आजरा. प्रतिनिधी. ०८.
आजरा तालुक्यातील काही गावात दि. ०८ रोजी पहाटे टस्कर हत्ती मौजे हिरलगे गावा नजिक आल्याची माहिती नागेश खोराटे वनरक्षक गडहिंग्लज यांना मिळाली. त्यांनी सदरची माहिती वनक्षेत्रपाल आजरा यांना दिली. त्यानुसार वनपाल गडहिंग्लज, दक्षिण आजरा, उत्तर आजरा यांना फोन वरून संपर्क साधून घटनास्थळी पोहचून कार्यवाही करणेस सूचना दिल्या. घटनास्थळी स्टाफ पोहचताच हत्ती मौजे खोराटवाडी फाट्यावर अपर्णा हॉटेल जवळ आला. वनकर्मचारी यांनी हत्तीला तिथून हुसकावून मासेवाडी गावाहून मडिलगे जंगल क्षेत्रा चे दिशेने हुसकावण्याचा प्रयत्न केला असता हत्ती मासेवाडी गावाकडे न जाता खोराटवाडी गावाच्या मनुष्य वस्ती तुन भादवण मार्गे गडहिंग्लज – आजरा राज्यमार्गाने मौजे मडिलगे येथील बसस्थानका नजिक पोहोचला मागोमाग शासकीय वाहन घेऊन वनकर्मचारी व नागेश खोराटे, रणजित पाटील, जितेंद्र साबळे आदी वनरक्षक चालत लोकांना रस्त्यावरून बाजूला करत हत्तीला कोणतीही इजा न करता जंगलाच्या दिशेने हुसकावत होते. बघ्याची गर्दी वाढली गर्दी बघून हत्ती बिथरू नये म्हणून वनक्षेत्रपालं आजरा यांनी पोलीस निरीक्षक आजरा यांना फोन करून मदत मागून घेतली तोपर्यंत हत्ती मौजे खेडे गावातून हिरण्याकेशी नंदी पार करून हाजगोली गावाकडे सरकला तात्काळ वनकर्मचारी, पोलीस वाहणने मौजे हजगोळी गावात पोहचले तिथून पोलिसांनी बघ्याची गर्दी हटवली व वनवीभागचे कर्मचारी यांनी हत्ती ला हजगोळी जंगलाकडे हुसकावून लावले. हत्ती पुढे मागोमाग कर्मचारी हत्तीने आलेल्या वाटेने परतीचा प्रवास सुरु केला चांदेवाडी जंगलातून सुलगाव रेंज कार्यालया समोरून रामतीर्थ मार्गे जंगल क्षेत्रातून मसोली हळोली कडे रवाना झाला. असून वनकर्मचारी यांच्या तीन टीम मागोवा घेत असून हत्ती ला त्याच्या अधिवासात सुरक्षित पोहचविण्याचे काम सुरु आहे. याबाबत वन अधिकारी स्मिता डाके यांनी माहिती दिली.
【 शासनाकडुन वन्य प्राणी हुस्कलून वन्य प्राण्याचा बदोबस्त किंवा विशेष यंत्रसामुग्री नसल्यामुळे वन विभागाला वन्य प्राणी मनुष्यवस्तीत किंवा शेत पिकात गेल्यानंतर हुस्कलून लावणेकामी पुरेशी यंत्रसामग्री यंत्रणा नसल्यामुळे वन कर्मचारी यांना नाहक त्रास होत आहे. शासनाने वन्यप्राणी हुस्कवलण्यासाठी पुरेशी यंत्रसामग्री देण्यात यावी अशी मागणी वन कर्मचारी संघटना यांच्याकडून केली जात आहे.
कृष्णा डेळेकर. अध्यक्ष. वन कर्मचारी संघटना. 】
