शेतकरी – शेतमजूर कष्टकरी कामगार – वंचित महिलांची विभागीय महिला परिषद ८ ऑक्टोबर रोजी होणार गडहिंग्लज येथे
गडहिंग्लज.- प्रतिनिधी. दि ७

अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने न्याय, हक्क, अधिकार आणि स्वातंत्र्यासाठी शेतकरी – शेतमजूर कष्टकरी कामगार – वंचित महिलांची विभागीय महिला परिषद गडहिंग्लज येथे सांगली – सातारा – कोल्हापुर – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिला सहभागी होणार आहेत. असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रिका द्वारे आयोजकांनी दिली आहे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
बुधवार दि.८ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ११.०० ते ४.०० पर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन संकेश्वर रोड, निलकमल हॉटेल जवळ, गडहिंग्लज, जि. कोल्हापूर येथे ही परिषद होणार आहे.
या परिषदेचे उद्घाटन ज्येष्ठ विचारवंत डॉ. माया पंडित हस्ते होईल तर परिषदेच्या अध्यक्ष कॉ. उज्वला दळवी (सामाजिक कार्यकर्त्यां) या करणार आहेत.
तसेच कॉ. मरियम ढवळे ( राष्ट्रीय सरचिटणीस जनवादी महिला संघटना, दिल्ली) डॉ.अजित नवले (राज्य सचिव अखिल भारतीय किसान सभा) कॉ. उमेश देशमुख ( राज्याध्यक्ष – अखिल भारतीय किसान सभा) हे प्रमुख पाहुणे उपस्थितीत राहणार आहेत. या परिषदेची भुमिका मांडणी कॉ.संग्राम सावंत समवयक अखिल भारतीय विकास सभा हे मांडणार आहेत. अशी माहिती देण्यात आली आहे. या परिषदेचे आयोजन कॉ.आनंदी अवघडे कॉ. रेहना शेख कॉ. विजयाराणी पाटील, कॉ.मुमताज हैदर कॉ.चंद्रकला मगदुम, शाहिर रफिक पटेल, कॉ. माणिक अवघडे, अॅड. अमोल नाईक, डॉ.उदय नारक असे राज्यातील विविध जिल्ह्यातील अखिल भारतीय किसान सभा हे प्रमुख पदाचारी उपस्थिती म्हणून राहणार आहेत.
या परिषदेची संयोजन समिती गडहिंग्लज, आजरा, चंदगड, भुदरगड अखिल भारतीय किसान सभा दशरथ दळवी, प्रा.अनिल उंदरे, भारती पवार, मेघाराणी भाईंगडे, सुप्रिया देवेकर, अश्विनी कांबळे, पुजा पाटील, गायत्री रणदिवे, समीर खेडेकर, लक्ष्मी कांबळे, सुरेखा पाथरवट, सचिन लोहार, अनिल सुतार सह सर्व कार्यकर्ते आयोजन करीत आहेत.
