HomeUncategorizedघाटकरवाडीतील बेमुदत आंदोलनाला तात्पुरती स्थगिती.( ना. पालकमंत्री, वनविभाग, कृषी उत्पन्न बाजार समिती,...

घाटकरवाडीतील बेमुदत आंदोलनाला तात्पुरती स्थगिती.( ना. पालकमंत्री, वनविभाग, कृषी उत्पन्न बाजार समिती, व शेतकरी शिष्टमंडळ – यांच्या बैठकीनंतर पुढील दिशा.- आंदोलकांची माहिती.‌ ) गडहिंग्लज उपजिल्हा रुणालय २०० बेड मंजूर व्हावे.- ग्राहक पंचायत महाराष्ट्र वतीने – पालकमंत्र्यांना निवेदन.

घाटकरवाडीतील बेमुदत आंदोलनाला तात्पुरती स्थगिती.
( ना. पालकमंत्री, वनविभाग, कृषी उत्पन्न बाजार समिती, व शेतकरी शिष्टमंडळ – यांच्या बैठकीनंतर पुढील दिशा.- आंदोलकांची माहिती). गडहिंग्लज उपजिल्हा रुणालय २०० बेड मंजूर व्हावे.- ग्राहक पंचायत महाराष्ट्र वतीने – पालकमंत्र्यांना निवेदन.

घाटकरवाडीतील बेमुदत आंदोलनाला तात्पुरती स्थगिती.
( ना. पालकमंत्री, वनविभाग, कृषी उत्पन्न बाजार समिती, व शेतकरी शिष्टमंडळ – यांच्या बैठकीनंतर पुढील दिशा.- आंदोलकांची माहिती.‌ )

आजरा – प्रतिनिधी.

मौजे सुळेरान, धनगरमोळा व घाटकरवाडी येथे हत्ती, गवारेडा, रानडुक्कर व माकड आशा बारा बलुतेदार वन्य प्राण्यामुळे होत असलेल्या नुकसानीमुळे सदर वन्यप्रान्यांना हाकलणे किंवा कामय स्वरूपी बंदोबस्त करणेबाबत घाटकरवाडी विभागातील शेतकरी यांनी दि १३ पासून छेडले होते. आंदोलनाचा आज दुसरा दिवस होता. उपोषणाला बसलेले संग्राम पाटील सह सर्व आंदोलन यांनी संतप्त भूमिका घेतली होती. याची दाद घेत पालकमंत्री नाम. प्रकाश आबिटकर यांनी वनविभाग कृषी उत्पन्न बाजार समिती, व शेतकरी यांची संयुक्त बैठक दि. २५ रोजी आयोजित केले आहे. याबाबतचे पत्र आजरा वन विभागाने आंदोलनात दिले आहे. या बैठकीत आंदोलकांच्या मागण्या याबाबत चर्चा होणार असल्याने तात्पुरते आंदोलन स्थगित करणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले आहे.

आज रोजी आंदोलनाला तालुक्यातील विविध पक्षाचे व संघटनेचे नेते भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा देत आहेत.‌ यामध्ये आजरा साखरचे चेअरमन मुकुंद दादा देसाई, उबाठा सेनेचे ता. प्रमुख युवराज पोवार, भाजप ता. अध्यक्ष अनिकेत चराटी, उद्योजक रमेश रेडेकर, कारखाना संचालक अनिल फडके, दशरथ अमृते यांनी आंदोलनात स्थळी जाऊन आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
सुळेरान, धनगरमोळा व घाटकरवाडी तसेच किटवडे, लिंगवाडी व आंबाडे येथे जून २०२५ ते आज अखेर हत्तीचा वापर असून शेतक-यांकडून वारंवार तकारी येत आहेत. शेतक-यांचे भातशेती, ऊसशेती, मेसकाटी तसेच काजू व केळी इत्यादींचे अतोनात नुकसान झाले आहे. हत्तीच्या वावरामुळे परिसरात भितीचे वातावण असलेंने शेतक-यांना शेतामध्ये जाणे अवघड झाले आहे.
विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. दि. २५ रोजी होणाऱ्या संयुक्त बैठकीत आमच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा. अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.
या आंदोलनात सुळेरान, धनगरमोळा, घाटकरवाडी तसेच किटवडे, लिंगवाडी व आंबाडे परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.

🛑गडहिंग्लज उपजिल्हा रुणालय २०० बेड मंजूर व्हावे.- ग्राहक पंचायत महाराष्ट्र वतीने – पालकमंत्र्यांना निवेदन.

गडहिंग्लज.- प्रतिनिधी.

ग्राहक पंचायत महाराष्ट्र गडहिंगलज, गारगोटी, आजरा, चंदगड विभाग. गडहिंग्लज उपजिल्हा रुणालय २०० बेडचेमंजूर होणे बाबत. आरोग्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री कोल्हापूर यांना ग्राहक पंचायत महाराष्ट्र यांनी निवेदन दिले आहे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.‌
गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालय गोरगरीब लोकांचा आधार आहे. या ठिकाणी रुग्णांची प्रचंड वर्दळ होत असते या दृष्टीने २०० बेडचे उपजिल्हा रुग्णलय करत असल्याचे मंत्री नाम. हसन मुश्रीफ यानी घोषित केले होते. प्रस्तावही शासनाकडे गेलेला आहे. असे समजते मात्र अद्याप २०० बेडच्या प्रस्तावाला मंजूरी मिळाली नाही. उपजिल्हा रुग्णलय गडहिंग्लज येथे रुग्णांची गर्दी लक्षात घेवून २०० बेडच्या प्रस्तावाला आपणमंजूरी द्यावी सर्व उपचारावर डॉक्टरांची संख्या वाढवावी स्टाप कमी आहे. आपण कोल्हापूर जिल्हयाचे पालकमंत्री देखील आहात ही आमची जमेची बाजू आहे कृपया लवकरात लवकर बेडची संख्या वाढवून त्या साठीची इमारत व कर्मचारी स्टाप त्वरीत देण्याची व्यवस्था करावी आमच्या या आजरा, गडहिंग्लज, चंदगड, गारगोटी विभागाला अत्यंत गरजेचे व वरदान ठरलेले हे हॉस्पीटल मोठे झाल्यास लोकांची सेवा करण्याची आपल्या सरकारला संधी मिळणार आहे. तरी विचार व्हावा ही विनंती. असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.‌
यावेळी कॉम्रेड शिवाजी गुरव, तानाजी केदारी, रावसाहेब पाटील सह ग्राहक पंचायतचे आज जरा गडहिंग्लज चंदगडचे पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.