Homeकोंकण - ठाणेरानगव्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा उपचारापूर्वी मृत्यु .( वनविभागाकडून ५ लाख रकमेचा धनादेश सुपुर्त...

रानगव्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा उपचारापूर्वी मृत्यु .( वनविभागाकडून ५ लाख रकमेचा धनादेश सुपुर्त )

शेतकऱ्याचा रानगव्याच्या हल्ल्यात उपचारापूर्वी मृत्यु .
( वनविभागाकडून ५ लाख रकमेचा धनादेश सुपुर्त )

चंदगड.- प्रतिनिधी.

Oplus_131072

चंदगड – कोकरे येथील शेतकऱ्याचा रानगव्याच्या हल्ल्यात उपचारापूर्वी मृत्यू झाला आहे.
दि. १४/०९/२०२५ रोजी पुंडलिक बापू सुभेदार, वय वर्षे ५६ रा. कोकरे, ता. चंदगड, जि. कोल्हापूर हे रामेवाडी या स्थानिक नावे ओळखल्या जाणा-या शेताकडे सायंकाळी ४.०० ते ४.३० वाजताचे दरम्यान शेतात काम करणा-या शेतमजुरांना चहा देण्यासाठी गेले असता सरस्वती सिताराम सुतार, रा. कोकरे यांचे गट नं. २७ मध्ये ऊसातून अचानक एका रानगव्याने येऊन त्यांचेवर हल्ला करुन त्यांच्या डाव्या कुशीत शिंग घुसवून खोलवर जखम केले. पुंडलिक बापू सुभेदार यांना जखमी अवस्थेत त्यांच्या कुटुंबीयांनी ग्रामीण रुग्णालय चंदगड येथे दाखल केले.

पुंडलिक बापू सुभेदार यांना झालेली दुखापत गंभीर स्वरुपाची असलेने त्यांचे कुटुंबीयांनी त्यांना उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज येथे पुढील उपचारासाठी आणले असता उपचारापूर्वी त्यांचा मृत्यु झाला. घटनेची वर्दी त्यांचा मुलगा श्री. गुरुनाथ पुंडलिक सुभेदार यांनी वनविभागाकडे दिली. त्यानुसार वनविभागाचे श्री. तुषार गायकवाड, परिक्षेत्र वन अधिकारी, चंदगड, श्री. कृष्णा डेळेकर, वनपाल चंदगड, श्री. चंद्रकांत पावसकर, वनपाल कानुर खुर्द आदी कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी करुन पंचनामा नोंद केला व त्यानंतर उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज येथे जाऊन मृत व्यक्तीची पाहणी करुन कुटुंबियांची सात्वंनपर भेट घेतली. प्रकरणी दिनांक १५/०९/२०२५ रोजी धैर्यशील पाटील, उपवनसंरक्षक कोल्हापूर वनविभाग कोल्हापूर, यांनी मृत व्यक्तीच्या वारसाला रक्कम रु. २५ लाख मंजूर केले असून त्यानुसार सहा. वनसंरक्षक, कोल्हापूर विलास काळे यांनी मौजे कोकरे येथे जाऊन कुटुंबियांची भेट घेऊन आर्थिक सहाय्य रक्कम रु. २५ लाख मंजूर केलेचे सांगून तातडीची मदत म्हणून मृत व्यक्तीची पत्नी अनिता पुंडलिक सुभेदार यांचे नावे रक्कम रु. ५ लाख रकमेचा धनादेश सुपुर्त केला.

प्रसंगी तुषार गायकवाड, वनपरिक्षेत्र अधिकारी, चंदगड, कृष्णा डेळेकर, वनपाल चंदगड, चंद्रकांत पावसकर, वनपाल कानुर खुर्द, सरपंच कोकरे, पोलीस पाटील, कोकरे व ग्रामस्थ उपस्थित होते.

चौकट

चंदगड तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येते की, वन्यप्राणी दिसताच वन विभागाच्या कार्यालयास तात्काळ कळवावे तसेच शेतकाम करत असताना सतर्क व सुरक्षित रहावे असे आवाहन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.