आजरा अर्बन बँकेकडे दीपावली पाडव्यानिमित्त ९ कोटी ५४ लाखाच्या ठेवी जमा.
आजरा.- प्रतिनिधी.
दि आजरा अर्बन को-ऑप. बँक लि., आजरा (मल्टी-स्टेट) या बँकेकडे दीपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर एका दिवसात १२५८ नवीन खाती उघडून तब्बल ९ कोटी ५४ लाख रुपयांच्या ठेवी जमा झाल्या आहेत.
ग्रामीण भागात स्थापन झालेल्या व शहरी भागातही शाखा असणाऱ्या बँकेवर आजही सभासद, ठेवीदार व हितचिंतकांच्या दृढ विश्वासामुळे ग्राहकांनी बँकेकडे मोठ्या प्रमाणात ठेवी ठेवल्या आहेत.
सध्या बँकेकडे १०८२ कोटी ०२ लाख रूपयाच्या ठेवी व ६७७ कोटी ०४ लाख रुपयाची कर्जे असून एकूण मिश्र व्यवसाय १७८९ कोटी ०६ लाख इतका झाला आहे.
त्याबाबत बँकेचे चेअरमन व अण्णा भाऊ संस्था समुहाचे प्रमुख अशोकअण्णा चराटीसो, व्हा. चेअरमन संजय चव्हाण व संचालक मंडळ यांनी सर्व ठेवीदार, सभासद व हितचिंतक यांचे आभार मानले.
🌹 सर्वांना बँकेच्या वतीने दीपावली पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.
बँकेने केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध अनुदानाच्या योजना राबविल्या असून आधुनिक अशा FCO कार्य प्रणालीच्या माध्यमातून बँकेत सेव्हिंग खाती उघडण्याची सुविधा आहे.
केंद्र शासनाची PMFME (सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग) व PMEGP व राज्य शासनाची अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना, मोबाईल बँकिंग, IOS application, Google Pay, PhonePe, Paytm, QR Code तसेच Whatsapp Banking च्या माध्यमातून सर्व ग्राहकांना आपल्या बँकेतील त्यांच्या सर्व खात्यांचे statement पाहणे, चेक बुक रिक्वेस्ट देणे, खाते ब्लॉक करणे इ. सुविधा उपलब्ध आहेत याचा फायदा ग्राहकांनी घ्यावा.
असे मत अण्णा भाऊ संस्था समूह प्रमुख व बँकेचे चेअरमन अशोक चराटी यांनी व्यक्त केले.

