Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रलाडक्या बहिणींना २१०० देण्याचे वचन पूर्ण करणार..-मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन.- संस्थेचे...

लाडक्या बहिणींना २१०० देण्याचे वचन पूर्ण करणार..-मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन.- संस्थेचे उद्घाटन सोहळा संपन्न.🟣आजरा शहरातील क्रीडा संकुलाची इमारत खेळाडूंसाठी खुली करावी. व मैदानाच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी. – शिवसेना उबाठाची मागणी.

🟣लाडक्या बहिणींना २१०० देण्याचे वचन पूर्ण करणार..-
मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन.- संस्थेचे उद्घाटन सोहळा संपन्न.
🟣आजरा शहरातील क्रीडा संकुलाची इमारत खेळाडूंसाठी खुली करावी. व मैदानाच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी. – शिवसेना उबाठाची मागणी.

🟣लाडक्या बहिणींना २१०० देण्याचे वचन पूर्ण करणार..-
मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन.- आंबा येथे संस्थेचे उद्घाटन सोहळा संपन्न.

आंबा : – प्रतिनिधी.

लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचे अभिवचन महायुती सरकार पूर्ण करेल, असा विश्वास वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. येथील कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ए. टी. एम. सेवा व आंबा विकास सेवा संस्था कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.

उदय साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष मानसिंगराव गायकवाड अध्यक्षस्थानी होते.
मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते ए. टी. एम. सेवेचे, तर सेवा संस्था कार्यालयाचे उद्घाटन माजी खासदार निवेदिता माने यांच्या हस्ते झाले. यावेळी लाभांश वाटप करण्यात आला.

मानसिंगराव गायकवाड म्हणाले, जंगली प्राण्यांच्या त्रासामुळे शेतकऱ्यांनी येथे शेती करणे बंद केले आहे. प्राण्यांकडून होणाऱ्या नुकसानीबाबत धोरणात्मक निर्णय व तालुक्याच्या विकासासाठी पक्षाकडून निधी मिळावा.

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ए.टी.एम. सेवा व सेवा कार्यालयाचे उद्घाटन कार्यक्रमात हसन मुश्रीफ यांनी मनोगत व्यक्त केले.
बँकेचे संचालक रणवीर गायकवाड यांनी येथील पर्यटन विकासासाठी निधी मिळावा, अशी मागणी केली.

यावेळी डी. जे. लांबोर, सोसायटी अध्यक्ष अनिल वायकूळ, नीलेश कामेरकर, प्रकाश कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले.

सरपंच समता वायकूळ यांनी स्वागत केले. यावेळी संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, सुधीर देसाई, संतोष पाटील, श्रुतिक काटकर, स्मिता गवळी, कारखान्याचे उपाध्यक्ष गणीभाई ताम्हणकर, हंबीरराव पाटील, महादेव पाटील, मुख कार्यकारी अधिकारी जी. एम. शिंदे लक्ष्मण कांबळे आदी उपस्थित होते.

🟣आजरा शहरातील क्रीडा संकुलाची इमारत खेळाडूंसाठी खुली करावी. व मैदानाच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी. – शिवसेना उबाठाची मागणी

आजरा.- प्रतिनिधी

आजरा शहरातील क्रीडा संकुलाची इमारत खेळाडूंसाठी खुली करावी. व मैदानाच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करणेबाबत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आजरा पोलीस स्टेशन यांना निवेदन देण्यात आले आहे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. आजरा शहरात गेली ५ वर्ष आजरा गांधीनगर येथे क्रीडा संकुलाचे काम चालू आहे.

यामध्ये क्रीडा संकुलाची इमारत पूर्ण होऊन २ वर्ष झाली तरी ही इमारत क्रीडा विभागाने खेळाडूंसाठी खुली केलेली नाही. आजरा तालुक्यातील खेळाडू वेगवेगळ्या खेळात जिल्हा पातळीवर तसेच राज्य पातळीवर क्रीडा क्षेत्रात यश मिळवत आहेत. तर दुसरीकडे क्रीडा संकुलाची इमारत धुळखात पडलेली आहे. निवेदन देऊनही क्रीडा अधिकारी कोल्हापूर यांनी कोणताही कर्मचारी नेमणूक केलेली नाही. त्याच बरोबर मैदानाच्या कामासाठी ५ कोटी रुपये खर्च केलेला असून अद्यापही मैदान किंवा धाव पट्टी पूर्ण झालेली नाही. उलट या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला जाजेशवी यासाठी शिवसेना आजरा तालुक्याच्या वतीने क्रीडा संकुल गांधीनगर येथे शुक्रवार दि.०७/११/२०२५ आहे. या सर्व प्रकारची चौकशी सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी करून संबंधीतावर कडक कार्यवाही करावी. असे निवेदनात म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.