जनता सहकारी गृहतारण संस्थेच्या कर्मचाऱ्यांना निमित्त (१६.६६%) दिवाळी बोनस.
आजरा.- प्रतिनिधी.
जनता सहकारी गृहतारण संस्था आजराची सुरूवात अत्यंत खडतर परिस्थितीत झाली असून संस्थेने रौप्यमहोत्सवी वर्षामध्ये पर्दापण केले आहे. याच टप्प्यावरती संस्थेने सभासदांच्या विश्वासास पात्र १०० कोटी ठेवींचा टप्पा पुर्ण केला आहे. ठेवी आणि कर्जाचा योग्य समतोल राखत संस्था प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. संस्थेच्या या वाटचाली मध्ये कर्मचाऱ्यांचे योगदान लक्षात घेऊन संस्थेकडून (१६.६६%) दिवाळी बोनस देत आहोत असे प्रतिपादन संस्थेचे चेअरमन श्री. मारूती मोरे यांनी केले.
सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे पगार देणारी आणि दिवाळी भेट म्हणून १६.६६ (दोन पगार) देणारी जनता गृहतारण संस्था ठामपणे पुढे जात आहे. १०० कोटी ठेवी पूर्ण केल्याबददल नुकतीच एक आगाऊ वेतनवाढ दिलेली असताना सुध्दा संस्थेने दिवाळी बोनस दिलेला आहे असे मत व्हा. चेअरमन प्रो. (डॉ). अशोक बाचूळकर यांनी व्यक्त केले. यावेळी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस, ड्रेसकोड आणि मिठाईचे वाटप करून कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देणेत आल्या. याप्रसंगी संचालक रविंद्र आजगेकर, प्रशासकीय अधिकारी मारूती कुंभार, शाखाधिकारी अरविंद कुंभार आणि कर्मचारी उपस्थित होते.
