🟣भगवान विष्णूलाच काहीतरी करायला सांगा” ‘खजुराहो’बाबतच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी.-
🟣’ते’ ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार?
शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
🟥भगवान विष्णूलाच काहीतरी करायला सांगा” ‘खजुराहो’बाबतच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी.- सरन्यायाधीश म्हणाले, “तुम्ही भक्त
मध्यप्रदेशमधील प्रसिद्ध खजुराहो मंदिर परिसरातील जावरी मंदिरातील सात फूट उंच भगवान विष्णूची शीर नसलेली मूर्ती हटवून तिथे नवी मूर्ती बसवावी अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळली. सरन्यायाधीश बी. आर. गवई व न्यायमूर्ती ऑगस्टाइन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठासमोर याप्रकरणाची सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने स्पष्ट केलं की हे प्रकरण पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या (एएसआय) अखत्यारित येतं.याचिकाकर्ते राकेश दलाल यांची विनंती ऐकल्यानंतर सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले, “तुम्ही इथून जा आणि भगवान विष्णूकडे प्रार्थना करा आणि त्यालाच काहीतरी करायला सांगा. तुम्ही असा दावा करता की तुम्ही भगवान विष्णूचे भक्त आहात. मग भगवान विष्णूलाच काहीतरी करायला सांगा. ते एक पुरातत्व विभागाच्या अखत्यारित येणारं स्थळ आहे. तिथे काहीही करायचं असेल तर एएसआयची परवानगी घ्यावी लागते. या प्रकरणात आम्ही दखल देऊ शकत नाही याबाबत आम्हाला खेद वाटतो.”
याचिकाकर्त्याचं म्हणणं काय?.
याचिकाकर्त्याने त्याच्या याचिकेत म्हटलं होतं की “मुघलांच्या काळात त्यांच्या सैनिकांनी खजुराहोमधील मंदिरांवर हल्ले केले. मंदिरांची लूट केली आणि परिसरात नासधूस केली. काही मंदिरं आणि मूर्तींची विटंबना केली. मुघलांनीच या मूर्तीचं शीर तोडलं. मात्र, आता आपला भारत स्वतंत्र होऊन ७७ वर्षे झाली तरी ही मूर्ती दुरुस्त केली नाही.आजही मूर्ती तशाच अवस्थेत ठेवण्यात आली आहे. त्यामुळे भाविक या मंदिरात भगवान विष्णूची पूजा करू शकत नाहीत. यामुळे पूजा करण्याच्या आमच्या अधिकारावर गदा येत आहे.”राकेश दलाल यांच्या याचिकेत खजुराहो मंदिराच्या गौरवशाली इतिहासाचा उल्लेख करण्यात आला आहे. हे मंदिर चंद्रवंशी राजांनी बांधलं होतं. मात्र मुघलांनी या मंदिरावर आक्रमण करून मंदिराचं बरंच नुकसान केलं. त्यानंतर इंग्रजांचा काळात आणि आता स्वतंत्र भारतात या मंदिराची डागडुजी झाली नाही. विटंबना झालेल्या मूर्ती आजची तशाच अवस्थेत आहेत. सरकारने कधीही येथे डागडुजी केली नाही. हे मंदिर अनेक वर्षांपासून उपेक्षित राहिलं आहे.
याचिकाकर्ते म्हणाले, “या मंदिराकडे लक्ष वेधण्यासाठी बरीच आंदोलनं झाली, मोर्चे काढले, मोहिमा राबवल्या तरी यावर कुठल्याही प्रकारची सुनावणी झाली नाही. सरकारदरबारी आमच्या मुद्द्यांची दखल घेतली गेली नाही. मंदिरातील मूर्ती पाहून विष्णू भक्तांना आणि समस्त हिंदूंना खूप वाईट वाटतं. संविधानाने आम्हाला पूजा करण्याचा अधिकार दिला आहे. मात्र, मंदिरातील अशा अवस्थेतीत मूर्ती पाहून आमचा पूजेचा अधिकार हिरावला गेल्याची भावना निर्माण होते.”
🟥‘ते’ ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार?
शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
मुंबई :- प्रतिनिधी
शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा भ्रष्टाचार म्हणून राज्यभर गाजणाऱ्या बाेगस शालार्थ आय.डी.(I.D.) घाेटाळ्यात अडकलेल्या संशयित ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक, शाळा संचालकांची झाडाझडती अखेर सुरू करण्यात आली.पहिल्या दिवशी ५० शिक्षकांना सुनावणीस बाेलावून त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली.हे नियुक्तीबाबतच्या कागदपत्रांची पुर्तता न करू शकणाऱ्या शिक्षकांवर काय कारवाई हाेईल?हा चर्चेचा विषय आहे.
शिक्षण आयुक्तांनी शाळा आय.डी.(I.D.) घोटाळा प्रकरणात संशयित शिक्षकांची सुनावणी वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत करण्याचे आदेश दिले आहेत.ही सुनावणी उपसंचालक पातळीवर होत असून, उपसंचालकांनी यासाठी एक समिती गठित केली आहे.या समितीत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट) येथील अधिकारी समाविष्ट आहेत.डाएटच्या कार्यालयातच ही सुनावणी सुरू आहे.
शालार्थ घोटाळ्यामध्ये जिल्ह्यात बनावट कागदपत्रांच्या आधारे शिक्षकांची नियुक्ती झाल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत.शालार्थ आय.डी.(I.D.)च्या माध्यमातून त्यांना वेतनसुद्धा सुरू करण्यात आले होते.या प्रकरणात सायबर पोलीसांकडे गुन्हा दाखल असून आतापर्यंत २० अधिकारी, कर्मचारी, शिक्षक आणि शाळा व्यवस्थापकांना अटक करण्यात आली आहे.
शिक्षण आयुक्तांच्या आदेशानुसार संशयित शिक्षकांची सुनावणी आता उपसंचालक पातळीवर हाेत आहे.शिक्षण उपसंचालक माधुरी सावरकर यांनी प्रथम संबंधित शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य व शाळा व्यवस्थापकांना नोटीस बजावली हाेती.त्यानुसार प्रत्यक्ष सुनावणी सुरू झाली.
बनावट शिक्षक नियुक्ती प्रकरणात उपसंचालक कार्यालय स्वतः तक्रारदार आहेत.त्यांच्या म्हणण्यानुसार या शिक्षकांचे शालार्थ आय.डी.(I.D.) उपसंचालक कार्यालयातून बनविल्याच गेलेले नाहीत.अनेक शिक्षकांची नियुक्ती बनावट कागदपत्रांच्या आधारे झाली आहे.अशा शिक्षकांना अयोग्य ठरविले जाऊ शकते असा अंदाज आहे.
शिक्षकांची संख्या अधिक असल्याने पहिल्या दिवशी ५० शिक्षकांना सुनावणीसाठी बाेलावण्यात आले.त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली.यात मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापकांचाही समावेश आहे.या प्रकरणात ६३२ शिक्षक संशयित असल्याने त्यांच्या सुनावणीस १२ ते १५ दिवस लागण्याची शक्यता आहे.

🟥सुत्राच्या माहितीनुसार बरेच शिक्षक शालार्थ आय.डी.(I.D.)बाबतचे पुरावे सादर करू शकलेले नाहीत.अधिकाऱ्यांच्या मते पुरावे सादर न करू शकणाऱ्या शिक्षकांना अयाेग्य ठरवून त्यांची नियुक्तीही रद्द केली जाऊ शकते.त्यामुळे शिक्षकांची धाकधुक वाढली आहे.”या प्रकरणाची गंभीरता पाहता संशयित शिक्षक, मुख्याध्यापक व शाळा संचालकांची सुनावणी सुरू आहे.
५० लाेकांना सुनावणीस बाेलाविण्यात आले आहे.संख्या माेठी असल्याने टप्प्याटप्प्याने पंधरापेक्षा अधिक दिवस ही सुनावणी चालेल.ती पूर्ण झाल्याशिवाय या प्रकरणात काही सांगता येणार नाही.कारवाईबाबत वरिष्ठ स्तरावर निर्णय हाेईल.”
👉माधुरी सावरकर शिक्षण उपसंचालक,नागपूर
