HomeUncategorizedSahyadri news Marathi Maharashtra - शेतकऱ्यांना पाच रूपये देण्याची दानत नाही.- आता...

Sahyadri news Marathi Maharashtra – शेतकऱ्यांना पाच रूपये देण्याची दानत नाही.- आता तुम्हाला दाखवतो; CM फडणवीसांचा इशारा.

Sahyadri news Marathi Maharashtra-
शेतकऱ्यांना पाच रूपये देण्याची दानत नाही.- आता तुम्हाला दाखवतो; CM फडणवीसांचा इशारा.

मुंबई.- प्रतिनिधी.

राज्यातील अनेक ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या. अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. यातच लोणीमधील शेतकरी मेळाव्यात बोलताना राज्य सरकारने शेतकऱ्यांना भरीव मदत देण्यासाठी लवकरच निर्णय करेल अशी माहिती दिली आहे. तसेच या कार्यक्रमात बोलताना कालच मी, अजितदादा आणि एकनाथ शिंदे सगळे बसलो आणि शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत काय करता येईल या संदर्भात आराखडा तयार करणं सुरु केला असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. तर दुसरीकडे या कार्यक्रमात बोलताना त्यांनी विरोधकांवर देखील जोरदार हल्लाबोल केला.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, सहकारी कारखान्यांचे मालक कारखानदार नसून शेतकरी आहेत. या कारखान्याचे मालक आमचा शेतकरी आहे. त्यामुळे त्या शेतकऱ्याच्या पाठीशी उभा राहण्याचं काम सरकार करेल.  शेतकऱ्यांसाठी बाजूला ठेवण्यास सांगितलेला निधी हा कारखान्याच्या नफ्यातून मागितला होता. तो शेतकऱ्यांच्या एफआरपीतून नव्हे असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. तसेच एफआरपीतून मागितलं नव्हते. एफआरपीते पैसे हे शेतकऱ्यांचे आहेत. नफ्यातले पैसे कारखान्याचे आहेत. असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

या कार्यक्रमात पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, शेतकऱ्यांचा काटा मारुन कारखाने पैसे जमा करतात, पण शेतकऱ्याला मदत करायला त्यांच्यात दानत नाही. तुम्ही शेतकऱ्याचा काटा मारुन पैसा जमा करता आणि शेतकऱ्यांसाठी 25 लाख रुपये द्या म्हटलं तर तुम्हाला देण्याची दानत नाही. जे लोक आमच्यावर टीका करत आहेत. त्यांना सांगतो एकदा आरशात बघून घ्या. तुम्ही असताना तुम्ही काय केलं हे एकदा आरशात बघा त्याच्यानंतर आमच्यावर टीका करा.
आम्हाला खुर्च्या तोडण्यासाठी लोकांनी पाठवलेलं नाही, शेतकऱ्यांची सेवा करण्यासाठी पाठवला आहे आणि ते केल्याशिवाय आम्ही थांबवणार नाही असं देखील या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

चौकट.

नफ्यातील पैसे कारखान्याचे आहेत. पण कारखान्याचे खरे मालक हे सभासद असतात. मग ते सभासदांचे पैसे आहेत. सभासदांचे पैसे घेऊन नुकसान ग्रस्त भागात पैसे देत असताना त्या भागातील कारखाने आहेत. मग सभासदांचे पैसे नुकसान ग्रस्त सभासदांना देणे म्हणजे त्यांचे पैसे त्यांनाच..

कारखाना सभासदांचे मत..

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.