Homeकोंकण - ठाणेदुबार व बोगस प्रत्येक जि. प. मतदार संघातील.- मतदार यादीच आता निवडणूक...

दुबार व बोगस प्रत्येक जि. प. मतदार संघातील.- मतदार यादीच आता निवडणूक आयोग सक्षम अधिकाऱ्यांकडे सोपवणार‌.- एकाच ठिकाणी मतदान ठेवणार.🛑शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळण्यासाठी भाकपचे निवेदन.

🟣दुबार व बोगस प्रत्येक जि. प. मतदार संघातील.- मतदार यादीच आता निवडणूक आयोग सक्षम अधिकाऱ्यांकडे सोपवणार‌.- एकाच ठिकाणी मतदान ठेवणार.
🛑शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळण्यासाठी भाकपचे निवेदन.

🟣दुबार व बोगस प्रत्येक जि. प. मतदार संघातील.- मतदार यादीच आता निवडणूक आयोग सक्षम अधिकाऱ्यांकडे सोपवणार‌.- एकाच ठिकाणी मतदान ठेवणार.

मुंबई .- प्रतिनिधी

देशभरात दुबार व बोगस
मतदारांबाबत विरोधी पक्षांकडून जोरदार आवाज उठवला जात आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये किती दुबार किंवा त्यापेक्षा जास्त मतदार आहेत. त्याची यादीच आता निवडणूक आयोग सक्षम अधिकाऱ्यांकडे सोपवणार आहे. या अधिकाऱ्यांकडे संबधित मतदारांची खात्री करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

दुबार मतदान होऊ नये यासाठी राज्य निवडणूक आयोगाने सर्व निवडणूक अधिकाऱ्यांना महत्वपूर्ण निर्देश जारी केले आहेत. यात दुबार मतदारांबाबत काय कारवाई करावी याचे निर्देश देण्यात आले आहेत. या आदेशात म्हटले आहे की, दुबार मतदारांच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर ‘दुबार किंवा त्यापेक्षा मतदार’ असलेली यादीच तपशीलवारपणे सादर केली जाणार आहे. या यादीची तपासणी संबधित अधिकाऱ्यांनी करावयाची आहे. तसेच प्रत्येक दुबार मतदाराला नोटीस पाठवून एका पेक्षा अधिक गट किंवा गणामध्ये नाव नोंदले असेल तर, त्यातील एकच गट किंवा गण कायम ठेवण्याबाबतचे हमीपत्र त्या मतदाराकडून घ्यावयाचे आहे.
जर एकापेक्षा जास्त ठिकाणी नाव असलेला मतदार एकच व्यक्ती असल्याची खात्री पटली, तर विहित नमुन्यात अर्ज घेऊन तो नेमका कोणत्या प्रभागात, जिल्हा परिषद विभागात किंवा पंचायत समिती गणात मतदान करणार आहे, हे निश्चित करावे. प्राधिकृत अधिकाऱ्याची खात्री पटल्यानंतर मतदाराला त्याच्या इच्छेनुसार मतदान केंद्र निश्चित करता येईल आणि फक्त त्या केंद्रातच त्याला मतदानाचा अधिकार असेल, अशा दुबार मतदाराच्या इतर प्रभाग, विभाग किंवा गणातील नावांसमोर ‘दुबार मतदार’ ही नोंद करताना, त्याने निवडलेल्या मतदान केंद्राचे नाव, क्रमांक आणि मतदाराचा अनुक्रमांक नमूद करण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. अशा मतदाराला अन्य कोणत्याही ठिकाणी मतदान करता येणार नाही, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.
मतदान केंद्रावर असा दुबार मतदार मतदान करण्यासाठी आल्यास, त्याने इतर कोणत्याही केंद्रावर मतदान केले नसल्याबाबत विहित नमुन्यात हमीपत्र लिहून द्यावे लागेल.

मतदान केंद्राध्यक्षांनी मतदाराची ओळख काटेकोरपणे पटवून घेऊन फक्त एकाच ठिकाणी मतदानाची संधी द्यावी. या सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत.

🛑शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळण्यासाठी भाकपचे निवेदन.

आजरा.- प्रतिनिधी.

भारतीय कम्यूनिष्ट पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी यासाठी आजरा तहसिलदार समिर माने याना निवेदन देण्यात आले. निवेदनात सततच्या पावसामुळे सर्व पिकाचे अतोनात नुकसान झाले असून पक्व पिके ही काढणे मुस्किल झाले आहे. सोयाबीन भुईमूग भात आणी ऊस उतारा कमी झाला असल्यामुळे शेतकरी कर्जाच्या चकरात अडकला आहे. यासाठी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करावी अशी मागणी केली आहे. या निवेदनावर काँ. शांताराम पाटील, काँ. धोंडिबा कुंभार संजय घाटगे, नारायण राणे शांताराम हरेर, मनपा बोलके, सुनिल कडाकणे, विठ्ठल बामणे गणपती ढोणूक्षे हिदूंराव कांबळे याच्या सह भाकपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.