Homeकोंकण - ठाणेराज्याच्या महसूल विभागातील ४७ अधिकाऱ्यांना बढत्या.- महाराष्ट्राला ४७ नवे अपर जिल्हाधिकारी..👇🛑उत्सुक उमेदवारांची...

राज्याच्या महसूल विभागातील ४७ अधिकाऱ्यांना बढत्या.- महाराष्ट्राला ४७ नवे अपर जिल्हाधिकारी..👇🛑उत्सुक उमेदवारांची दिवाळी नेत्यांच्या दारी..- आजरा – गड – चंदगड – उमेदवार लगबगीत

🛑राज्याच्या महसूल विभागातील ४७ अधिकाऱ्यांना बढत्या.- महाराष्ट्राला ४७ नवे अपर जिल्हाधिकारी..👇
🛑उत्सुक उमेदवारांची दिवाळी नेत्यांच्या दारी..- आजरा – गड – चंदगड – उमेदवार लगबगीत

🛑राज्याच्या महसूल विभागातील ४७ अधिकाऱ्यांना बढत्या.- महाराष्ट्राला ४७ नवे अपर जिल्हाधिकारी..👇

मुंबई :- प्रतिनिधी.

राज्याच्या महसूल विभागातील ४७ अधिकाऱ्यांना बढत्या देण्यात आल्या आहेत. त्यानुसार, महाराष्ट्राला ४७ नवे अपर जिल्हाधिकारी मिळाले आहेत. तब्बल गेल्या १० वर्षांपासून अधिकाऱ्यांच्या बढत्या रखडल्या होत्या. ऐन दिवाळीच्या पहिल्याच दिवशी राज्य सरकारकडून आज शासन आदेश जारी करत अधिकाऱ्यांना दिवाळी भेट देण्यात आली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल अधिकाऱ्यांना पदोन्नतीची दिवाळी भेट दिली आहे.

तत्पूर्वी काल मंत्रालयातील दालनात जाऊन बावनकुळे यांनी राज्यातील सर्वच जिल्ह्यातील महसूल अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरेन्सिंगद्वारे संवाद साधला.

सामान्य प्रशासन 15 ऑक्टोबर रोजीच्या इतिवृत्तान्वये, आस्थापना मंडळ (क्रमांक 2) यांनी अपर जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांची अपर जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) या पदोन्नतीच्या पदाची पात्रपात्रता तपासून निवडसूची वर्ष 2025-26 मध्ये अपर जिल्हाधिकारी (गट-अ) (वेतनश्रेणी एस २५-१ ७८,८००- २,०९,२००/-) या संवर्गातील पात्र अधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) (गट-अ) (वेतनश्रेणी एस २७-११,२३,१००-२,१५,९००/-) या संवर्गात नियमित पदोन्नती कोट्यातील रिक्त पदांवर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती देण्याबाबत शिफारस करण्यात आलेली आहे.

असे शासन आदेशात म्हटलं आहे. दरम्यान, महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१ मधील नियम ६३ (६) (३) मधील तरतुदनुसार पदोन्नत अधिकारी ३० दिवसांचे आत रूजू न झाल्यास सदरचे अधिकारी महाराष्ट्रनागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम १९७९ मधील तरतुदीनुसार शिस्तभंग विषयक कारवाईस पात्र राहतील. १५. उपरोक्त पदोन्नत अधिकाऱ्यांना कळविण्यात येते की, नवीन नियुक्तीच्या ठिकाणी रूजू झाल्याबाबतचा अहवाल revenue@maharashtra.gov.in या ई-मेलव्दारे/टपालाव्दारे शासनास त्वरीत कळवावे, असेही आदेशात म्हटले आहे.

🛑उमेदवारांची दिवाळी उमेदवारी मिळण्याच्या जोडणीत नेत्यांच्या दारी..- आजरा गडहिंग्लज चंदगड तालुक्यातील स्थानिक कार्यकर्ते उमेदवारीच्या जोडणीत.

विभागीय.- प्रतिनिधी

आजरा – जिल्हा परिषद व पंचायत समिती नगरपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजताच आजरा तालुक्यात उमेदवारीसाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. मलाच उमेदवारी मिळाली पाहिजेत या धावपळीत दिवाळी सण विसरून खाजगी बैठका आणि नेत्यांना दिवाळी करू देईनात. अशा जोडण्याची लगबग सुरू आहे.

विविध पक्षांत तिकीट वाटपाची चढाओढ रंगात आली असून, गट-तटांमधील रस्सीखेच प्रकर्षाने जाणवू लागली आहे.अनेक इच्छुकांनी आपल्या समर्थकांसह पक्षात जोरदार मोर्चेबांधणी सुरू केल्याने तालुक्यातील राजकीय वातावरण तापले आहे.

सत्ताधारी आणि विरोधक यांनी आपल्या स्थानिक पातळीवरील चर्चा, बैठकांचे फेरे आणि लॉबिंग सुरू आहे. काही संभाव्य उमेदवारांवर वरिष्ठ नेतृत्वाचा भर असताना, स्थानिक पातळीवरील गटबाजीमुळे निर्णय प्रक्रियेत अडथळे निर्माण होत असल्याचे बोलले जाते.

त्यामुळे काही ठिकाणी नाराज गटांनी बंडखोरीचीही हुकमी पत्त्याप्रमाणे तयारी सुरू केल्याची माहिती मिळते. दरम्यान, मतदारसंघनिहाय समीकरणे बदलत असल्याने पक्षांनाही ‘जिंकणारा उमेदवार’ देण्याचे मोठे आव्हान आहे.

जातीय, स्थानिक पातळीवरील सामाजिक मांडणी, तसेच मागील निवडणुकांतील मतांची गणिते लक्षात घेऊन पक्षांची तापलेली डोकी थंड करण्याचे प्रत्येक तालुका नेतृत्वाला दाखवावे लागणार आहे. पुढील २-३ दिवसांत उमेदवारीबाबत महत्त्वाचे निर्णय जाहीर होण्याची शक्यता असून, त्यानंतर आजरा गडहिंग्लज चंदगड तालुक्यातील राजकीय घडामोडींना आणखी वेग येणार हे निश्चित आहे. एकाच पक्षात राहून एकमेकांशी एकनिष्ठ असणारी स्थानिक कार्यकर्ते नेते आता एकमेकांचे प्रतिस्पर्धी होणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.