ताराराणी आघाडीच्या उमेदवाराची प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात – अन्य दोन्ही – आघाडीचा अद्यापही निर्णय – आघाडीची घोषणा नाही.? आज संध्याकाळपर्यंत चित्र स्पष्ट.
आजरा.- प्रतिनिधी.

आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी – शिवसेना शिंदे गट पुरस्कृत ताराराणी आघाडीचे उमेदवार छाननी व माघारच्या पूर्वीच जाहीर करण्यात आल्यामुळे आजरा शहरात चर्चा सुरू होती. या आघाडीतील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अशोक चराटी आहेत.
तर दुसरीकडे अन्याय निवारण समिती व भाजपचा दुसरा गट यांचं आमची खरी भाजप असल्याचे मत त्यांनी परवा व्यक्त केले या आघाडीत अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य, भाजपचे जुने कार्यकर्ते पदाधिकारी, प्रा. सुधीर मुंज, अरुण देसाई, नाथ देसाई, सह भाजप व समितीचे पदाधिकारी आहेत. या आघाडीने नगराध्यक्ष पदाचा उमेदवार फक्त जाहीर करण्यात आला. यामध्ये सामाजिक कार्यकर्ते डॉ. श्रद्धानंद ठाकूर यांची नगराध्यक्ष उमेदवारी जाहीर केली परंतु अन्य सतरा उमेदवारांची यादी जाहीर केली नाही.
काँग्रेस, माजी जि प उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी गट, शिवसेना ( उबाठा ) संभाजी पाटील, मुकुंददादा देसाई ( राष्ट्रवादी शरद पवार गट ) अशी आघाडी या आघाडीचे उमेदवार भगवा रक्षक ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांची नगराध्यक्ष पदाची उमेदवारी होणार असल्याची समजते परंतु या आघाडीतील प्रभागातील नगरसेवक यांची यादी किंवा नगराध्यक्षपदाचे नाव अजूनही घोषित केले नाही.

यात तडजोडीच्या राजकारणात ताराराणी आघाडी यांनी चार दिवसापूर्वी आपले नगराध्यक्ष पदासह सर्व उमेदवार जाहीर करून प्रचाराचा मार्ग मोकळा केला आहे. आजरा शहरात प्रत्येक सतरा प्रभागात उमेदवारांचे डिजिटल फलक झळकत आहेत.
ताराराणी आघाडीचे उमेदवार पुढीलप्रमाणे
नगराध्यक्ष : अशोक काशिनाथ चराटी
प्रभाग १ : अश्विनी संजय चव्हाण
प्रभाग २ : पूजा अश्विन डोंगरे
प्रभाग ३ : समीना वसीम खेडेकर
प्रभाग ४ : रशीद महंमद पठाण
प्रभाग ५ : निशात समीर चाँद
प्रभाग ६ : अन्वी अनिरुद्ध केसरकर
प्रभाग ७ : बालिका सचिन कांबळे
प्रभाग ८ : इकबाल इब्राहिम शेख
प्रभाग ९ : यास्मिन कुदरत लतीफ
प्रभाग १० : सिकंदर इस्माईल दरवाजकर
प्रभाग ११ : गीता संजय सावंत
प्रभाग १२ : अनिकेत अशोक चराटी
प्रभाग १३ : परेश कृष्णाजी पोतदार
प्रभाग १४ : सिद्धेश विलास नाईक
प्रभाग १५ : शैलेश नारायण सावंत
प्रभाग १६ : आसावरी महेश खेडेकर
प्रभाग १७ : पूनम किरण लिचम
आज माघारीचा दिवस आहे. अन्याय निवारण समितीने दोन दिवसात आपले १७ प्रभागातील उमेदवार जाहीर करणार असल्याचे सांगितले होते. तर आज रोजी महाविकास आघाडीतील काही घटक पक्षांची अन्य काही गट सोबत घेऊन होणारी आघाडी यांचे चित्र व उमेदवारी सह नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे.
