Homeकोंकण - ठाणेकोल्हापूर जिल्ह्यासाठी आधुनिक, सुसज्ज व भव्य प्रेस क्लबची इमारत व्हावी.- हिंदू जनसंघर्ष...

कोल्हापूर जिल्ह्यासाठी आधुनिक, सुसज्ज व भव्य प्रेस क्लबची इमारत व्हावी.- हिंदू जनसंघर्ष समितीची मागणी🛑 वन्यप्राण्यांच्या उपद्रव्याबाबत संयुक्त बैठकीचे आयोजन करावे.- उबाठा सेनेचे निवेदन🟣 स्व.रावसाहेब शामराव देसाई सहकारी गृहतारण संस्थेची( पंचवार्षिक निवड्छुक बिनविरोध.)

🟣कोल्हापूर जिल्ह्यासाठी आधुनिक, सुसज्ज व भव्य प्रेस क्लबची इमारत व्हावी.- हिंदू जनसंघर्ष समितीची मागणी
🛑 वन्यप्राण्यांच्या उपद्रव्याबाबत संयुक्त बैठकीचे आयोजन करावे.- उबाठा सेनेचे निवेदन
🟣 स्व.रावसाहेब शामराव देसाई सहकारी गृहतारण संस्थेची
( पंचवार्षिक निवड्छुक बिनविरोध.)

🟣कोल्हापूर जिल्ह्यासाठी आधुनिक, सुसज्ज व भव्य प्रेस क्लबची इमारत व्हावी.- हिंदू जनसंघर्ष समितीची मागणी

कोल्हापूर.- प्रतिनिधी.

कोल्हापूर जिल्ह्यात अलीकडेच सर्किट बेंच सुरू झाले आहे. यामुळे जिल्हा व शहराचा प्रशासकीय, कायदेशीर व सामाजिक विस्तार मोठ्या प्रमाणात होत आहे. कोल्हापूर हे ऐतिहासिक, सांस्कृतिक, औद्योगिक आणि शैक्षणिक दृष्ट्या महाराष्ट्रातील महत्त्वाचे केंद्र आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारांचा प्रेस क्लब अत्यंत सुसज्ज, आधुनिक व कार्यक्षम स्वरूपात असणे ही काळाची गरज बनली आहे. पत्रकारिता ही लोकशाहीचा चौथा खांब म्हणून ओळखली जाते. पत्रकारांना कधीही, रात्री-अपरात्री २४ तासांपैकी कोणत्याही वेळी गंभीर अथवा सामान्य घटनेची कव्हरेज करण्यासाठी उपस्थित राहावे लागते. समाजातील घडामोडी, अपघात, गुन्हेगारी, सांस्कृतिक वा सामाजिक घटना यांची माहिती पत्रकार तात्काळ जनतेपर्यंत तसेच प्रशासनापर्यंत पोहोचवतात. अशा परिस्थितीत प्रेस क्लबची सुसज्ज व आधुनिक इमारत ही पत्रकारांसाठी केवळ एक कार्यालयीन जागा नसून, त्यांच्या कार्याची पायाभरणी आणि सतत उपयुक्त ठरणारे केंद्र ठरते.

सध्या दसरा चौक येथे असलेला प्रेस क्लब अत्यंत लहान व अपुरा आहे. त्यामुळे पत्रकारांच्या दैनंदिन कार्याला व पत्रकार परिषदा घेण्यास अडचणी निर्माण होतात. जिल्ह्याच्या वाढत्या गरजा लक्षात घेता, एक अद्ययावत, आधुनिक प्रेस क्लब इमारत उभारणे अत्यावश्यक आहे.
१. मुख्य इमारत
किमान २०,००० ते २५,००० चौ.फुट बांधकाम क्षेत्र.
तळमजला + ३ मजले.
प्रशस्त पार्किंगची सोय.

२. पत्रकार परिषद हॉल्स
मोठा सभागृह (५०० आसन क्षमता).
मध्यम व लहान हॉल्स (५०–१५० आसन क्षमता).
डिजिटल ऑडिओ-व्हिज्युअल व मल्टिमीडिया सुविधा.

३. तांत्रिक सुविधा
हाय-स्पीड इंटरनेट व वाय-फाय.
आधुनिक ऑडिओ-व्हिज्युअल स्टुडिओ.
व्हिडिओ कॉन्फरन्सिंग रूम.
मीडिया सेंटर व न्यूज प्रॉडक्शन युनिट.

४. पत्रकारांसाठी सोयी
कार्यकक्ष व सामायिक डेस्क.
वाचनालय व डिजिटल मीडिया आर्काईव्ह.
राष्ट्रीय पातळीवरील पत्रकारांसाठी गेस्ट हाऊस स्वरूपात १०–१५ रूम्स.
कॅफेटेरिया व विश्रांती गृह.

५. सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांसाठी जागा
लहान ऑडिटोरियम.
प्रशिक्षण हॉल्स (मीडिया ट्रेनिंग व कार्यशाळा).

६. सुरक्षा व इतर सुविधा
सीसीटीव्ही कॅमेरे व फायर सेफ्टी सिस्टम.सोलर पॅनल्स व पर्यावरणपूरक ऊर्जा वापर.
दिव्यांगांसाठी सुलभ प्रवेश.

जागेची गरज :
किमान २ ते २.५ एकर जागा.
प्रशस्त अंगण, पार्किंग, बाग व खुल्या जागेची मोकळीक.
जागा शहराच्या मध्यवर्ती व सरकारी कार्यालयांच्या जवळ असणे योग्य ठरेल.

इतर राज्यांतील प्रेरक उदाहरणे

१. हैदराबाद (तेलंगणा) – राज्य सरकारने ₹२० कोटी खर्च करून अत्याधुनिक प्रेस क्लब उभारण्याची घोषणा केली.
२. खम्मम (तेलंगणा) – २०० चौ. यार्ड जागेवर ₹४५ लाखात आधुनिक प्रेस क्लब.
३. दुर्गापूर (प. बंगाल) – राज्य प्राधिकरणाने ₹१ कोटी खर्च करून, मोफत जागेत प्रेस क्लब इमारत दिली.
४. रांची (झारखंड) – मुख्यमंत्रींनी प्रेस क्लब भवन उद्घाटन केले, ज्यात लायब्ररी, जिम अशा सुविधा आहेत.
५. तिरुवनंतपुरम (केरळ) – १९६९ मध्ये उद्घाटन झालेले प्रेस क्लब, आता प्रशिक्षण केंद्र व मीडिया स्टुडिओसह आधुनिक सुविधा.
६. राजौरी (जम्मू-कश्मीर) – जिल्हा प्रशासनाने प्रेस क्लब स्थापन करून पत्रकारांना संस्थात्मक आधार दिला.
७. पेंड्रा (छत्तीसगड) – ₹५० लाख खर्च करून प्रेस क्लब भवन व वाचन कक्ष बांधण्यात आला.
या उदाहरणांवरून स्पष्ट होते की, भारतातील विविध राज्यांमध्ये शासकीय स्तरावर पत्रकारांसाठी आधुनिक प्रेस क्लब इमारती उभारण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातही अशीच भव्य व आधुनिक इमारत उभारणे आवश्यक आहे.

अतिरिक्त मुद्दा :-

स्वतंत्र पद्धतीने पत्रकारिता करणारे पत्रकार (यूट्युब चॅनेल्सद्वारे कार्यरत असलेले, छोटे साप्ताहिक किंवा मासिक वृत्तपत्र काढणारे, तसेच फ्रीलान्स पत्रकार) यांनाही या प्रेस क्लब इमारतीचा उपयोग समान हक्काने व्हावा.

मागणी :-

१. कोल्हापूर जिल्हा व शहराच्या प्रतिष्ठेस अनुरूप भव्य, आधुनिक, सुसज्ज प्रेस क्लब इमारत उभारावी.
२. या इमारतीसाठी आवश्यक ती शासकीय जागा व निधी उपलब्ध करून द्यावा.
३. या प्रकल्पाला विशेष प्राधान्याने मंजुरी द्यावी.

निष्कर्ष :-

पत्रकार हे लोकशाहीचे चौथे स्तंभ आहेत. त्यांच्या जबाबदाऱ्या २४ तास चालणाऱ्या, समाजहिताशी निगडित व प्रशासनाशी थेट जोडलेल्या असतात. कोल्हापूरच्या पत्रकारांना आधुनिक, सुरक्षित व सुसज्ज प्रेस क्लब मिळाल्यास ते केवळ पत्रकारांनाच उपयुक्त ठरणार नाही, तर कोल्हापूर जिल्ह्याची सामाजिक, सांस्कृतिक, प्रशासकीय आणि राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठा उंचावेल.
असे हिंदू जनसंघर्ष समितीने दिलेल्या मागणी निवेदनात म्हटले आहे.‌ यावेळी सुनील सामंत, अभिजीत पाटील, आनंदराव पवळ, कविराज कबुरे, राजेंद्र तोरस्कर , संभाजी थोरवत, महेश पोवार, अजय सोनवणे, सुरेश जाधव, श्रीकांत पाटील आदी उपस्थित होते
.‌

🛑 वन्यप्राण्यांच्या उपद्रव्याबाबत संयुक्त बैठकीचे आयोजन करावे.- उबाठा सेनेचे निवेदन

आजरा.- प्रतिनिधी.

