Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रवसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याचा २७ वा बॉयलर अग्नी प्रदिपन समारंभ संपन्न.

वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याचा २७ वा बॉयलर अग्नी प्रदिपन समारंभ संपन्न.

वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याचा २७ वा बॉयलर अग्नी प्रदिपन समारंभ संपन्न.

आजरा.- प्रतिनिधी

गवसे ता.आजरा येथील वसंतराव देसाई आजरा शेत. सह. साखर साखर कारखान्याचा सन २०२५/२६ या २७ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नि प्रदिपन’ समारंभ बुधवार दि.१५ रोजी कारखान्याचे चेअरमन, मुकुंद उर्फ उदयसिंह बळीराम देसाई तसेच व्हा. चेअरमन सुभाष गणपतराव देसाई व सर्व संचालक मंडळ सदस्यांचे शुभहस्ते संपन्न झाला.

तत्पूर्वी कारखान्याच्या संचालिका सौ. मनिषा रविंद्र देसाई व त्यांचे पति रविंद्र देसाई यांचे शुभहस्ते विधिवत होम-हवन पूजा पार पडली.
या कार्यक्रमासाठी माजी चेअरमन व जेष्ठ संचालक वसंतराव धुरे, विष्णूपंत केसरकर, उदयसिंह पोवार, बैंक प्रतिनिधी सुधीर देसाई, संचालक मधुकर देसाई, मारूती घोरपडे अनिल फडके, दिपक देसाई, रणजीत देसाई, संभाजी पाटील, शिवाजी नांदवडेकर, राजेंद्र मुरूकटे, राजेश जोशिलकर, गोविंद पाटील, संचालिका सौ. रचना होलम, संचालक काशिनाथ तेली, श्री.हरी कांबळे, तज्ञ संचालक रशिद पठाण, शासन नियुक्त प्रतिनिधी दिगंबर देसाई, कार्यकारी संचालक संभाजी सावंत, जनरल मॅनेंजर (टेक्नी.) एम्.आर. पाटील, चिफ केमिस्ट सुजय देसाई, मुख्य शेती अधिकारी विक्रमसिंह देसाई, चिफ अकौटंट प्रकाश चव्हाण, कामगार संघटनेचे अध्यक्ष श्री.धनाजी किल्लेदार, उपाध्यक्ष व संघटनेचे पदाधिकारी, ठेकेदार व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.