Homeकोंकण - ठाणेगुन्ह्यात आरोपीला अटक केल्यावर दोन तासांत संबंधित आरोपीला अटकेची कारणे देणे पोलिसांसाठी...

गुन्ह्यात आरोपीला अटक केल्यावर दोन तासांत संबंधित आरोपीला अटकेची कारणे देणे पोलिसांसाठी बंधनकारक. – न्यायालयाने म्हटले आहे.

गुन्ह्यात आरोपीला अटक केल्यावर दोन तासांत संबंधित आरोपीला अटकेची कारणे देणे पोलिसांसाठी बंधनकारक. – न्यायालयाने म्हटले आहे.

नवी दिल्लीः- वृत्तसंस्था

गुन्हा दाखल झाल्यावर कायद्याबाबत अनभिज्ञ लोक पोलिस अटक करतील म्हणून घाबरून जातात. पण, गुन्ह्यात आरोपीला अटक केल्यावर दोन तासांत संबंधित आरोपीला अटकेची कारणे देणे पोलिसांसाठी बंधनकारक आहे. त्या आरोपीला अटकेची कारणे समजावून सांगितल्याचे न्यायालयात सांगावे लागते. पोलिसांनी हा आदेश पाळला नाही, तर आरोपीची अटक किंवा रिमांड बेकायदा ठरेल, असे स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

अटक करण्यापूर्वी किंवा लगेच नंतर अटकेची कारणे लेखी स्वरूपात अटक केलेल्या व्यक्तीला दिली पाहिजेत जेणेकरून ती अटक अवैध ठरणार नाही. ही कारणे तर्कसंगत वेळेत आणि कोणत्याही परिस्थितीत रिमांड कारवाईसाठी आरोपीला दंडाधिकारी समोर हजर करण्याच्या दोन तास आधी लेखी स्वरूपात दिली गेली पाहिजेत असे न्यायालयाने म्हटले आहे.

न्यायालयाने आपल्या ५२ पानांच्या निकालपत्रात स्पष्टपणे नमूद करताना म्हटले की, घटनात्मक कलम २२ (१) नुसार अटक झालेल्या व्यक्तीला शक्य तितक्या लवकर अटकेची कारणे सांगणे ही केवळ प्रक्रिया नसून व्यक्ती स्वातंत्र्याचे मूलभूत संरक्षण आहे. तसेच आरोपीला अटकेची कारणे शक्य तितक्या लवकर कळवावी तसेच त्याला समजेल अशा भाषेत लेखी स्वरूपात ती असावीत हा त्याचा अधिकार आहे. अटकेची कारणे कळवणे हे आयपीसी १८६० (आता बीएनएस २०२३) अंतर्गत बंधनकारक आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.