पेन्शन संदर्भात सरकार जनतेची दिशाभूल करीत आहे. – आप्पा कुलकर्णी पेन्शन संघटना जिल्हा सचिव.
आजरा.- प्रतिनिधी.
राज्यातील ८० लाख कर्मचाऱ्यांना पेन्शन वाढीचा लाभ देणार असल्याचे आश्वासन सरकारने दिलेत असे सोशल मीडिया व्हाट्सअप गृप मार्फत पसरवत शासन जनतेची दिशाभूल करीत असलेचे मत आजरा येथील गिरणीकामगार कार्यालयामध्ये आयोजित सभेत बोलताना व्यक्त केले.
अध्यक्षस्थानी काँ. शांताराम पाटील होते. कुलकर्णी यांनी पुढे बोलताना शासनाने एपीएस प्रमाणे पेन्शन द्यावी. यासाठी सातत्याने लढा सुरु असून ११ नोव्हेंबर रोजी मुंबई व ९ डिसेंबर रोजी दिल्ली येथे होणाऱ्या मोर्चात सामिल होण्याचे आवाहन केले. तसेच
काँ. धोडिंबा कुंभार यानी लढल्या शिवाय काहीच मिळत नाही. मुबंईत मोफत घरे घेतल्या शिवाय चळवळ थांबवाची नाही. संघटणेत विचारा बरोबर डोकी किती आहेत.

याला जास्त महत्व असलेचे सांगितलं. शांताराम पाटील यानी सेलो वांगणीची घरे लागल्याचे सांगून गिरणी कामगारांची दिशाभूल केली जात असून मुंबईत घर आणी ९ हजार पेन्शन मिळालीच पाहिजे असे मत व्यक्त केले. यावेळी नारायण राणे, निवृती मिसाळ, रघुनाथ कातकर, विठ्ठल बामणे, मनपा बोलके, अनिता बागवे, विद्या मस्कर, केरूबाई शिंदे, सुरेखा बागवे याच्यासह गिरणीकामगार वारसदार उपस्थित होते. आभार संजय घाटगे यांनी मानले.
