🟣आजरा ता. मर्यादित भव्य तबला, मृदंग वादन स्पर्धा.
( भजनी मंडळातील स्पर्धक – भाग घेणाऱ्या वादन कलाकारांसाठी दोन पारितोषिके )
🛑सत्यम मंडळाचा उद्घाटन व हळदी कुंकू सोहळा संपन्न.
🟣आजरा ता. मर्यादित भव्य तबला, मृदंग वादन स्पर्धा.
( भजनी मंडळातील स्पर्धक – भाग घेणाऱ्या वादन कलाकारांसाठी दोन पारितोषिके )
आजरा.- प्रतिनिधी.
आजरा येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या व सारथी चॅरिटेबल ट्रस्ट गडहिंग्लज वतीने आजरा तालुका मर्यादित भव्य तबला मृदंग वादन स्पर्धा उद्या दिनांक. ४ रोजी मृत्युंजय शिवाजीराव सावंत स्मृतीदायक जुनी पोस्ट गल्ली स्वामी विवेकानंद विद्यालय समोर आजरा येथे सकाळी ९ वा. संपन्न होणार आहेत.
या स्पर्धेसाठी बक्षिसे.
लहान गट.
प्रथम क्रमांक.- २०००
द्वितीय क्रमांक.- १५००
तृतीय क्रमांक.-१०००
चतुर्थ क्रमांक.- ७००
पाचवा क्रमांक.५००.
मोठा गट.
प्रथम क्रमांक.- २५००
द्वितीय क्रमांक.- २०००
तृतीय क्रमांक.- १५००
चतुर्थ क्रमांक.- १०००
पाचवा क्रमांक.- ७००
अशी लहान गट व मोठा गट क्रमशा बक्षिसे असून. स्पर्धेसाठी नियम व अटी. यामध्ये स्पर्धेसाठी पोशाख अनिवार्य वाढण्यासाठी, लहरा मशीन नसावा, आजरा तालुक्यातील सर्व भजनी मंडळातील स्पर्धक भाग घेणाऱ्या वादन कलाकारांसाठी दोन पारितोषिके देण्यात येतील.
या स्पर्धेसाठी जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग द्यावे आवाहन शिवसेना ता. प्रमुख युवराज पोवार, तसेच अमित गुरव दयानंद भोपळे, संदेश कुंभार, यांनी आवाहन केले आहे.
🛑सत्यम मंडळाचा उद्घाटन व हळदी कुंकू सोहळा संपन्न.
आजरा.- प्रतिनिधी.

भादवण येथील सत्यम कला क्रिडा व सांस्कृतिक मंडळ तेराव्या वर्षाचा गणेशोत्सवा यानिमित्त शिवकालीन प्राचिन मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे.
या प्रतिकृती साकारण्यात आलेल्या मंदिराचे उद्घाटन भादवण गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ माधुरी गाडे यांच्या हस्ते व माजी शिक्षणाधिकारी आनंदराव जोशीलकर, सेवा सोसायटी माजी चेअरमन मारुती ईश्वर देसाई गुरुजी, श्रमिक महिला पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू मुळिक गुरुजी, मार्गदर्शक शांताराम माने व केदारलिंग दूध संस्था चेअरमन रघुनाथ पोवार यांच्या हस्ते श्रीफळ अर्पण करून उद्घाटन सोहळा संपन्न झाला. यावेळी हळदी कुंकू कार्यक्रमासाठी सहकार्य केल्याबद्दल जिल्हा परिषद माजी अध्यक्ष उमेश आपटे व सौ वैशाली आपटे माजी सरपंच उत्तूर यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष प्राचार्य रणजित गाडे यांनी मंडळाच्या स्थापनेपासून आतापर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेतला . यावेळी श्री आपटे यांनी भादवणच्या प्रत्येक नागरिकाच्या तसेच मंडळाच्या पाठीशी राहण्याची ग्वाही दिली. यावेळी लोकनियुक्त सरपंच यांनी आनंदी राहा आयुष्यात आनंद विकत घेता येत नाही. त्यासाठी मनाने खंबिर होणे गरजेचे असते असे मार्गदर्शन केले.
यावेळी भादवण गावामध्ये विविध क्षेत्रांमध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या तसेच विविध पदांच्या वर निवड झालेल्या मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. हळदी – कुंकू कार्यक्रमानिमित्त भादवण मधील गायन प्रेमींनी बसवलेला गायनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यामध्ये सुभाष सुतार सर, दत्तात्रय शिवगंड, शांताराम माने, सचिन देसाई, बाळासाहेब नेसरीकर, सौ पुनम आजगेकर, प्रदीप मुळीक , अशोक दाभोळे, सागर गोरे यांनी बहारदार गाणी सादर केली यासाठी लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमासाठी केदारलिंग दूध संस्थेच्या व्हा. चेअरमन सौ सुधा जयसिंग गोडसे, संचालक बाबुराव दाभोळे, बाळासाहेब सुतार, सुरेश कांबळे, सौ आक्काताई पाटील, सेवा सोसायटी माजी व्हा चेअरमन दशरथ डोंगरे, संचालिका रत्नाबाई केसरकर, ऑल इंडिया कबड्डी पंच प्रकाश मुळीक, विजय माने, शंकर कांबळे याचबरोबर मंडळाचे सर्व पदाधिकारी, महिला सदस्य, युवक युवती व गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

