Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रघरगुती गॅस सिलिंडर घेताना घ्यावयाची दक्षता " - गॅसचा वापर करताना कंपनीने...

घरगुती गॅस सिलिंडर घेताना घ्यावयाची दक्षता ” – गॅसचा वापर करताना कंपनीने दिलेल्या सूचनेचे पालन करा.- आजरा तहसीलदार समीर माने

घरगुती गॅस सिलिंडर घेताना घ्यावयाची दक्षता ” – गॅसचा वापर करताना कंपनीने दिलेल्या सूचनेचे पालन करा.- आजरा तहसीलदार समीर माने

आजरा.- प्रतिनिधी.

कोल्हापूर शहरात व महागाव, ता. गडहिंग्लज येथे शनिवारी दि. ०६ सप्टेंबर २०२५ रोजी घरगुती गॅस सिलिंडरमधून गळती होवून स्फोट झाला. कोल्हापूर येथे झालेल्या गॅस गळतीने जीवितहानी झाली. असून महागाव येथे गॅस गळतीने झालेल्या स्फोटातून भलेही जीवीतहानी टळली असली तरी घराचे व प्रापंचिक वस्तूंचे प्रचंड नुकसान झाले आहे.

वरिल प्रकार आजरा तालुक्यामध्ये घडू नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून तहसिल कार्यालय (पुरवठा) आजरा येथील पुरवठा निरिक्षक संदिप चव्हाण यांनी आज दि. ०८/९/२०२५ रोजी रवळनाथ इंडेन या गॅस एजन्सीची मुंगुसवाडी, खेडे येथे असलेल्या सिलेंडर साठा गोदामास भेट देवून तपासणी केली. तपासणी वेळेस सदर गॅस वितरणाचे विक्रेते मानसिंग देसाई उपस्थित होते.
तपासणी वेळेस गोदामातील सिलेंडर तपासले गेले तसेच गळती लागलेले सिलेंडर कंपनीकडून प्राप्त झाल्यास तात्काळ परत करण्याचे व ग्राहकास गळती असलेले सिलेंडर देवू नये तसेच गॅस सिलेंडर वितरीत करताना गॅस गळतीबाबत घ्यावयाची खबरदारीबाबत गॅसधारकास माहिती करुन देण्याच्या सुचना गॅस वितररकास देणेत आल्या.

आजरा तालुक्यातील सर्व गॅस ग्राहकांना आवाहन करण्यात येते की, सिलेंडर मधून गॅस गळती होत असल्याचे आढळल्यास तात्काळ गॅस एजन्सीस संपर्क करावा. अधिकृत गॅस एजन्सीकडून गॅस रेग्युलेटर व गॅस पाईप जोडून घ्यावे व तसेच वेळोवेळी शेगडी, रेग्युलेटर, गॅस पाईप याची गॅस एजन्सीकडून तपासणी करुन घेणेत यावी. तपासणीचे वेळी रवळनाथ गॅस एजन्सीचे विक्रेते श्री. देसाई यांनी भविष्यात गॅस बाबतीत कोणतीही समस्या उद्भवू नये करीता कंपनीने उत्पादित केलेले फायबर मध्ये निर्माण केलेले १० किलो गॅस असलेले सिलेंडर वापरण्याचे सुचित केले जे हाताळणीस सुलभ असेल व गॅस गळती व स्फोट हा प्रकार होण्याचा प्रकार फारच कमी राहील.

आजरा तहसीलदार समीर माने यांनी तालुक्यातील सर्व गॅस धारकांना आवाहन केले आहे. की, गॅसचा वापर करताना कंपनीने दिल्या गेलेल्या सुचनेनसार हाताळणी करण्यात यावी जेणेकरुन तालुक्यात कोणतीही गॅस दुर्घटना घडू नये.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.