Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रजात प्रमाणपत्राच्या फसव्या वापराबाबत कायदेशीर कारवाई करा .- संविधान संवर्धन चळवळगडहिंग्लज.

जात प्रमाणपत्राच्या फसव्या वापराबाबत कायदेशीर कारवाई करा .- संविधान संवर्धन चळवळगडहिंग्लज.

जात प्रमाणपत्राच्या फसव्या वापराबाबत कायदेशीर कारवाई करा .- संविधान संवर्धन चळवळ
गडहिंग्लज.

गडहिंग्लज.- प्रतिनिधी.

जात प्रमाणपत्राच्या फसव्या वापराबाबत कायदेशीर तात्काळ कारवाईसाठी संविधान संवर्धन चळवळीच्या वतीने आंदोलनाचे निवेदन उपविभागीय अधिकारी गडहिंग्लज यांना संविधान संवर्धन चळवळ यांच्या वतीने देण्यात आले आहे. यावेळी उपविभागीय अधिकारी यांच्याबरोबर चर्चा करण्यात आली आणि त्यांना ओबीसी दाखला व एस सी चा दाखला नेमका दाखला खरा कोणता याबाबतीत विचारण्यात आले.
संविधान संवर्धन चळवळीचा मुद्दा असा आहे. की दोन्ही आघाड्या यांनी जातीय कार्ड खेळून गडहिंग्लज शहराचे वातावरण जातीवादी केलेले आहे त्याला जबाबदार या दोन्ही आघाड्या आहेत.
चुकीचे दाखले काढून एसी चा फायदा घेणाऱ्यांना उमेदवारी देऊन दोन्ही आघाड्यांनी जातीयवादी भूमिका घेतली आहे. त्याचा निषेध करण्यात आला.
यावेळी चर्चेमध्ये संग्राम सावंत, विनोद बिलावर, रामदास कुराडे, प्रकाश कांबळे, दिगंबर विटेकरी यांनी भाग घेतला होता. यावेळी अविनाश ताशिलदार, प्रभात साबळे, रवी चौगुले, मलगोंडा पाटील, बाळासाहेब वडर, विश्वास पाटील, वसंत शेटके, दत्तात्रय कांबळे, अमोल कोरवी, कृष्णा कांबळे, महेश बादामी, अरुण बिलावर, सचिन बिलावर, गौतम बिलावर, राजू बिलावर, अभिजीत बिलावर, शुभम कांबळे, चंद्रशेखर सावरे, केतन श्रीखंडे व इतर सर्व कार्यकर्ते व लोक उपस्थित होते.

चौकट.

