Homeकोंकण - ठाणेमहारष्ट्र लोकसेवा आयोगाच्या(MPSC) राज्यसेवा परीक्षेत मयुर माधुरी संजय पोवार यांची अधिकारी म्हणून...

महारष्ट्र लोकसेवा आयोगाच्या(MPSC) राज्यसेवा परीक्षेत मयुर माधुरी संजय पोवार यांची अधिकारी म्हणून निवड.🛑जिल्ह्याचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी.- संतोष जोशी अध्यक्षतेखाली आजरा पंचायत समितीत आढावा. बैठक🛑आजरा नगरपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर.

🛑महारष्ट्र लोकसेवा आयोगाच्या(MPSC) राज्यसेवा परीक्षेत मयुर माधुरी संजय पोवार यांची अधिकारी म्हणून निवड.
🛑जिल्ह्याचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी.- संतोष जोशी अध्यक्षतेखाली आजरा पंचायत समितीत आढावा. बैठक
🛑आजरा नगरपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर.

🟣महारष्ट्र लोकसेवा आयोगाच्या(MPSC) राज्यसेवा परीक्षेत मयुर माधुरी संजय पोवार यांची अधिकारी म्हणून निवड.

आजरा.- प्रतिनिधी

उत्तुर ता. आजरा येथील मयुर माधुरी संजय पोवार यांची नुकत्याच झालेल्या महारष्ट्र लोकसेवा आयोगाच्या(MPSC) राज्यसेवा परीक्षा 2024 मधून राजपत्रित(Gazetted) अधिकारी म्हणून निवड झाली. S C प्रवर्गातून त्यांनी राज्यातून 23 वा क्रमांक मिळवला.त्यांनी शासकीय कृषी महाविद्यालय कोल्हापूर येथून MSc.Agri पूर्ण केली आहे. उत्तूर येथील नामांकित वकील ॲड संजय रामचंद्र पोवार यांचे ते सुपुत्र आहेत. मयूर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

🛑जिल्ह्याचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी.- संतोष जोशी अध्यक्षतेखाली आजरा पंचायत समितीत आढावा. बैठक

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा येथील पंचायत समितीत दि. ०४ नोव्हेंबर २०२५ रोजी येथे जिल्ह्याचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जि.प. कोल्हापूर संतोष जोशी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कोल्हापूर विभागाचे राजाराम लांबोरे सहा. प्रकल्प अधिकारी, उमेश चव्हाण विस्तार अधिकारी जिल्हापरिषद, अजित खताळ सहा. गट विकास अधिकारी रो.ह.यो. हे उपस्थित होते.

पंचायत समिती आजराचे गट विकास अधिकारी सुभाष सावंत, विस्तार अधिकारी सर्व पालक अधिकारी, घरकुल कर्मचारी, नरेगा कर्मचारी, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामरोजगार सेवक यांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. यामध्ये आजरा तालुक्याला सन २०२४-२५ ते २०२५-२६ मधील एकूण १९७२ इतके उदिष्ट असून त्यापैकी १०१ घरकुले सध्या पूर्ण झाले आहेत. उर्वरित पैकी ७७२ घरकुले पाया व चौकट ला असून १०९९ घरकुले तत्काळ सुरु करून ३१/१२/२०२५ अखेर पूर्ण करून घेण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. या बैठकीमध्ये ३१ डिसेंबर २५ अखेर घरकुल उद्दिष्ट पूर्ण करणे बाबत सूचना देण्यात आल्या.

🛑आजरा नगरपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर.

आजरा.- प्रतिनिधी.

Oplus_131072

मागील ४ वर्षापासून उत्सुकता लागलेल्या आजरा नगरपंचायत निवडणूक कार्यक्रम अखेर लागला असून.- निवडणूक कार्यक्रम पुढील प्रमाणे
आजरा नगरपंचायतीची निवडणूक २ डिसेंबर रोजी
अर्ज दाखल करणे – (ऑनलाईन ) -१० ते १७ नोव्हेंबर
अर्जाची छाननी – १८ नोव्हेंबर
अर्जाची माघार – २१ नोव्हेंबर
प्रत्यक्ष मतदान – २ डिसेंबर
मतमोजणी – ३ डिसेंबर असा कार्यक्रम कार्यक्रम आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.