विजेच्या धक्क्याने १५ वर्षीय बालकाचा मृत्यू; परिसरात शोककळा.
कोल्हापूर.- प्रतिनिधी.
उंचगाव येथे बुधवारी दि. ५ रोजी सायंकाळी घडलेल्या हृदयद्रावक घटनेत सार्थक निलेश वळकुंजे वर वर्षं १५ या बालकाचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाला.
मंगेश्वर देवालयाच्या मागे तारेवर पंतग अडकला होता.
तो काढण्याच्या प्रयत्नात सार्थकच्या हातातील तारा विद्युत वाहिनीला स्पर्श झाला आणि क्षणातच त्याला विजेचा जबर धक्का बसला.

या भीषण अपघातात सार्थकचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर त्याचा लहान भाऊ विनायक निलेश वळकुंजे हा सुदैवाने वाचला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर संपूर्ण उंचगाव परिसरातील वीजपुरवठा तत्काळ खंडित करण्यात आला.
घटनेची माहिती मिळताच गांधीनगर पोलीस व सी.पी.आर. पोलिस चौकीचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून घटनेची नोंद घेतली.
शवविच्छेदनानंतर रात्री उशिरा सार्थकवर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने उंचगाव व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून नागरिकांनी मुलांनी पतंग खेळताना विद्युत तारेपासून सुरक्षित अंतर राखावे.
