Homeकोंकण - ठाणेनिंगुडगे येथील वारकरी महिलेचा रस्ता ओलांडताना अपघातात दुर्देवी मृत्यू..🛑नगरपालिका / नगरपंचायत निवडणूक...

निंगुडगे येथील वारकरी महिलेचा रस्ता ओलांडताना अपघातात दुर्देवी मृत्यू..🛑नगरपालिका / नगरपंचायत निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांसाठी खर्च मर्यादा.- उमेदवारांसाठी महत्त्वाचं अपडेट👇

🛑निंगुडगे येथील वारकरी महिलेचा रस्ता ओलांडताना अपघातात दुर्देवी मृत्यू..
🛑नगरपालिका / नगरपंचायत निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांसाठी खर्च मर्यादा.👇

निंगुडगे येथील वारकरी महिलेचा रस्ता ओलांडताना अपघातात दुर्देवी मृत्यू..

आजरा (प्रतिनिधी )

निंगुडगे ( ता. आजरा ) येथील विठ्ठल दर्शनासाठी गेलेल्या वारकरी महिला सौ.इंदुबाई भिकाजी परीट (वय 70)यांचा वारीवरून परत येत असताना रस्ता ओलंडताना अज्ञात वाहनाने ठोकरल्याने मृत्यू झाला. याबाबत अधिक माहिती अशी, शुक्रवारी दि. 31 रोजी गावातील वारकरी मंडळी कार्तिक वारीला क्रूझर वाहनाने पंढरपूर येथे गेले होते, रविवारी विठ्ठलाचे दर्शन घेतले, सोमवारी गावी परत येत असताना सोलापुर जवळ फळे खरेदीसाठी व चहापाणी घेण्यासाठी गाडी थांबली होती, त्यावेळी रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाने ठोकरल्याने गंभीर जखमी झाल्या, दवाखान्यात नेल्यावर उपचारपूर्वी त्यांचे दुर्दैवी मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी निंगुडगे त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात आला. त्यांच्या पश्यात पती, मुलगा, विवाहित दोन मुली, सून नातवंडे असा परिवार आहे, त्यांच्या मृत्यूने निगुडगे गावात शोककळा पसरली..

🛑नगरपालिका / नगरपंचायत निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांसाठी खर्च मर्यादा.👇

मुंबई – प्रतिनिधी

निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी
नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांसाठी खर्च मर्यादा वाढवण्यात आली आहे. त्यानुसार अ वर्ग नगरपालिकांच्या अध्यक्षपदासाठी १५ लाखांची मर्यादा देण्यात आली आहे. तर क वर्ग नगरपालिकांसाठी सदस्यांसाठी ७ लाख रुपये खर्च करण्याची मर्यादा ठरवण्यात आली आहे. मतदारांच्या सोयीसाठी नवीन अँप देखील आणण्यात आले आहे. दुबार मतदाराबाबत राज्य निवडणूक आयोगाने दखल घेतली आहे. दुबार मतदारच्या समोर डबल स्टार आलेलं आहे. तो मतदार कुठल्या मतदार केंद्रात मतदान करेल याची माहिती मिळणार आहे अशी माहिती निवडणूक आयोगानं दिली आहे.

ज्या मतदाराच्या नावावर डबल स्टार असेल त्याच्याकडून कुठे मतदान केले याबाबबतची माहिती घेतली जाणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. दरम्यान, पहिल्या टप्प्यात नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका घेण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक आयोदाने दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.