शिवसेनेच्या मागणीला – यश
– एस. टी फेऱ्या बंद बाबत – बैठकीत केला होता.- हल्लाबोल.
( बंद केलेल्या फेऱ्या उद्यापासून चालू )
आजरा – प्रतिनिधी.

आजरा येथील एसटी आगारचा चाललेला कारभार या विरोधात शिवसेना उबाठा गटाच्या वतीने तिरडी मोर्चा या आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. आजरा आगाराकडून सदर मोर्चा थांबवण्याची व बैठकीत चर्चा करून मार्ग काढण्याची आगाराने विनंती केली होती. या अनुषंगाने या बैठकीत आगार प्रमुखांना धारेवर धरण्यात आले होते. यावेळी केलेल्या मागणीनुसार आजरा तालुक्यातील खालील बस फेऱ्या उद्या दि ७ पासून चालू करण्यात येणार असल्याचे आगार प्रमुख श्री पाटील यांनी वेळापत्रक दिले आहे. व मागणी केलेल्या इतर फेऱ्या बाकीच्या फेऱ्या पुढील काही दिवसात चालू करण्यात येतील असे सांगण्यात आले. याबाबत फेऱ्या चालू करणार असल्याचे लेखी पत्र देण्यात आले. यावेळी तालुकाप्रमुख युवराज पवार युवा सेनेचे सुयश पाटील अमित गुरव बिलाल लतीफ महादेव पवार उपस्थिथ होते.
चौकट
या बंद केलेल्या खालील फेऱ्या वेळापत्रकानुसार चालू करण्यात आले आहेत.
आजरा – धनगरवाडा – 14.00 वा.
आजरा.- वझरे पेरणोली
15.35 वा.
आजरा – मेढेवाडी
16.45 वा.
आजरा – लाटगाव सातेवाडी
17.45 वा
आजरा.- वझरे पेरणोली
19.00 वा.
आजरा- उचंगी
7.10 वा.
आजरा – देवकांडगाव
8.00
आजरा – हत्तीवडे
9.20 वा.
आजरा – वेळवट्टी
10.00 वा.
आजरा.- सरोळी
10.40 वा.
आजरा – महागाव
12.15 वा.
आजरा.- वझरे
8.20 वा.
आजरा – देवर्डे
15.50 वा.
आजरा.- लाटगाव 9.00 वा.