Oplus_131072

आजरा, चंदगड या दोन तालूक्यात हत्तीसह अन्य वन्यप्राण्यांच्या त्रासामुळे शेतकरी वर्ग अस्वस्थ आहे. याबाबत
उबाठा सेनेने वनविभाग कोल्हापूर यांना निवेदन दिले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.‌
गेल्या दशकभरापासून वन्यप्राण्यांनी खासकरून हत्तीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान केले आहे. दरवर्षी हा प्रश्न केवळ चर्चेत येत असतो. शासनाने या प्राण्यांचा कायमस्वरूपात बंदोबस्त करावा अशी मागणी सातत्याने होऊन देखील शासनाने हा प्रश्न गांभियनि घेतलेला नाही. विधासभेच्या अध्यक्षपदावर बाबासाहेब कुपेकर असल्यापासून विधीमंडळाच्या व्यासपीठावर या प्रश्नांची वारंवार चर्चा झाली आहे. हत्तींच्या बंदोबस्तासाठी आंबोलीनजीक हत्तीग्राम उभारण्याचा प्रकल्प तत्कालीन कोकणचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केली होती. घोषणे पलिकडे काहीच प्रगती झाली नाही. हत्तीच्या त्रासामुळे शेतकरी वर्ग दहशतीखाली आहे. रात्रीच्यावेळीच नव्हेतर दिवसासुद्धा आपल्या शेताकडे जाण्यासाठी शेतकरी वर्ग एका भितीच्या छायेखाली आहे. अलिकडे हे हत्ती त्यात खासकरून टस्कर नागरी वसाहतीत येऊन हल्ले करीत आहेत. या हत्तीशिवाय गवे, रानडुक्कर आणि अन्य प्राण्याकडून पिकांचे नुकसान होत आहे. ही परिस्थिती लक्षात घेता या संदर्भात उपाययोजना तातडीने आणि गांभियनि होण्याची गरज आहे. त्यासाठी आपण आजरा कार्यालयात संयुक्त बैठकीचे आयोजन करून उपाययोजनेबाबत आराखडा तयार करावा आणि शासनाचे लक्ष वेधावे अशी मागणी या निवेदनातून करीत आहोत.

हत्तीग्राम झाल्यानंतर गोवा आंबोली येथे येणाऱ्या पर्यटकांचेसुद्धा हे आकर्षण ठरून पर्यटन व्यवसायाला चालना मिळू शकते. सर्व बाजूनी या विषयाचा अभ्यास करून उपाययोजनेसंदर्भात आराखडा करण्यासाठीच ही बैठक महत्वाची असल्याने आपण तातडीने आठवडाभरात या बैठकीचे आयोजन करावे. अशी मागणी केली आहे. या निवेदनावर जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे, ता. प्रमुख युवराज पोवार, अजित खोत शिवाजी पाटील यांच्या सह्या आहेत.

🟣 स्व.रावसाहेब शामराव देसाई सहकारी गृहतारण संस्थेची
( पंचवार्षिक निवड्छुक बिनविरोध.)

आजरा.- प्रतिनिधी.

Oplus_131072

स्व. रावसाहेब शामराव देसाई सहकारी गृहतारण संस्थेची पंचवार्षिक निवडणूक ( सन – २०२५ – २०३० ) बिनविरोध पार पडली. या कामी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री. प्रमोद फडणीस यांनी काम पाहिले व सुजयकुमार येजरे सहाय्यक निबंधक आजरा तालुका यांचे सहकार्य लाभले. यानंतर संस्थेच्या चेअरमन पदी इंद्रजित देसाई यांचे नाव श्रीधर गोरे यांनी सुचविले त्यास सदानंद देसाई यांनी अनुमोदन दिले. तर व्हा. चेअरमन पदी अवधूत यशवंत शिंदे यांचे नाव श्रीकांत कळेकर यांनी सुचविले त्यास शिवाजी गुरव यांनी अनुमोदन दिले. यावेळी श्री येजरे सहाय्यक निबंधक, आजरा तालुका यांचे हस्ते चेअरमन व व्हा. चेअरमन निवडीची पत्रे देऊन सत्कार करणेत आला, यावेळी सर्व संचालक श्रीधर गोरे, श्रीकांत कळेकर, सदानंद देसाई, अमित निकम, ज्ञानदेव गावडे, शिवाजी गुरव,शिवाजी खवरे, सौ. मंगल निर्मळे, सौ. स्वाती कुंभार व सर्व कर्मचारी उपस्थित होते

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.