Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रआमच्या मागण्या मान्य करा तेव्हाच आंदोलन थांबेल.- आजरा वन विभागाला इशारा.🛑वसंतराव देसाई...

आमच्या मागण्या मान्य करा तेव्हाच आंदोलन थांबेल.- आजरा वन विभागाला इशारा.🛑वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याचा बुधवारी बॉयलर अग्नी प्रदिपन समारंभ.

🛑आमच्या मागण्या मान्य करा तेव्हाच आंदोलन थांबेल.- आजरा वन विभागाला इशारा.
🛑वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याचा बुधवारी बॉयलर अग्नी प्रदिपन समारंभ.

🟣आमच्या मागण्या मान्य करा तेव्हाच आंदोलन थांबेल.- आजरा वन विभागाला इशारा.
( मौजे सुळेरान, धनगरमोळा व घाटकरवाडी येथील शेतकऱ्यांचे आंदोलनाचे चिघळण्याची शक्यता.)

आजरा – प्रतिनिधी.

Oplus_131074

मौजे सुळेरान, धनगरमोळा व घाटकरवाडी येथे हत्ती, गवारेडा, रानडुक्कर व माकड आशा बारा बलुतेदार वन्य प्राण्यामुळे होत असलेल्या नुकसानीमुळे सदर वन्यप्रान्यांना हाकलणे किंवा कामय स्वरूपी बंदोबस्त करणेबाबत घाटकरवाडी विभागातील शेतकरी यांनी आज दि १३ रोजी वनविभागाच्या विरोधात आंदोलन छेडले वन विभागाचे अधिकारी आजरा ता. आर. एफओ वेळेत न आल्याने आंदोलक संतप्त झाले होते. यावेळी उपस्थित असलेले अधिकारी श्री कोळी यांनी आंदोलकांचे सांत्वन करत आपण केलेल्या मागण्याबाबत आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कडे पाठवतो असे सांगितले.
उपोषणाला बसलेले संग्राम पाटील यांनी संतप्त भूमिका घेत आपण संबंधित अधिकारी या ठिकाणी येऊन आमच्या मागणीची दखल घेत असाल तर आम्ही रास्ता रोको करणार असल्याचे सूचित केल्यानंतर उपस्थित असलेले अधिकारी येऊन आंदोलकांची भेट घेतली व मागण्या ऐकून घेतल्या.
वरील विषयास अनुसरून मौजे सुळेरान, धनगरमोळा व घाटकरवाडी तसेच किटवडे, लिंगवाडी व आंबाडे येथे जून २०२५ ते आजअखेर हत्तीचा वापर असून शेतक-यांकडून वारंवार तकारी येत आहेत. शेतक-यांचे भातशेती, ऊसशेती, मेसकाटी तसेच काजू व केळी इत्यादींचे अतोनात नुकसान झाले आहे. हत्तीच्या वावरामुळे परिसरात भितीचे वातावण असलेंने शेतक-यांना शेतामध्ये जाणे अवघड झाले आहे.

