Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रसंघे कलयुगे शक्ती - संगठना हीच कलियुगात आपली ताकद.-केदार जोशी

संघे कलयुगे शक्ती – संगठना हीच कलियुगात आपली ताकद.-केदार जोशी

संघे कलयुगे शक्ती – संगठना हीच कलियुगात आपली ताकद.-
केदार जोशी

आजरा.- प्रतिनिधी.

संगठना हीच कलियुगात आपली ताकद आहे असे प्रतिपादन केदार जोशी यांनी आजरा येथे झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शस्त्रपूजन कार्यक्रम मध्ये केले.
आजरा येथे दिनांक २८ सप्टेंबर, २०२५ रोजी विजयादशमी निमित्त आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्ष पूर्ण झालेल्या निमित्ताने भव्य सघोष पथसंचलन आणि शस्त्रपूजन उत्सव पार पडला. आजरा मंडलच्या या उत्सव मध्ये एकूण ७ गावांमधील, ८९ स्वयंसेवक पूर्ण गणवेशात उपस्थित होते.


आजरा तालुक्यामध्ये एकूण अश्या प्रकारचे ९ कार्यक्रम होत आहेत. या मध्ये तालुक्यातील सर्व स्वयंसेवक, माता भगिनी, नागरिक सज्जन मोठ्या संख्येने उपस्थिती लावून आपलं संघावरील प्रेम व विश्वास दाखवत आहेत.
आजरा शहरात झालेल्या शस्त्रपूजन उत्सव मध्ये बोलताना वक्त्यांनी संघ समाजाला सोबत घेऊन समाज परिवर्तनाच्या पाच मुद्द्यांवर प्रतिपादन केले. या पंचपरिवर्तन मध्ये सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, स्व बोध, पर्यावरण आणि नागरिक शिष्टाचार या विषयावर संघ काम करत आहे.
या पंचपरिवर्तनासाठी समाजाने सोबत येऊन यात प्रत्यक्ष सहभाग घ्यावा असे आवाहन सुद्धा त्यांनी या वेळी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.