आजऱ्यात उभ्या पावसात शक्तिपीठ विरोधात मोर्चा.- बाधित शेतकरी महिलांचा डोक्यावर इरली घेऊन मोर्चात सहभाग.
आजरा – प्रतिनिधी.

आजरा येथे सोमवार दि १८ रोजी झालेला तहसील कार्यालयावर शक्तिपीठ विरोधातील मोर्चा माजी खासदार राजू शेट्टी, माजी मंत्री व आमदार सतेज पाटील, शिवसेनेचे विजय देवणे , जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे, काँग्रेस अतुल दिघे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी व शेतकऱ्यांचा मोर्चा उभ्या पावसात यशस्वी झाला.
शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने झालेला आंदोलकांना संबोधित करताना आमदार सतेज पाटील म्हणाले गरज नसलेला शक्तिपीठ रद्द करावा कारण हा रस्ता तोट्याचा आहे. हे सरकारला पटत नाही कारण सरकारने डोळ्यावर पट्टी बांधली आहे. इंग्रजांच्या विरोधात देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लढाई केली आता शेती वाचनासाठी स्वतंत्र लढा द्यावा लागत आहे. आता बाधित शेतकऱ्यांच्या कडे काही सरकारने नेमलेले सल्लागार ते वैयक्तिक येऊन शेतकऱ्यांची दिशाभूल करतील आपली शेती ही आपली एफडी आहे. शेती एकदा गेली की पुन्हा मिळणार नाही. कोणत्याही परिस्थितीत शक्तिपीठाचा लढा अखंडपणे चालू राहणार आहे. येणाऱ्या गणेशोत्सवा नंतर हा लढा अधिक तीव्र करण्यात येईल. शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये. आम्ही आपल्या पाठीशी आहोत असे बोलताना श्री पाटील म्हणाले.
तालुक्यातील नागरिक हे रडण्यासाठी आलेले नाहीत तर लढण्यासाठी आले आहेत.- मा खास. शेट्टी
यावेळी माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले शक्तिपीठ मार्ग जाणार त्या ठिकाणी तिरंगा फडकवत देश प्रेमी असल्याचे सरकार दाखवत आहे. खरंतर जगाचा पोशिंदा हा शेतकरी आहे. या देशात खऱ्या अर्थाने शेतकरी खरा देशप्रेमी आहे. अनेक वर्षापासून शेती कसं ती बागायत अशी बनवली व ती आता सरकार काढून घेत आहे. व ही बसवलेली बागायत शेती दोन्ही बाजूच्या मातीच्या भरावाने माती पावसाने वाहून जाणार आहे. या मोर्चामध्ये तालुक्यातील नागरिक हे रडण्यासाठी आलेले नाहीत तर लढण्यासाठी आले आहेत हा लढा असाच चालू राहणार आहे व हा रस्ता होऊ दिला जाणार नाही. असे माजी खासदार शेट्टी म्हणाले.
कॉम्रेड संपत देसाई स्वागत व प्रस्ताविक करताना म्हणाले की तालुक्यातील प्रस्तावित दाभिल, शेळप, पारपोली, खेडगे, आंबडे, धनगर मोळा, घाटकरवाडी व नव्याने सुचविलेल्या जेऊर, चितळे, कासारकांडगाव, भावेवडी या सह अन्य गावा मध्ये शेतकऱ्यांच्या बैठका झाल्या ग्रामस्थांचा प्रचंड विरोध आहे. शक्तीपीठ महामार्गाला तीव्र विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे. मोर्चात शेतकरी शेतकऱ्यांचा सहभाग मोठा आहे.
हा प्रश्न केवळ शेतीचा नाही. तर इथल्या पर्यावरण आणि माणसांच्या आयुष्याचा आहे. आपण गप्प बसलो तर भावी पिढी आपल्याला माफ करणार नाही म्हणून आम्ही सर्व शक्तीनिशी या लढ्यात उतरलो आहोत.

यावेळी तानाजी देसाई, संजय तरडेकर, राजेंद्र गड्यांनवर, राहुल देसाई, विद्याधर गुरबे, शिवाजी गुरव, सम्राट देसाई, अमर चव्हाण कॉम्रेड अतुल दिघे यांनी शक्तिपीठाच्या विरोधात प्रकट मत व्यक्त केले.
यावेळी गोपाळराव पाटील, उमेश आफटे, मुकुंद दादा देसाई, सत्यजित जाधव, संभाजी पाटील, अंजनाताई रेडकर, एम. जे. पाटील, प्रभाकर खांडेकर, सुभाष देसाई, युवराज पोवार,कॉम्रेड शांताराम पाटील, अल्बर्ट डिसोझा, राजेंद्र गड्यांनवर, युवराज पोवार, प्रभाकर कोरवी, रियाज समनजी, नागेश चौगुले, रवींद्र भाटले, प्रकाश मोरुस्कर, दशरथ घुरे, कॉ शांताराम पाटील, अभिषेक शिंपी, किरण कांबळे, संजय सावंत, नौशाद बुड्डेखान, विक्रम देसाई, दिनेश कांबळे, यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते व पदाधिकारी कार्यकर्ते, कार्यकर्ते शक्तिपीठ मार्गातील शेतकरी महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.