सेवा पंधरवडा कालावधीत सर्वांनी समर्पित भावनेने काम करा- आजरा तहसिलदार – समीर माने
आजरा.- प्रतिनिधी.
सेवा पंधरवडा कालावधीत सर्वांनी समर्पित भावनेने काम करावे असे आवाहन आजरा तहसिलदार समीर माने यांनी केले आहे.
सेवा पंधरवडा- १७ सप्टेंबर, २०२५ ते ०२ ऑक्टोंबर २०२५ या कालावधीत
महाराष्ट्र राज्यामध्ये महसूल विभागामार्फत सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक होण्यासाठी छ. शिवाजी महाराज महाराजस्व अभियानातंर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा जन्मदिन दि. १७/०९/२०२५ ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दि. ०२/१०/२०२५ या कालावधीत ‘सेवा पंधरवडा’ राबविण्यात येणार आहे.
सेवा पंधरवड्यात राबवण्यात येणारे कार्यक्रम है निरंतरपणे राबविले जाणारे कार्यक्रम आहेत, तथापि, या कालावधीत ते मोहिम स्वरुपात युद्धपातळीवर राबविण्यात येतील. हे अभियान ‘पाणंद रस्तेविषयक मोहीम’, योजनेच्या अंमलबजावणीसाठी पूरक उपक्रम आणि महसूल प्रशासनामार्फत नाविन्यपूर्ण उपक्रम अशा तीन टप्प्यांमध्ये राबविण्यात येणार आहे. सदरचे सेवा पंधरवडयात राबवावयाचे टप्पेनिहाय उपक्रमातंर्गत शासन निर्देशांनुसार दिलेले कामकाज प्रभावीपणे राबविण्यासाठी आजरा तालुक्यात दैनंदिन करावयाच्या कार्यक्रमाची रुपरेषा खालीलप्रमाणे आहे.
दि १७ पासून – कार्यवाहीचा तपशिल
तालुक्यातील मंडळ निहाय दोन गावांची निवड करुन पाणंद रस्ते कार्यक्रम प्रसिध्दी यामध्ये
गाव शिवार फेरी
(प्रपत्र १,२ ) गावातील रस्त्यांची यादी तयार करणे
सहभाग.- ग्रामपंचायत व ग्रामस्थ ग्रामपंचायत अधिकारी ग्राम महसूल अधिकारी पाटील इ महसूल सेवक, पोलीस
१८/०९/२०२५ व
ग्रामसभा घेवून यादी अंतिम करणे १९/०९ /२०२५
सादर करणे ग्राम ठरावासह यासदी आजरा तहसिलदार यांना
ग्रामपंचायत व ग्रामस्थ ग्राम महसूल अधिकारी महसूल सेवक, पोलीस पाटील इ ग्रामपंचायत अधिकारी
अतिक्रमण रस्त्याबाबत प्रस्ताव सादर करणे दि. २०/०९/२०२५
भूमि अभिलेख विभागाकडून गावा नकाशातील रस्त्या बाबत आवश्यक ठिकाणी सिमांकन करणे.
तहसिलदार यांनी रस्त्यावरील अतिक्रमणाबाबत सुनावणी घेवून आदेश पारीत करणे.
ग्रामपंचायत व ग्रामस्थ ग्रामपंचायत अधिकारी ग्राम महसूल अधिकारी, भुकरमापक, महसूल सेवक, पोलीस पाटील, तहसिलदार, उप अधिक्षक भुमि अभिलेख इ.
दि.- २१/०९/२०२५
अतिक्रमण निष्कासित करणे
रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावणे
ग्रामपंचायत व ग्रामस्थ, ग्रामपंचायत अधिकारी, भुमि अभिलेख प्रतिनिधी ग्राम महसूल अधिकारी महसूल सेवक, पोलीस पाटील इ.

सुधारित दैनंदिन कार्यक्रमाची रुपरेषा :- छ. शिवाजी महाराज महाराजस्व अभियानातंर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा जन्मदिन दि.१७ ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दि. ०२ या कालावधीमध्ये “सेवा पंधरवडा” साजरा करणेबाबत निर्देश दिलेले आहेत. सदरचे सेवा पंधरवडयात राबवावयाचे टप्पेनिहाय उपक्रमातंर्गत शासन निर्देशांनुसार दिलेले कामकाज प्रभावीपणे राबविण्यासाठी कोल्हापूर जिल्हयामध्ये दैनंदिन करावयाच्या कार्यक्रमाची रुपरेषा खालीलप्रमाणे आहे.
दि. १७
तालुक्यातील मंडळ निहाय दोन गावांची निवड करुन पाणंद रस्ते कार्यक्रम प्रसिध्दी.-
गाव शिवार फेरी गावातील रस्त्यांची यादी तयार करणे (प्रपत्र 1,2) ग्रामपंचायत व ग्रामस्थ ग्रामपंचायत अधिकारी ग्राम महसूल अधिकारी महसूल सेवक, पोलीस पाटील इ
अशी माहिती तहसील कार्यालयाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आली आहे.
