Homeकोंकण - ठाणेअजित पवारच जलसंपदा घोटाळय़ाचे सूत्रधार.- तत्कालीन मुख्य अभियंता विजय पांढरे यांचा गंभीर...

अजित पवारच जलसंपदा घोटाळय़ाचे सूत्रधार.- तत्कालीन मुख्य अभियंता विजय पांढरे यांचा गंभीर आरोप!🟥सोशल मिडियावरील बंदी मागे घेतल्यानंतरही नेपाळमध्ये आंदोलनाचा भडका कायम.- आंदोलकांनी संसद भवन पेटवले.- परिस्थिती नियंत्रणाबाहेर.- पंतप्रधानांचा राजीनामा.

🟥अजित पवारच जलसंपदा घोटाळय़ाचे सूत्रधार.- तत्कालीन मुख्य अभियंता विजय पांढरे यांचा गंभीर आरोप!
🟥सोशल मिडियावरील बंदी मागे घेतल्यानंतरही नेपाळमध्ये आंदोलनाचा भडका कायम.- आंदोलकांनी संसद भवन पेटवले.- परिस्थिती नियंत्रणाबाहेर.- पंतप्रधानांचा राजीनामा.

🟣अजित पवारच जलसंपदा घोटाळय़ाचे सूत्रधार.- तत्कालीन मुख्य अभियंता विजय पांढरे यांचा गंभीर आरोप!

मुंबई :- प्रतिनिधी

राज्यातील सिंचन घोटाळ्याचे अजित पवार हे खरे सूत्रधार होते. त्याचवेळी उच्चस्तरीय चौकशी नेमून त्यांच्यावर कारवाई केली असती तर ते तुरुंगात गेले असते. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे पाप लपवले आणि त्याला पंतप्रधान मोदी यांनी पाठिंबा दिला, असा गंभीर आरोप जलसंपदा विभागाचे तत्कालीन मुख्य अभियंता विजय पांढरे यांना केला आहे. विजय पांढरे यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत अजित पवार यांच्याविरोधात जलसंपदा घोटाळ्याच्या आरोपांचा पुनरुच्चार केला आहे. सिंचन घोटाळाप्रकरणी अजित पवार यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यावेळी काँग्रेसने त्यांची चौकशी लावण्याचा प्रयत्न केला तर सरकार पाडण्यात आले, असे विजय पांढरे यांनी म्हटले आहे.

माधवराव चितळे समितीने जलसिंचन घोटाळ्याच्या अहवालात भ्रष्टाचाराबाबत पुरेशा गोष्टी नमूद केल्या होत्या. चितळे यांनी एका मुलाखतीत बोलताना सांगितले होते की, याप्रकरणात चौकशीसाठी उच्चस्तरीय चौकशी नेमली पाहिजे. मात्र, सरकारने चितळे समितीचा अहवालही लपवून ठेवला. चितळे यांनी म्हटले होते की, मी दिलेल्या अहवालानुसार कारवाई केली तर अजित पवार जेलमध्ये जातील. मात्र, अजित पवारांचे जलसिंचन घोटाळे लपवण्याचे काम फडणवीस यांनी केले, यामध्ये शंका नाही, सिंचन घोटाळ्यात अजित पवारांना पाठीशी घालणारी दुसरी व्यक्ती म्हणजे नरेंद्र मोदी, असेही विजय पांढरे यांनी म्हटले आहे.

🅾️अद्याप नागपूर खंडपीठाची क्लीन चिटला मान्यता नाही

देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना सिंचन घोटाळ्याच्या प्रकरणात क्लीन चिट देण्याचे काम केले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अजित पवार यांना सिंचन घोटाळ्यात क्लीन चिट दिल्याची लेखी माहिती नागपूर खंडपीठासमोर दिली. मात्र, अद्याप नागपूर खंडपीठाने ती क्लीन चिट मान्य केलेली नाही. सध्या या प्रकरणाची सुनावणी होत नाही ही खरी अडचण आहे, असे विजय पांढरे यांनी सांगितले.

