🟥चक्रभेदी संस्थेमार्फत साडवली येथे विधवा निराधार महिलांसाठी मायेचं हक्काचं घर निवारा केंद्र सुरू
🟣लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन.- लष्कराचे ३ जवान शहीद.- अनेकजण ढिगाऱ्याखाली.- बचावकार्य सुरू
🟥चक्रभेदी संस्थेमार्फत साडवली येथे विधवा निराधार महिलांसाठी मायेचं हक्काचं घर निवारा केंद्र सुरू
चक्रभेदीने निवारा केंद्र सुरू केले हे सर्वोत्तम मानवी मूल्य जपण्याचे संवेदनशील काम आहे.- जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते
देवरूख :- प्रतिनिधी
कोकणात रोजगाराच्या खुप संधी आहेत. शासन नवीन नवीन योजना राबवित आहेत. आपण त्या योजनांची माहिती घेऊन रोजगार सुरू केला पाहिजे. चक्रभेदी संस्थेमार्फत विधवा निराधार महिलांसाठी मायेचं हक्काचं घर निवारा केंद्र सुरु करण्यात आले आहे हे काम सर्वोत्तम मानवी मूल्य जपण्याचे संवेदनशील काम असल्याचे गौरवोद्गार जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी संगमेश्वर तालुक्यातील साडवली येथे काढले.
चक्रभेदी सोशल फाउंडेशन संस्था विधवा व एकल महिलांसाठी व पर्यावरण या विषयावर काम करणारी संस्था आहे. या संस्थेमार्फत निराधार महिलांसाठी साडवली गंगाधरनगर येथे मंगळवारी निवारा केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी श्री सातपुते बोलत होते. यावेळी गटविकास अधिकारी विनोदकुमार शिंदे, शिवसेना तालुकप्रमुख प्रमोद पवार, सौ नेहा माने, सौ मृणाल शेट्ये, वैदेही सावंत, निलेश चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना श्री सातपुते म्हणाले की, संगमेश्वर तालुक्यासाठी बांबू केंद्र मंजूर करण्यात आले आहे.
बांबू लागवड करण्यासाठी शेतकऱ्याला सात लाख रूपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. वय वाढत गेलं की वयोवृध्द व्यक्तीना मानसिक आधाराची गरज असते ती गरज हे निवारा केंद्र पूर्ण करेल असे सौ नेहा माने यांनी सांगितले. निवारा केंद्रामुळे निराधारांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण होणार आहे. भविष्यात विधवा हा शब्द दूर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे विनोद कुमार शिंदे यांनी सांगितले. निवारा केंद्रासाठी रावसाहेब चौगुले यांनी स्वतः चे घर दिले आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैदेही सावंत यांनी केले तर सुत्रसंचालन युयुस्तू आर्ते यांनी केले.
🟣लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन.- लष्कराचे ३ जवान शहीद.- अनेकजण ढिगाऱ्याखाली.- बचावकार्य सुरू
लेह :- वृत्तसंस्था
लडाखमधील सियाचीन ग्लेशियरवर एका मोठ्या हिमस्खलनात भारतीय लष्कराचे तीन जवान शहीद झाले आहेत. ही जगातील सर्वात उंच युद्धभूमी आहे, जिथे सैनिकांना -६० अंश थंडी, जोरदार वारे आणि बर्फाच्छदित आव्हानांचा सामना करावा लागतो. आज येथे झालेल्या हिमस्खलनात वादळ एका लष्करी चौकीवर आदळले. त्यामुळे तीन जवानांना वीरमरण आले. लेह आणि उधमपूरची मदत घेत लष्कराच्या बचाव पथकांनी तात्काळ बचावकार्य सुरू केले आहे.
हिमस्खलनाची बातमी मिळताच, भारतीय सैन्य आणि हवाई दलाने तातडीने बचाव कार्य सुरू केले. विशेष हिमस्खलन बचाव पथके (एआरटी) घटनास्थळी पोहोचली, जी बर्फात गाडलेल्या सैनिकांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. हे पथक लेह आणि उधमपूर येथून समन्वय साधत आहेत. जखमींना बाहेर काढण्यासाठी आणि त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी चित्ता आणि एमआय-१७ सारख्या लष्कराच्या हेलिकॉप्टरचा वापर केला जात आहे. सियाचीनमध्ये अशा आपत्कालीन परिस्थितीसाठी सैन्य नेहमीच तयार असते, परंतु बर्फ आणि थंडीमुळे बचाव कार्य अत्यंत आव्हानात्मक होऊन बसते.
हिवाळ्यात सियाचीनमध्ये हिमस्खलन होणे सामान्य आहे. १९८४ मध्ये ऑपरेशन मेघदूत झाल्यापासून, हवामानामुळे १,००० हून अधिक सैनिक शहीद झाले आहेत. काराकोरम पर्वतरांगेत २०,००० फूट उंचीवर असलेले सियाचीन ग्लेशियर येथे घडलेली बातमी अतिशय हृदयद्रावक आहे. अशा घटना यापूर्वी सियाचीनमध्ये घडल्या आहेत. पण यावर अद्याप तोडगा निघालेला नाही. जोरदार वारे, हिमवादळे आणि हिमस्खलन हे येथे सामान्य आहे. पण त्यापासून जवानांचा बचाव कसा करता येईल, याबाबत अद्याप ठोस बचाव पर्याय मिळू शकलेले नाहीत. हिमस्खलन उत्तरेकडील हिमनदी प्रदेशात झाले, जिथे उंची १८,००० ते २०,००० फूट आहे. या भागात सैनिकांना केवळ शत्रूशीच नाही, तर निसर्गाच्या प्रकोपाशीही लढावे लागते.
