🟣आंबोली घाटात ब्रेक फेल झाल्याने टेम्पो दरीत कोसळला.- चालक… सुखरूप
🟣व्यंकटराव येथे हिंदी राजभाषा दिन संपन्न.
🛑आंबोली घाटात ब्रेक फेल झाल्याने टेम्पो दरीत कोसळला.- चालक… सुखरूप.
सावंतवाडी :- प्रतिनिधी.

नागपूरहून गोवा येथे पावडर घेऊन जाणाऱ्या एका आयशर टेम्पोचा आंबोली घाटात भीषण अपघात झाला. घाटातील नाना पाणी वळणावर ब्रेक निकामी झाल्याने हा टेम्पो तब्बल १०० फूट खोल दरीत कोसळला. सुदैवाने, या अपघातात टेम्पो चालक सुमित दत्ताजी उजवे (वय ३४, रा. नागपूर) किरकोळ जखमी झाला असून त्याचा जीव बचावला आहे. ही घटना आज दुपारी घडली. नागपूरहून गोव्याकडे निघालेला हा टेम्पो (एमएच-३१/एफसी-१४५३) आंबोली घाटातून जात असताना नाना पाणी वळणावर अचानक त्याचे ब्रेक फेल झाले. चालकाने नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला, परंतु तोपर्यंत टेम्पोने दरीच्या दिशेने वेग घेतला आणि तो थेट १०० फूट खोल दरीत कोसळला. टेम्पोमधून पावडरच्या गोण्या खाली विखुरल्या गेल्या.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक लोकांच्या मदतीने चालकाला दरीतून बाहेर काढण्यात आले. त्याला किरकोळ दुखापत झाली असली तरी तो सुखरूप आहे. या घटनेमुळे घाटातील वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नाही. अधिक तपास पोलीस करत आहेत.
🟣व्यंकटराव येथे हिंदी राजभाषा दिन संपन्न.
आजरा :- प्रतिनिधी.
येथील व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आजरा या प्रशालेमध्ये हिंदी राजभाषा दिनानिमित्त मुंशी प्रेमचंद यांच्या प्रतिमेला प्राचार्य एम एम नागुर्डेकर व पर्यवेक्षिका सौ व्ही जे शेलार यांच्या हस्ते पुष्पहार घालून पूजन करण्यात आले..
विद्यार्थ्यांनी हिंदी दिनाविषयी आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर हिंदी विषय शिक्षक डी. आर. पाटील आणि श्रीम.आर एन पाटील यांनीही हिंदी दिनाचे महत्त्व आणि मुंशी प्रेमचंद यांचे विषयी आपले विचार मांडले.
यावेळी हिंदी विभागातील सौ एस डी इलगे, आर एन. पाटील, सौ देसाई एस वाय, डी आर पाटील , व्ही.टी. कांबळे, सौ ढेकळे एस पी, श्रीम. बिल्ले एम व्ही तसेच या कार्यक्रमाचे आयोजक वर्ग इयत्ता दहावी ड व वर्गशिक्षिका सौ एस टी पाटील मॅडम, प्राथमिकचे मुख्याध्यापक आर व्ही देसाई , सर्व व्यंकटराव परिवार व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी व्ही पाटील यांनी केले व आभार व्ही.टी कांबळे यांनी मानले.
