Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रगोकुळने दूध उत्पादकांच्या घरावर दरोडा टाकला.- तानाजी देसाई शेतकरी संघटना

गोकुळने दूध उत्पादकांच्या घरावर दरोडा टाकला.- तानाजी देसाई शेतकरी संघटना

गोकुळने दूध उत्पादकांच्या घरावर दरोडा टाकला.- तानाजी देसाई शेतकरी संघटना

आजरा.- प्रतिनिधी.

गोकुळ दूध संघाने दिवाळी दूध दर फरक वाटप रकमेमध्ये हातचलाखी करून फसवणूक करून ऐन दिवाळीमध्ये दूध उत्पादकांच्या घरावर दरोडा टाकला आहे. असा आरोप स्वाभिमानीचे जिल्हा उपाध्यक्ष तानाजी देसाई यांनी दूध उत्पादकांच्या मेळाव्यात केला आहे. पेरणोली येथे दुध उत्पादकांचा मेळावा संपन्न झाला. अध्यक्षस्थानी रवळनाथ दूध संस्थेचे व्हा चेअरमन व ज्येष्ठ दूध उत्पादक बापू दळवी होते.

यावेळी श्री देसाई बोलताना म्हणाले गोकुळ दूध संघाचे शेअर भागभांडवल ७८ कोटी तर ठेव १४४ कोटी एकूण ठेवी ३९८ कोटी गुंतवणूक केलेला निधी ५१२ कोटी आहे. मागील वर्षात २५४१ कोटी रुपये चे दूध खरेदी करून ते ३३०३ कोटी रु संघाने विक्री केले आहे. संघाला निवळ दूध विक्रीतून ७६२ रुपयाचे आर्थिक उत्पन्न मिळाले आहे. अशाप्रकारे गोकुळ दूध संघ हा आर्थिक दृष्ट्या भक्कम आहे. असताना गोकुळ ने दिवाळीसाठी म्हैस दुधासाठी शेकडा ६. ५% दूध दर फरक जाहीर केला यापैकी ४. ३% रोखीने तर २.२% डिबेंचर्स कडे कपात केली तर गाय दुधासाठी ८.०६ % असा दर फरक जाहीर केला त्यापैकी ४.३% रोख व ३.७% डिबेंचर्स साठी कपात केला आहे म्हणजेच ४० ते ४५ % रक्कम कपात केली रक्कम दूध संघ कपात करत होता दूध संघाची आर्थिक परिस्थिती चांगली असतानाही अगोदरच अतिवृष्टी साडेपाच महिन्याचा सततचा वळवाचा पाऊस पिकाचे नुकसान करत आहे. अशा संकटावर शेतकरी हैराण झाला असताना गोकुळने शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी दूध उत्पादकांच्या घरावर संघाने दरोडा टाकला आहे. दिवाळीत शेतकऱ्यांना शिमका करण्याची वेळ आली आहे. संस्थापक कै. आनंदराव पाटील चुयेकर , अरुण नरके, कै रवींद्र आपटे यांनी अपार कष्टाने उभी केलेली उत्पादकांची गोकुळ ची दौलत आता दलालांच्या ताब्यात गेली आहे. याचे दुःख होते. असे श्री देसाई म्हणाले यावेळी
सर्व दूध संस्थांच्या उत्पादकांनी गोकुळ विरोधाच्या आंदोलनात सहभागी होण्याचे ठरवले. यावेळी शिवाजी देसाई रामदास सावंत उपसरपंच संकेत सावंत शिवाजी सोले, पांडुरंग वांद्रे दत्ता देसाई शिवाजी मस्कर, अमित सावंत संजय लोंढे तुषार येरुडकर, अरविंद नवलकर, छाया गुरव, सागर दळवी ज्ञानोबा वेरूळकर आनंदा ढोकरे यांच्यासह कोरीवडे येथील व पेरणोली सर्व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. विठोबा नावलकर यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.