Homeकोंकण - ठाणेआजरा साळगाव- गजरगाव अतिवृष्टी भागात.- कडक उन्हातही.- पालकमंत्री. सतेज पाटील यांचा दौरा.

आजरा साळगाव- गजरगाव अतिवृष्टी भागात.- कडक उन्हातही.- पालकमंत्री. सतेज पाटील यांचा दौरा.

आजरा. प्रतिनिधी. ०८

आजरा तालुक्यात जुलै महिन्यामध्ये आलेल्या अतिवृष्टी व पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आज दि. ८ रोजी आजरा तालुक्यातील साळगांव, गजरगांव परिसरातील नुकसानग्रस्त भागाची पालकमंत्री. सतेज पाटील यांनी पाहणी केली.
अतिवृष्टीमुळे आजरा तालुक्यातील हिरण्यकेशी नदीतील वाळू, दरड, गोटे शेतामध्ये आल्याने शेतामध्ये मोठ्या चरी निर्माण झाल्याने नदीकाठावरील भात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यातील सर्व नुकसानग्रस्त भागातील सर्व पंचनामे ताबडतोड पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासकीय अधिकारी यांना करण्यात आल्या आहेत.
आजरा तालुक्यामध्ये भात हे मुख्य पीक आहे. मात्र चालूवर्षी अतिवृष्टीने भात पिकालाच धोका जास्त पोहचला आहे. पेरणोली, साळगाव, चांदेवाडी, हाजगोळी, पेद्रेवाडी गजरगाव, निंगुडगे, सरोळी, बोलकेवाडी व हत्तिवडे या ठिकाणी हिरण्यकेशी नदी काठावरील भट पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

हिरण्यकेशी नदीला आलेल्या पुरामुळे साळगांव गावातील प्राथमिक शाळेमध्ये पाणी आल्याने शालेय साहित्याचे नुकसान झाले आहे. तसेच, काही शेतकरी बांधवांचे पाणी उपसा करणारे मोटरींची ही नुकसान झाले आहे.
गजरगांव गावातील ग्रामस्थानाचा पुनर्वसनाचा प्रश्न लवकरत लवकर मार्गी लावण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सविस्तर आराखडा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच सर्व पूरग्रस्त नागरिकांच्या पाठीशी राज्यसरकार भक्कमपणे उभे असून सर्वोतोपरी मदत करणार असल्याचे सांगत दिलासा दिला.

यावेळी, आमदार राजेश पाटील, जि.प.उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी, मुकुंदराव देसाई, विजयराव देवणे, सुनील शिंत्रे, उमेश आपटे, आजरा नगराध्यक्षा ज्योत्स्ना पाटील, आजरा सभापती उदय पोवार, अंजना रेडेकर, विध्याधर गुरबे, आजरा साखर कारखानाचे व्हा.चेअरमन आनंदराव कुलकर्णीं, सुभाष दोरुगडे, विष्णुपंत केसरकर, कॉ. संपत देसाई, सुधीर देसाई, साळगांव सरपंच पूजा कांबळे, गजरगांव सरपंच आक्काताई पाटील, राजू पाटील उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.