🟣व्यंकटरावची ( १७ वर्ष वयोगट ) कबड्डी स्पर्धेत मुलांच्या व मुलींच्या संघांची जिल्हास्तरासाठी निवड.
🟣आजरा हायस्कूल आजरा येथे हिंदी दिवस उत्साहात संपन्न.
व्यंकटरावची ( १७ वर्ष वयोगट ) कबड्डी स्पर्धेत मुलांच्या व मुलींच्या संघांची जिल्हास्तरासाठी निवड.
आजरा.- प्रतिनिधी.

जिल्हा परिषद शिक्षण विभाग कोल्हापूर आयोजित पंचायत समिती शिक्षण विभाग आजरा मार्फत तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा आजरा येथील क्रीडा संकुल येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेसाठी तालुक्यातून सतरा संघांनी सहभाग घेतला त्यामध्ये व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आजरा या प्रशालेतील मुलांनी तालुक्यात प्रथम व मुलींच्या संघानेही प्रथम क्रमांक मिळवत उज्वल सुयश संपादन केले व कबड्डी या खेळ प्रकारात आपला दबदबा कायम ठेवला. या दोन्ही संघाची जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या यशस्वी विद्यार्थ्यांना आजरा महाल शिक्षण मंडळ आजराचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी साहेब सर्व संचालक मंडळ प्राचार्य एम एम नागुर्डेकर, पर्यवेक्षिका सौ व्ही जे शेलार व वर्गशिक्षकांचे प्रोत्साहन लाभले तसेच क्रीडाशिक्षक एस एम पाटील, सहाय्यक विभाग प्रमुख आर एन पाटील, मस्कर सर ,आर पी पाटील, एस बी कुपेकर, पोवार मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
🟣आजरा हायस्कूल आजरा येथे हिंदी दिवस उत्साहात संपन्न.
आजरा.- प्रतिनिधी.

आजरा हायस्कूल आजरा येथे हिंदी दिवस उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून हिंदी विभागाने हिंदी के जानपीठ पुरस्कार प्राप्त महानुभाव’ या विषयावर आधारित भित्तीपत्रक तयार केले. याचे उद्घाटन प्रशालेचे मुख्याध्यापक ए. एल. तोडकर यांनी केले. भित्तीपत्रकाचे माहिती सौ. व्ही. एच. अडकूरकर यांनी दिली.
हिंदी दिना विषयी सी. टी. एस. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी हिंदी को राजभाषा का गौरव क्यों मिला तथा पुरे विश्व में हिंदी भाषा का विस्तार कितना गौरवमयी हुआ है इसका विवेचन किया।’ मिल्लीपत्रक लेखनासाठी ५ वी ते ७ वी चे ५ विदयार्थी सहभागी होते. या दिनानिमित्त हिंदी गौरवगीत इ. ८ वी ड च्या विदयार्थीनीनी सादर केले. याबद्दल सी. एस्. एस्. कुराडे यांनी उत्कृष्ट मार्गदर्शन केले. प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सौ. एच.एस. कामत यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. सौ. पी. एस. बागूल यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूतनिवेदन सी. एच. एस्. कुराडे यांनी केले. या कार्यक्रमासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक ए. एल. तोडकर, उपमुख्यापक सी. एच. एस्. कामत, पर्यवेक्षक ए. आर. व्हसकोटी, सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी, विदयार्थी उपस्थित होते.
