वार्षिक सभे निमित्य “कृषी महोत्सव” या सदराखाली कृषी उपयुक्त साहित्य ( प्रदर्शन हा नाविन्यपुर्ण उपकम.)
आजरा.- प्रतिनिधी.
वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना लि. अमृतनगर गवसे च्या गुरुवार दि.२९/९/२०२५ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे औचित्य साधुन कारखाना व्यवस्थापनाने कारखाना कार्यस्थळावर प्रथमच “कृषी महोत्सव” या सदराखाली कृषि उपयुक्त साहित्य प्रदर्शन आयोजित करून एक स्तुत्य उपक्रम राबविला त्यामुळे शेतकरी सभासदांकडून समाधानाची भावना व्यक्त होत आहे.
आजरा तालुक्यात मोठया प्रमाणावर अल्प व अत्यल्प भुधारक शेतकरी आहेत. आजही येथे बहुसंख्य शेतकरी पारंपारीक पध्दतीने पिके घेत असलेने उत्पादनावर मर्यादा येत आहेत. सद्या आजरा तालुक्यातील पाणी प्रकल्प मार्गी लागले असुन पाण्याचा प्रश्न बहुतांशी निकाली निघालेला आहे. आज पारंपारिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञान व औजारे यांची जोड मिळालेस निश्चितच उत्पादनात भरघोस वाढ होईल व शेतक-यांना दिलासा मिळेल या उददेशाने शेतीसाठी आधुनिक औजारे, बी-बीयाणे, सेद्रिय व रासायनिक खते, टिश्यु कल्चर इतर फुले व फळे यांची रोपे, औषध फवारणी ड्रोण इत्यांदी वस्तुंचे २१ स्वतंत्र स्टॉल लावुन त्याचे वापराबाबत कंपणीचे तज्ञांकडून सभासद शेतक-यांना मार्गदर्शनही करणेत आले. या प्रदर्शनाचा लाभ सभेस आलेल्या व पंचकोषीतील अंदाजे २००० शेतक-यांनी घेतला आहे.
यावेळी सर्व स्टॉल धारकांना कारखान्याचे चेअरमन मुकुंददादा देसाई, व्हा.चेअरमन सुभाष देसाई व सर्व संचालक मंडळाच्या हस्ते शिल्ड व प्रशस्ती पत्र देणेत आले. सदरचे कृषी प्रदर्शन यशस्वी करणेकरीता कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी विक्रमसिंह देसाई यांचे मार्गदर्शनाखाली कारखान्याच्या शेती विभागातील कर्मचा-यांनी विशेष परिश्रम घेतले असलेची माहिती कार्यकारी संचालक सभांजी सावंत यांनी दिली.
