आजरा येथील स्वामी विवेकानंद पतसंस्थेला १ कोटी ७ लाख ७५ हजार नफा- ( सभासदांना १० टक्के लाभांश मंजूर )
आजरा.- प्रतिनिधी.
आजरा येथील स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्थेला अहवाल सालात एक कोटी सात लाखांचा निवळ नफा झाला असल्याची माहिती चेअरमन श्री. दयानंद सिद्धाप्पा भुसारी यांनी दिली तसेच सभासदांना १०% लाभांश जाहीर केला. संस्थेच्या ५३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते जनरल मॅनेजर श्री अर्जुन रामा कुंभार यांनी सभा नोटीस वाचन ताळेबंद व आर्थिक पत्रकांचे वाचन केले.
संचालक सुधीर चोडणकर यांनी श्रद्धांजलीचा ठराव मांडला चेअरमन दयानंद भुसारी म्हणाले संस्थेकडे वसूल भाग भांडवल ४ कोटी ६० लाख असून, १७० कोटी ३९ लाखापेक्षा अधिक ठेवी आहेत, १५५ कोटी ४४ लाख कर्ज वाटप केले आहे. ३२५ कोटी ८४ लाखांचा व्यवसाय केला असून, बँक गुंतवणूक ४० कोटी ७३ लाख आहे संस्थेला ऑडिट वर्ग अ मिळाला आहे.
सभासद ठेविदार खातेदार व हीतचिंतक यांचा वाढता विश्वास ही संस्थेच्या प्रगतीची खरी ताकद असून सभासदांचा विश्वास व संस्थेचे पदाधिकारी कर्मचारी वर्गाच्या कष्टाच्या जोरावर संस्थेची स्वतःची वेगळी ओळख बनवत स्वामी विवेकानंद पतसंस्थेची यशस्वी वाटचाल सुरू असल्याचे त्यांनी सांगितले यानंतर सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार तसेच अहवाल सालात ७० वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठ सभासदांचे अभिष्टचिंतन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेच्या व्यवहार वाढी व प्रगतीसाठी भैरू शेलार, हेमंत कदम, विजय बांदेकर, इनास फर्नांडिस इ. सभासदांनी सूचना मांडल्या सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे चेअरमन दयानंद सिद्धाप्पा भुसारी व्हा. चेअरमन सुधीर कुंभार, संस्थेचे जनरल मॅनेजर अर्जुन कुंभार