अन्य प्राण्यांमुळे झालेल्या शेतीचे नुकसान भरपाई अत्यंत कमी असलेंने शेतकरी कर्जात बुडत चालला आहे. याबाबत वन विभागाला लेखी व तोंडी सुचना दिलेल्या आहेत. हत्ती कायम स्वरूपी घालविणेसाठी प्रयत्न व्हावेत. याबाबत आंदोलकांनी खालील मागणी केल्या यामध्ये
१) हत्ती, गवारेडा व अन्य वन्य प्राण्यांचा कायम स्वरूपी बंदोबस्त करावा अन्यथः वार्षिक भाडेपट्टयांने जमिनी घ्याव्यात.
२) एकरी उत्पादना ईतकी रक्कम बाजाराभावाप्रमाणे नुकसान सान भरपाई मिळावी.
३) हत्ती संगोपन केंद्र करून हत्तीची रवानगी व्हावी,
४) शेतीसाठी दिवसा विज मिळावी.
५) वन्य प्राण्यापासुन झालेली नुकसान भरपाई नुकसानग्रस्त क्षेत्रा ईतके क्षेत्र तालुका स्तरावर वररक्षक वनपाल स्तरावर असावे व पंधरा दिवसात भरपाई मिळावी.
६) हत्तींने तुडवून नुकसान केलेल्या पिकाचे नुकसान तिन वर्षाकरीता होते. त्यामुळे नुकसान भरपाई तिप्पटीने मिळावी.
७) कुंटूंबातील इतर सदस्यांच्या हिश्याचे क्षेत्र (बहिनी व वयस्कर आई वडील) यांच्या संम्मतींने मागणी केलेल्या अर्जदारास नुकसान भरपाई मिळावी.
८) चालू वर्षी झालेल्या पिक नुकसानीमुळे शेतीसाठी घेतेलेले कर्ज माफ व्हावे.
९) सलग नुकसान होत असलेस संपुर्ण बाधीत क्षेत्राचा एकदाच पंचनामा करून भरपाई मिळावी.
१०) प्रापंचिक साहित्य, कौलारू घरे, झाडे, शेती औजारे, शेती पुरक साहित्य, शेतातील वाहने याचा बाजाराभावाप्रमाणे नुक नुकसान मिळावे.
११) पिक विमा प्रमाणे शेतीसाठी वन्य प्राण्या पासुन नुकसान भरपाई मिळणेसाठी विमा योजना राबवावी. अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार अशी माहिती आंदोलकांनी दिली.

Oplus_131074


या आंदोलनात किटवडे सरपंच लहू वाकर, उपसरपंच उमेश पाटील, तसेच सागर पाटील देवदास प्रभू, सहदेव प्रभू बाबुराव पाटील, आर. डी. सावंत, जयवंत पाटील, शशिकांत कांबळे, जयसिंग पाटील, उपसरपंच सुरेखा पाटील, कारखाना संचालक गोविंद पाटील, प्रकाश मोरस्कर, सुरेश पाटील गोपाळ पाटील चंद्रकांत मस्कर देविदास सूर्यवंशी सह शेतकरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट

मनोगत. गोविंद पाटील, चंद्रकांत मस्कर, आर.डी. सावंत, सुभाष पाटील, प्रकाश मोरस्कर यांनी शेतकऱ्यांच्या पिकाची होत असलेली नुकसान याबाबत शेतकऱ्यांची भावना व वन विभागाकडून असलेल्या मागण्याची व्यथा मांडली.

🛑वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याचा बुधवारी बॉयलर अग्नी प्रदिपन समारंभ.

आजरा.- प्रतिनिधी.

गवसे येथील वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याच्या सन २०२५/२६ या २७ व्या गळीत हंगामाचा ‘बॉयलर अग्नि प्रदिपन’ बुधवार दि.१५ रोजी सकाळी ११ वा. कारखान्याचे अध्यक्ष, मुकुंद उर्फ उदयसिंह बळीराम देसाई व उपाध्यक्ष सुभाष गणपतराव देसाई आणि संचालक मंडळ सदस्यांचे शुभहस्ते आयोजित केला आहे. तसेच होम हवन विधी संचालक अनिल फडके व त्यांच्या पत्नि सौ. अनिता फडके यांचे हस्ते होणार आहे.

आजरा साखर कारखान्यांने येता सन २०२५/२६ चा गळीत हंगाम पुर्ण क्षमतेंने चालविणेंच्या दृष्टींने आवश्यक ते मशिनरी ओव्हरहोलींगची कामे पूर्ण केली आहेत. तसेच ऊस तोडणी ओढणी करीता कार्यक्षेत्रातील व बाहेरील ३५० करार बांधून त्यांना अॅडव्हांन्स रक्कमा आदा केल्या आहेत अशी माहिती देवून सदर कार्यक्रमास कारखान्याचे सभासद, शेतकरी, कंत्राटदार, ठेवीदार व हितचिंतक यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन कारखान्याचे कार्यकारी संचालक संभाजी सावंत यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.