🟥सोशल मिडियावरील बंदी मागे घेतल्यानंतरही नेपाळमध्ये आंदोलनाचा भडका कायम.- आंदोलकांनी संसद भवन पेटवले.- परिस्थिती नियंत्रणाबाहेर.- पंतप्रधानांचा राजीनामा.- आंदोलकांनी अनेक मंत्र्यांची घरे जाळली.

काठमांडू :- वृत्तसंस्था

Oplus_131072

नेपाळमध्ये मोठी अनागोंदी माजली असून आक्रमक झालेल्या युवकांनी नेपाळची संसद पेटवली आहे. त्याचसोबत नेपाळच्या न्यायालयाच्या परिसरातही आग लावण्यात आली. तसेच युवकांनी नेपाळच्या मंत्र्यांची घरांवरही हल्ला केला असून जिकडे तिकडे नुसता गोंधळ माजल्याचं दिसून येतंय. नेपाळमधील आंदोलनानंतर मंत्र्यांनी देश सोडायला सुरूवात केली आहे. तर नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. तर बालेन शाह यांनी नवीन सरकार बनवण्यासाठी हालचाली सुरू केल्याची माहिती आहे.

🟥नेपाळमध्ये सरकारने सोशल मीडियावर निर्बंध लादण्याचं कारण झालं आणि तरुणाई आक्रमक झाली. त्यानंतर आंदोलकांनी नेपाळच्या संसदेवर मोर्चा नेला, अनेक ठिकाणी हिंसा झाली. त्यानंतर सोशल मीडियावरील बंदी मागे घेतली असली तरी आंदोलक मागे हटायला तयार नाहीत. नेपाळमधील भ्रष्टाचार संपवावा, पोलिस व्यवस्थेत सुधारणा व्हावी यासह अनेक मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत. या मागण्यांसाठी आंदोलकांनी संसदेच्या आवारात आग लावली. तसेच मंत्र्यांच्या घरांनाही आग लावली. त्यामुळे नेपाळमध्ये सध्या फक्त आगीचं आणि धुराचं साम्राज्य असल्याचं दिसून येत आहे. नेपाळची राजधानी काठमांडू इथे सरकारविरोधात कमालीचा हिंसाचार पेटला आहे. पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्यासह नेपाळच्या गृहमंत्री, आरोग्य मंत्री, कृषिमंत्र्यांसह दहा मंत्र्यांनी राजीनामा दिला.

उपचाराचं कारण देत केपी ओली दुबईत पळ काढण्याच्या तयारीत असल्याचं समजतं. दुसरीकडे आंदोलकांनी राष्ट्रपतींच्या घरावर कब्जा करत तिथे नासधूस, तोडफोड केली. घरातल्या अनेक गोष्टी आंदोलकांनी लुटून नेल्याचं उघड झालं. दरम्यान उर्जामंत्री दीपक खडकांच्या घराबाहेर आंदोलकांनी नेपाळी चलनाच्या नोटा उधळल्या. खरंतर सोमवारी झालेल्या हिंसाचारानंतर सरकारने सोशल मीडियावरील बंदी मागे घेण्याचं जाहीर केलं. मात्र आंदोलक आता मागे हटायला तयार नाहीत. देशात हिंसाचाराची आणि आंदोलकांच्या मृत्यूची जबाबदारी घेत केपी शर्मा ओली सरकारने राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली होती. त्यावरून पुन्हा हिंसाचार सुरू झाला. तरुणाईच्या उद्रेकानंतर अखेर नेपाळमध्ये पंतप्रधान ओलींना राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे नेपाळमध्ये अखेर सत्तांतर होणार आहे. बालेन शाह यांचं नाव पंतप्रधानपदासाठी सर्वात आघाडीवर आहे. बालेन शाह नेपाळी रॅपर, म्युजिक कंपोजर आणि काठमांडूचे महापौर आहेत. एक तरुण चेहरा म्हणून बालेन शाह यांच्याकडे पाहिलं जातं आहे. बालेन शाह यांनी तरुणाच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. लष्करानं सूत्र हाती घेतल्यानंतर बालेन शाह यांच्याकडे अंतरिम पंतप्रधानपद दिलं जाण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.