा निर्णय तमाम आजरेकरांच्या वतीने व अन्याय निवारण समितीच्या पुढाकाराने आणून पाडला . प्रशासनाच्या कारभारात तर काहीच अर्थ नव्हता. नळ पाणी योजनेच्या काळात नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागला. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत असताना रात्रभर जागून पिण्याची पाण्याची व्यवस्था केली. सत्तेचा वाटा मिळवल्याशिवाय, व्यतिरिक्त जनतेसाठी सत्ताधाऱ्यांनी काहीच केले नाही.
यासाठी परिवर्तन करायचा असेल व आपल्याला पुन्हा वाढीव कर लादुन घ्यायचा नसेल आमच्या सर्व उमेदवारांना विजयी करा. असे श्री. प्रा. मुंज म्हणाले
परशुराम बामणे म्हणाले नगरपंचायत चा कालावधी संपल्यानंतर जाता जाता घर फाळा पासपोर्ट वाढवला आजरा शहरातून निघालेला मोर्चाच्या धसक्याने नगरपंचायत प्रशासनाला जुन्या करणे घरफाळा घेणे भाग पडले. दुसरीकडे रामतीर्थ या ठिकाणी सर्वांना तर आकारला जात होता. या ठिकाणी आंदोलन केल्याने आजरा तालुक्यातील नागरिकांना येथील कर घेणे बंद केले. पटेल कॉलनी येथील ग्रामस्थांना मुरुड येथील ग्रामपंचायत चा पाणीपुरवठा मिळत होता. कोणत्याही नगरसेवकाने अडचणीच्या कामासाठी पाच मिनिटे वेळ दिला नाही. २७ कोटीची नळ पाणी योजनेची चौकशी व २० कोटीचा रस्ता, शंभर कोटीची विकास कामे कुठे व कसे केले याची चौकशी लावणार असे श्री बामणे बोलताना म्हणाले.
नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. श्रद्धानंद ठाकूर म्हणाले हे फक्त जनतेची दिशाभूल करणारी मंडळी आहेत. त्यांना विकासाचे काही पडलं नाही. आपला ढपळा पडला ती संपलं, तर यामध्ये काही नगरसेवक ठेकेदार झाले. मनमानी कारभार केला. नळपाणी योजनेच्या काळात कोणत्याही जाती धर्माचा विचार न करता प्रत्येक व्यक्तीला मदत केली त्यावेळी ही मंडळी कुठे गेली होती. सर्वत्र भ्रष्टाचार मांडला आहे. पण आम्ही सत्तेत गेल्यानंतर शंभर कोटीच्या विकास कामाची चौकशी करणार असल्याचे डॉ. श्री ठाकूर म्हणाले.

यावेळी उमेदवार डॉ. स्मिता कुंभार म्हणाल्या. आपल्या या प्रशासनाचा अंदा धुंद कारभाराचा कचऱ्यासाठी व पाण्यासाठी शहरातील महिलांना खूप त्रास झाला. या नगरसेवकांना एक पाण्याचे टँकर भावना झाली नाही. हे सर्व महिला काही विसरलेले नाहीत. खरंतर राजकारण आमचा भाग नव्हे पण आजरा शहरात होत असलेला अन्याय पाहून मी आज उमेदवार म्हणून उभी आहे. आमच्या सर्व भगिनींनी पाणी योजने काळात झालेला त्रास डोळ्यासमोर ठेवावा व तुमच्यावर होत असलेला अन्याय दूर करणाऱ्या निवारण समिती आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा असे आवाहन सौ. कुंभार यांनी केले.

या पत्रकार परिषदेला स्वामी विवेकानंद चेअरमन दयानंद भुसारी, नाथ देसाई, सुधीर कुंभार सह आघाडीचे पदाधिकारी, उमेदवार, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. गौरव देशपांडे यांनी आभार मानले.

