आजरा आगारावर शिवसेना उबाठाचा तिरडी मोर्चा .- निवेदनाने इशारा.- आजरा आगार व्यवस्थापनाच्या ढिसाळ कारभार- चव्हाट्यावर.
आजरा.- प्रतिनिधी.
आजरा आगारावर शिवसेना उबाठा तिरडी मोर्चा काढणार असल्याचे. निवेदन आजरा पोलीस स्टेशन यांना देण्यात आले यामुळे आजरा आगार व्यवस्थापनाच्या ढिसाळ कारभार- चव्हाट्यावर आला आहे. शिवसेनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. कि आजरा तालुका हा डोंगराळ व ग्रामीण भाग असलेने आजरा शहर हि मुख्य बाजारपेठ आहे. तसेच शाळा कॉलेज, हॉस्पिटल व सर्व शासकीय कार्यालये देखील आजरा येथे असेलेने तालुक्यातील नागरिक, विद्यार्थी मोठ्या प्रमाणात एस.टी ने ये जा करत असतात. परंतु गेली अनेक महिने आजरा तालुक्यातील एस.टी चे वेळापत्रक चुकीचे असलेमुळे वेळेत बस बसस्थानकावर येत नाही. वस्तीच्या गाड्या बंद केलेल्या आहेत. काही फेऱ्या दुसऱ्या मार्गाने सोडल्या गेलेल्या आहेत त्यामुळे अनेक विद्यार्थी रात्री ८ वाजता घरी पोहचतात. तसेच नागरिकांना वेळेत कामावर पोहचता येत नाही.
महाराष्ट्रात एक नंबर ला असणारा आजरा आगार हा या व्यवस्थापनाच्या ढिसाळ नियोजनामुळे बंध होण्याच्या मार्गावर आलेला आहे. यामुळे या अधिकार्यांना व प्रशासनाला जाग आणण्यासाठी शिवसेनेच्या वतीने शुक्रवार दि. २६/०९/२०२५ रोजी ठीक ११:३० मी आजरा आगारावर तिरडी मोर्चा काढणार आहोत. याची नोंद घ्यावी. असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे या निवेदनावर उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, ता. प्रमुख युवराज पोवार, अमित गुरव सह पदाधिकारी यांच्या सह्या आहेत.
