आजरा. प्रतिनिधी. १९
आजरा येथे श्रमिक मुक्ती दल, लोकशाही वादी व आनंदवन संयुक्त विद्यमानाने धान्य साहित्य किट वाटप करण्यात आले.
एक हात मदतीचा कोविड १९ च्या महमारी मुळे सगळ्या मानव समूहासमोर मोठे संकट उभे राहिले आहे.
त्यातही समाजातील अत्यंत खालचा वर्गातील, वंचित, उपेक्षित वर्गाचे खुप हाल झाले. रोजगाराच्या सर्वच वाटा बंद झाल्याने रोजच जगन ही अवगड झाले. अशा वंचित,उपेक्षित विधवा,पारितक्टत्या स्रिया, वीट भट्टी, क्रशर वर काम करणारे कामगार याना या महमारी मुळे खुपच आडचणीचा सामना करावा लागला. अशा वेळी त्याना माणुसकीचा एक हात म्हणूण डॉ. बाबा आमटे यानी सुरु केलेल्या आनदवंन या ट्रस्ट अंतर्गत मिशन आंनद सह्योग च्या वतीने रेशन किट वाटप करण्यात आले.
आजरा तालुक्यातील १५ गावातील गरजू २०० कुटुंबांना मदत वाटप करण्यात आली. व्यकटराव हायस्कूल आजरा येथील सभागृहत दि. १९ रोजी झालेल्या या कार्यक्रमासाठी आजरा नायब तहसिलदार कोळी प्रा.गुरव सर,कॉ.अशोक जाधव यांचे सोबत आनदवंचे गोखले दादा व रेनी थॉमस हे सहभागी झाले होते. कार्यक्रम घडवून आणण्यासाठी श्रमिक च्या कॉ.पिळणकर ताई,श्रमिक मुक्ती दल ( लोकशाही वादी ) चे कॉ.संजय तर्डेकर, आशा सेविका युनियन ता.अध्यक्ष मन्दकिनी कोडक, आझर, प्रसाद या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
