Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रखानापूर ग्रामपंचायचे विभागीय आयुक्त कार्यालय पुणे कडील विभागीय मूल्यमापन.

खानापूर ग्रामपंचायचे विभागीय आयुक्त कार्यालय पुणे कडील विभागीय मूल्यमापन.

खानापूर ग्रामपंचायचे विभागीय आयुक्त कार्यालय पुणे कडील विभागीय मूल्यमापन.

आजरा.- प्रतिनिधी.

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन २०२३/२४ अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक पटकाविलेल्या खानापूर ग्रामपंचायतीला विभागीय आयुक्त कार्यालय पुणे कडील विभागीय मूल्यमापन समितीने भेट देऊन ग्रामपंचायतीने केलेल्या कामांचे मूल्यमापन केले.

यावेळी सदर समितीच्या अध्यक्षा श्रीमती दिपाली देशपांडे अप्पर आयुक्त (विकास) विभागीय आयुक्त कार्यालय पुणे, रवींद्र कणसे, सहाय्यक आयुक्त (विकास) विभागीय आयुक्त कार्यालय पुणे, शैलेश सराफ साहेब सहाय्यक प्रशासन अधिकारी विभागीय आयुक्त कार्यालय पुणे व विशाल ब भुरकुडे, कनिष्ठ सहाय्यक आयुक्त कार्यालय पुणे यांनी खानापूर गावात केलेल्या घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन कामांची व दप्तरी कामाची पाहणी केली. यावेळी सौ माधुरी परीट मॅडम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग) जिल्हा परिषद कोल्हापूर, सुभाष सावंत साहेब गटविकास अधिकारी (वर्ग १) पंचायत समिती आजरा, बी टी कुंभार,विस्तार अधिकारी पंचायत समिती आजरा निशांत कांबळे जिल्हा समन्वयक, श्री सर्जेराव घाटगे तालुका समन्वयक त्याचबरोबर आरोग्य विभाग, पाणीपुरवठा विभाग, शिक्षण विभाग, महिला व बालकल्याण विभाग, कृषी विभाग,पशुसंवर्धन विभागा कडील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

खानापूर ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात केलेल्या विविध कामांची माहिती खानापूर ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ कल्पना डोंगरे, उपसरपंच आनंदा राणे, ग्रामपंचायत अधिकारी विशाल दुंडगेकर, ग्रामपंचायत सदस्य विश्वास जाधव, श्रीमती माधुरी गुरव, सौ अलका चव्हाण, सुशीला जाधव यांनी दिली. सदर समितीच्या स्वागतासाठी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.