गंगाधर राजशेबर हिरमेठ यांनी सन २०१६ मधील गडहिंग्लज नगरपरिषदेच्या निवडणकुकीकरिता स्वतःला “जंगम” जातीत, इतर मागासवर्ग प्रवर्ग OBC मध्ये समाविष्ट असल्याचे दर्शवणारे जात प्रमाणपत्र सादर केले होते. हे जात प्रमाणपत्र ७३८/२०१६ दि. २७/१०/२०१६ रोजी मा.उपविभागीय अधिकारी, गडहिंग्लज यांच्याकडून जारी करण्यात आले होते.
आता ते अनुसूचित जाती (SC) हा जातीचा दाखला. उपविभागीय अधिकारी, गडहिंग्लज यांच्या कडून घेऊन निवडणूक नगराध्यक्ष पदासाठी लढवत आहेत.त्यांचा अनुसूचित जातीचा दाखला कायमचा रद्द करून‌. त्यांना निवडणुकीत त्यांचा अर्ज व दाखला अवैध ठरवावा.एकाच व्यक्तीने पूर्वी OBC प्रमाणपत्र आणि आता बेडा जंगम (SC) प्रमाणपत्र मिळवल्याबाबत तक्रार व संबंधित व्यक्ती विरोधात कायदेशीर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कारवाई ताबडतोब करण्यात यावी.सदर व्यक्तीच्या दोन्ही प्रमाणपत्रांची तात्काळ तपासणी करावी व अमान्य घोषित करावेत तसेच आता ते अनुसूचित जाती(SC) हा जातीचा दाखला उपविभागीय अधिकारी, गडहिंग्लज यांच्या कडून घेऊन निवडणूक नगराध्यक्ष पदासाठी लढवत आहेत. त्यांचा अनुसूचित जातीचा दाखला कायमचा रद्द करून‌. त्यांना निवडणुकीत त्यांचा अर्ज व दाखला अवैध ठरवावा. तसेच खोटे प्रमाणपत्र जप्त आणि रद्द करण्यात यावे.ज्या अधिकाऱ्यांनी इतर मागासवर्ग ओबीसी (OBC) किंवा Other Backward Classes (इतर मागासवर्ग) व अनुसूचित जातीचा(SC) दाखला दिला.त्यांच्यावर फसवणुकीसाठी गुन्हेगारी कारवाई सुरू करावी (IPC कलम 465, 468, 471 अंतर्गत FIR दाखल करावी).प्रमाणपत्र जारी करणाऱ्या त्या सर्व अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. जर एखादी व्यक्ती SC/ST/OBC इत्यादी जातीला नसताना फसव्या प्रमाणपत्र मिळवली असेल, तर पडताळणी समिती (Scrutiny Committee) या अगोदर आलेल्या तक्रारीवरून आणि आता माझ्या तक्रारीची नोंद घेऊन.नोंदी मागवून ताबडतोब चौकशी करण्यात यावी.चौकशीत फसवणूक आढळल्यास, सुनावणी घेऊन प्रमाणपत्र रद्द आणि जप्त करण्यात यावे. या सर्वांची सखोल चौकशी करून श्री.राजशेबर हिरमेठ, गडहिंग्लज यांच्या कुटुंबातील ज्यांनी ज्यांनी खोट्या प्रमाणपत्रावर मिळवलेले फायदे मागे घेण्यात यावेत.खोट्या प्रमाणपत्रावर मिळवलेले फायदे निवडणूक जिंकणे, नोकरी, शिष्यवृत्ती तसेच निवडणूक जिंकल्यास सदस्यत्व रद्द करण्यात यावेत.शिष्यवृत्ती किंवा इतर रक्कम जमीन महसूलासारखी वसूल केली जावी. नोकरी,डिग्री, व डिप्लोमा रद्द करण्यात आले पाहिजे.विजयालक्ष्मी राजशेखर हिरेमठ यांनी नोकरी मिळविण्यासाठी जोडलेल्या जातीच्या दाखल्याची व जाती प्रमाणपत्र आणि जात वैधता caste validity प्रमाणपत्राची सखोल चौकशी करून,त्या दोषी आढळल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात यावी. त्यांनी आतापर्यंत घेतलेल्या लाभची वसुली करून त्यांची प्रमाणपत्र रद्द करण्यात यावेत. जर तक्रारीची चौकशी ताबडतोब दखल घेऊन पूर्ण करावी व अहवाल ताबडतोब मिळावा.आपण ताबडतोब कारवाई व अंमलबजावणी करावी. अन्यथा उपविभागीय अधिकारीसो, गडहिंग्लज यांच्या कार्यालयासमोर येत्या ३० दिवसात संविधान संवर्धन चळवळीच्या वतीने बेमुदत ठिय्या आंदोलन करणार आहोत.असा इशारा देण्यात आला आहे.
मुख्य संघटक संविधान संवर्धन चळवळ संग्राम सावंत, विनोद बिलावर, रामदास कुराडे, प्रकाश कांबळे, दिगंबर विटेकरी व संविधान संवर्धन चळवळ व गडहिंग्लज नागरिक यांनी सहभाग घेतला.‌

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.