🟥राज्यातील 34 जिल्हा परिषदांमध्ये अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर!
🟣किसान सभेच्या वतीने देवस्थान जमीनधारक शेतकऱ्यांच्या विविध अडचणी व मागण्यांबाबत गडहिंग्लज /आजरा येथे सोमवारी मोर्चा.
राज्यातील 34 जिल्हा परिषदांमध्ये अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर
राज्यातील 34 जिल्हा परिषदांमध्ये अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये
- ठाणे -सर्वसाधारण (महिला)
- पालघर – अनुसुसूचित जमाती
- रायगड- सर्वसाधारण
- रत्नागिरी- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
- सिंधुदुर्ग – सर्वसाधारण
- नाशिक -सर्वसाधारण
- धुळे -नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
- नंदूरबार-अनुसूचित जमाती
- जळगांव – सर्वसाधारण
- अहिल्यानगर अनुसूचित जमाती (महिला)
- पुणे -सर्वसाधारण
- सातारा- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
- सांगली – सर्वसाधारण (महिला)
- सोलापूर – नागरिकांचा मागास प्रवर्ग
- कोल्हापूर- सर्वसाधारण (महिला)
- छत्रपती संभाजीनगर -सर्वसाधारण
- जालना – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
- बीड – अनुसूचित जाती (महिला)
- हिंगोली -अनुसूचित जाती
- नांदेड – नागरिकांचा मागास प्रवर्ग
- धाराशिव – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
- लातूर – सर्वसाधारण (महिला)
- अमरावती – सर्वसाधारण (महिला)
- अकोला – अनुसूचित जमाती (महिला)
- परभणी – अनुसूचित जाती
- वाशिम अनुसूचित जमाती (महिला)
- बुलढाणा -सर्वसाधारण
- यवतमाळ सर्वसाधारण
- नागपूर – नागरिकांचा मागास प्रवर्ग
- वर्धा- अनुसूचित जाती
- भंडारा – नागरिकांचा मागास प्रवर्ग
- गोंदिया – सर्वसाधारण (महिला)
- चंद्रपूर – अनुसूचित जाती (महिला)
- गडचिरोली -सर्वसाधारण (महिला)
असे आरक्षणाचे जिल्हे आहेत.
🟣किसान सभेच्या वतीने देवस्थान जमीनधारक शेतकऱ्यांच्या विविध अडचणी व मागण्यांबाबत सोमवारी मोर्चा.
आजरा.- प्रतिनिधी.
अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने देवस्थान जमीनधारक शेतकऱ्यांच्या विविध अडचणी व मागण्यांबाबत सोमवार दिनांक १५ सप्टेंबर रोजी गडहिंग्लज व आजरा तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे. सदर आंदोलनात तालुक्यातील पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला संलग्न जमीनधारक शेतकरी तसेच इतर खाजगी ट्रस्टशी संबंधित सर्व देवस्थान शेतकरी सहभागी होणार आहेत.
सरसकट सर्व शेतकऱ्यांचा विनाअट खंड भरून घेण्यात यावा आणि देवस्थान शेतकऱ्यांचे पीक पाणी नोंद करून त्याचा लिखित उतारा या शेतकऱ्यांना तात्काळ देण्यात यावा या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. सोमवार दिनांक १५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वा. मोर्चाने येऊन तहसिलदार गडहिंग्लज यांना निवेदन देण्यात येणार आहे.

देवस्थान शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत योग्य व न्याय निर्णय व्हावा, ही अखिल भारतीय किसान सभेची आग्रही भूमिका आहे. अन्यथा या शेतकऱ्यांना अधिक आक्रमक व बेमुदत आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही, असा इशारा देण्यासाठी व मागण्यांची अंमलबजावणी होण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
यावेळी कॉ. संग्राम सावंत, ॲड. दशरथ दळवी, कॉ.शिवाजी गुरव, लक्ष्मण पाच्छापुरे, संभाजी मोहिते, तानाजी यादव, सुभाष शिंदे, भगवान सूर्यवंशी, प्रवीण मुळीक, बाळू मांगले, शिवाजी बिरजे, परशुराम जाधव, सुरेश जाधव उपस्थित होते.
