वृक्षतोड व बेकायदेशीर लाकूड वाहतूक प्रकरणी.- परिमंडळ वनअधिकारी चंदगड यांची धडक कारवाई.
चंदगड.- प्रतिनिधी.
बेकायदेशीर वृक्षतोड व लाकूड वाहतूक प्रकरणी.परिमंडळ वनअधिकारी चंदगड यांची धडक कारवाई दिली असले बाबत प्रसिद्धी पत्र काढण्यात आले आहे. दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. वनपरिक्षेत्र चंदगड कडील वनपाल चंदगड यांना एक गुप्त बातमी मिळाली त्यानुसा त्यांनी आपले अधिपत्याखालील कर्मचाऱ्यांना समवेत घेवुन नागणवाडी वाळकोळी – गंर्धवगड रस्त्याने गस्त घालत असता मौजे. वाळकोळी गावचे हद्दीतील मौ. वाळकोळी फाट्या नजिक ट्रॅक्टर क्र. MH०९GM५०८४ व विना क्रमांकाची पिवळ्या रंगाची ट्रॉली मधुन इंजायली इमारती लाकुड माल नग २३/५.२३८ घ.मी. वाहतुक करीत असताना मिळुन आला.

मोक्यावर ट्रॅक्टर चालक तुफेल इकबाल कदीम, रा डोणेवाडी व लाकुड खरेदीदार अजरुद्दीन रजाक सय्यद रा.नेसरी यांना सदर लाकुड माल वाहतुकीसाठी व झाडेतोडीसाठी परवाना घेतला किंवा कसे या बाबत विचारणा केली असता त्यांनी कोणत्याही प्रकारचा पास परवाना मोक्यावर दाखवला नाही. त्यानुसार भारतीय वन अधिनियम १९२७ व महाराष्ट्र वन नियमावली २०१४ मधील तरतुदीनुसार ट्रॅक्टर क्र. MH ०९ GM ५०८४ व विना क्रमांकाची पिवळ्या रंगाची ट्रॉली व त्या मधील इंजायली इमारती लाकुड माल नग २३/५.२३८ घ.मी. जप्त करुन ताब्यात घेतले.
जप्त मुद्देमाल –
१. ट्रॅक्टर-१ (MH०९GM५०८४)
अंदाजे किंमत-२०००००/-
२. विना क्रमांकाची पिवळ्या रंगाची ट्रॉली -१
अंदाजे किंमत-५००००/-
३. इंजायली इमारती लाकुड माल नग २३/५.२३८ घ.मी.
अंदाजे किंमत-३३६४३/-
एकुण.- २८३६४३/-
तुफेल इकबाल कदीम, रा डोणेवाडी व लाकुड खरेदीदार अजरुद्दीन रजाक सय्यद रा. नेसरी यानी विनापरवाना लाकूड मालाची वहातूक केलेने त्याचे विरुध्द वनविभागाचे वनरक्षक सागर कोळी यांनी आपले कडील प्र.गु.रि.नं.टी.०३/२०२५ दि.०२/११/२०२५ चा वनगुन्हा नोंद केला आहे. प्रकरणी सदर गुन्ह्याचा पुढील तपास श्री.तु.र. गायकवाड, वनक्षेत्रपाल चंदगड व श्री.के.एस. डेळेकर, वनपाल चंदगड हे करत आहेत.
सदरची कार्यवाही धैयशिल पाटील (उपवनसंरक्षक, कोल्हापुर वनविभाग कोल्हापुर), विलास काळे (सहा. वनसंरक्षक, कोल्हापुर वनविभाग कोल्हापुर), तु.र. गायकवाड, (वनक्षेत्रपाल चंदगड) यांचे मार्गदर्शनाखाली के. एस. डेळेकर, (वनपाल चंदगड), सागर कोळी, (वनरक्षक चंदगड) व नितीन नाईक, सचिन कांबळे व आकाश गडकरी (वनसेवक) आदींनी केली.
तरी नागरीकांना आव्हान करणेत येते कि अवैध वृक्षतोड, अवैध वाहतुक अवैध शिकार, अवैध अतिक्रमण, जंगल क्षेत्रात वनवणवा याच माहिती मिळताच नजिकचे वनविभागाचे कार्यालयाशी संपर्क साधावा तसेच वनविभागाचे टोल फ्रि क्रमांक १९२६ वर तात्काळ माहिती देवुन सहकार्य करावे आपले नाव गोपणीय ठेवण्यात येईल. असे परिमंडळ वनअधिकारी चंदगड यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.




