🛑भादवण हायस्कूल.- प्रशालेमध्ये डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती (शिक्षक दिन) व डॉ. जे. पी नाईक जन्मदिन उत्साहात साजरा.
🟣विघ्नहर्ता गणेशोत्सव मंडळ वेळवटी आयोजित रक्तदान शिबिर संपन्न.
🟣व्यंकटराव शिक्षण संकुलात शिक्षक दिन उत्साहात संपन्न.
🛑भादवण हायस्कूल.- प्रशालेमध्ये डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती (शिक्षक दिन) व डॉ. जे. पी नाईक जन्मदिन उत्साहात साजरा.
आजरा .- प्रतिनिधी.

भादवण हायस्कूल,भादवण येथे डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती, महंमद पैगंबर तसेच डॉ.जे.पी.नाईक यांचा जन्मदिन उत्साहात साजरा करण्यात आला.
मुख्याध्यापक आर. जी. कुंभार यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन मुख्याध्यापक श्री. कुंभार यांनी शिक्षकांप्रती आदर व्यक्त केला.
डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या कार्याची माहिती व महम्मद पैगंबर यांच्या जीवन कार्याविषयी माहिती सहाय्यक शिक्षक पी. एस. गुरव यांनी सांगितली. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे थोर शिक्षणतज्ज्ञ डॉ. जे. पी. नाईक यांच्या कार्याची माहिती शिक्षिका बी. पी. कांबळे यांनी विद्यार्थ्यांना करून दिली. उद्या असणाऱ्या अनंतचतुर्दशी निमित्त आपण पर्यावरणपूरक गणपती विसर्जन व निर्माल्य संकलन करण्याविषयी विद्यार्थ्यांना आर. पी. होरटे यांनी आवाहन केले. ईद-ए-मिलाद सणाच्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच शिक्षकदिन व उद्या असणाऱ्या अनंत चतुर्दशी निमित्त सर्व बांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या.
प्रशालेतील सर्व शिक्षक वृंद,इयत्ता नववी,दहावीचे विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.फलकलेखन पी एस गुरव यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी. एम. वडर व आभार व्ही.एस.कोळी यांनी मानले.
🟣विघ्नहर्ता गणेशोत्सव मंडळ वेळवटी आयोजित रक्तदान शिबिर संपन्न.
आजरा.- प्रतिनिधी.

आरोग्य मंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. प्रकाश आबिटकर यांच्या अवाहनाला प्रतिसाद देत विघ्नहर्ता गणेशोत्सव मंडळ वेळवटी येथे रक्तदान शिबिर आयोजित केले होते.
या शिबिराचे उद्घाटन ग्रामपंचायत सदस्य इंद्रजीत देसाई व विश्वजीत देसाई यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष रवींद्र गोरे, उपाध्यक्ष संभाजी कुंभार, खजिनदार श्रीधर गोरे, ज्येष्ठ नागरिक आप्पासाहेब देसाई, ज्ञानदेव गावडे, सागर शिंदे, शिवाजी गुरव, बबन गुरव, हर्षवर्धन शिंदे, सतीश कुंभार, आदित्य कविटकर, दत्तात्रय कुंभार, सागर पोवार, महेश मांगले, ज्ञानदेव प्रभू, संजय कळेकर, आशुतोष पोवार तसेच मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या शिबिरात ४० रक्तदात्यांनी रक्तदान केले.
🟣व्यंकटराव शिक्षण संकुलात शिक्षक दिन उत्साहात संपन्न.
आजरा : – प्रतिनिधी.

येथील आजरा महाल शिक्षण मंडळ आजरा संचलित व्यंकटराव शिक्षण संकुल आजरा येथे ५ सप्टेंबर शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती व दुसरे राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन व आपल्या आजरा तालुक्यातील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे, देशातील तीन शिक्षण तज्ञापैकी एक महान शिक्षण तज्ज्ञ डॉ. जे पी नाईक यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य एम एम नागुर्डेकर व पर्यवेक्षिका सौ.व्ही. जे. शेलार यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रती आपले विचार मांडले व सर्व शिक्षकांना नमन करून पुष्प भेट दिले. प्राचार्य एम एम नागुर्डेकर यांनी डॉ. जे पी नाईक यांचे भारताच्या शिक्षण क्षेत्रातील योगदान व डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवन कार्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. गुरुचे प्रत्येकाच्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणूनच गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा असे म्हटले जाते. आई ही प्रथम गुरू त्यानंतर आपल्या जीवनात क्षणाक्षणाला दिशा, मार्गदर्शन आकार देणारे हे वयाने लहान असणारे देखील गुरुस्थानी पोहोचतात.. त्यामुळे प्रत्येकाजवळ नम्रता, आदर, संयम असणे आवश्यक आहे . व्यंकटराव शिक्षण संकुलातील अध्यक्ष जयवंतराव शिंपी व सर्व संचालक मंडळ हे आम्हा शिक्षक शिक्षकेतर बंधू-भगिनींना मार्गदर्शन , आधार देणारे हे नेहमीच आमच्या सर्वांच्या गुरुस्थानी आहेत असे सांगितले. कार्यक्रमाचे नियोजन इयत्ता दहावी क वर्गशिक्षक व विद्यार्थ्यांनी केले सूत्रसंचालन पी.व्ही. पाटील यांनी व आभार डी.आर पाटील यांनी मानले.
