🟣सोमवारचा मोर्चा यशस्वी करण्याचा निर्धार –
शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीच्या बैठकीत निर्णय.
🟣रवळनाथ पतसंस्थेतील ध्वजारोहणाचा मान संस्थापक सभासदाला – अध्यक्ष श्री. शिंपी यांचा समाजासमोरील आदर्श कायम.
🛑 सोमवारचा मोर्चा यशस्वी करण्याचा निर्धार –
शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीच्या बैठकीत निर्णय.
आजरा – प्रतिनिधी.
आजरा येथील सोमवार दि १८ रोजी होणारा तहसील कार्यालयावर निघणारा मोर्चा यशस्वी करण्याचा निर्धार आज दि. १६ रोजी शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या बैठकीत निर्णय करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुकुंददादा देसाई होते.
गेले आठदहा दिवस वेगवेगळ्या गावात मोर्चाच्या तयारीसाठी झालेल्या बैठकांचा आढावा घेताना कॉम्रेड संपत देसाई म्हणाले की तालुक्यातील प्रस्तावित दाभिल, शेळप, पारपोली, खेडगे, आंबडे, धनगर मोळा, घाटकरवाडी आणि नव्याने सुचविलेल्या जेऊर, चितळे, कासारकांडगाव, भावेवडी या सर गावांच्या मध्ये शेतकऱ्यांच्या बैठका झाल्या आहेत.
शक्तीपीठ महामार्गाला तीव्र विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे, मोर्चात शेतकरी मोठ्या संख्येने उतरणार आहेत.
विद्याधर गुरबे म्हणाले की हा प्रश्न केवळ शेतीचा नाही तर इथल्या पर्यावरण आणि माणसांच्या आयुष्याचा आहे. आज आपण गप्प बसलो तर भावी पिढी आपल्याला माफ करणार नाही म्हणून आम्ही सर्व शक्तीनिशी या लढ्यात उतरलो आहोत.
संजय तरडेकर म्हणाले की आम्ही चंदगड मार्गावरील सर्व गावांनी विरोध करण्याचा निर्णय केला आहे, उद्याच्या मोर्चात आम्ही ताकदीने उतरणार आहोत.
मुकुंददादा देसाई म्हणाले की आम्ही महाविकास आघाडीचे सर्व घटकपक्षांना सोबत घेऊन या लढ्यात मोठ्या संख्येने उतरणार आहोत. यावेळी रियाज शमनजी, अल्बर्ट डिसोझा, राजेंद्र गड्यांनवर, अमर चव्हाण, युवराज पोवार, नागेश चौगुले यांनीही कांही सूचना मांडल्या. यावेळी रवींद्र भाटले, प्रकाश मोरुस्कर, दशरथ घुरे, कॉ शांताराम पाटील, नौशाद बुड्डेखान, विक्रम देसाई, कृष्णा सावंत, दिनेश कांबळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
🛑 रवळनाथ पतसंस्थेतील ध्वजारोहणाचा मान संस्थापक सभासदाला – अध्यक्ष श्री. शिंपी यांचा समाजासमोरील आदर्श कायम.
आजरा : प्रतिनिधी.

रवळनाथ पतसंस्थेत भारतीय स्वातंत्रदिनी होणारे ध्वजारोहण संस्थापक सभासद व सामाजिक कार्यकर्ते अहमदसाब मुराद यांच्या हस्ते करण्यात आले. दरवर्षी प्रजासत्ताकदिनी व स्वातंत्र्यदिनी होणारे ध्वजारोहण हे संस्थेचे अध्यक्ष अभिषेक शिंपी हे आपण स्वतः न करता समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ सभासद, महिला आदी व्यक्तींना ध्वजारोहणाचा मान देतात. त्याप्रमाणे यंदाही अध्यक्ष श्री. शिंपी यांनी संस्थापक सभासद मुराद यांना ध्वजारोहणाचा मान देवून आपला समाजासमोरील आदर्श कायम ठेवला आहे.
दरवर्षी संस्थेत स्वातंत्र्यदिनी व प्रजासत्ताकदिनी होणारे ध्वजारोहण विदयमान अध्यक्ष यांच्या हस्ते केले जाते. मात्र अभिषेकदादा शिंपी यांनी आपण अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर आपल्या काळात होणारे ध्वजारोहण हे आपण स्वतः न करता समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती, ज्येष्ठ सभासद, महिला आदी व्यक्तींना ध्वजारोहणाचा मान देण्याचा निर्णय घेतला व स्वातंत्रदिनी होणारया पहिल्या ध्वजारोहणाचा मान ज्येष्ठ सभासद देगा डिसोझा यांना दिला त्याचबरोबर प्रजासत्ताक दिनी होणारे ध्वजारोहणाचा मान जिल्हयातील प्रसिध्द स्त्रीरोगतज्ञ डॉ. स्मिता फर्नांडीस यांना देवून महिलांचाही सन्मान करण्यात आला. यंदाही संस्थेचे संस्थापक सभासद व संस्थेचे संस्थापक जयवंतराव शिंपी यांचे विश्वासू कार्यकर्ते मुराद यांना ध्वजारोहणाचा मान दिल्याने अध्यक्ष शिंपी यांनी सुरू केलेला पायंडा या निमित्ताने कायम राहिला आहे.
यावेळी बोलताना अध्यक्ष शिंपी म्हणाले, समाजात आपण जे ताठ मानेने आणि अभिमानाने जगतो त्यासाठी अनेक मोठ्या लोकांचे योगदान आहे. आपल्यासोबत सामाजिक काम करणारया कार्यकर्त्यांचाही सन्मान ठेवणे हे आपले नैतिक मुल्य आहे. याची जाणीव समाजाला, तरूण पिढीला कळावी या हेतून हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच संस्थेच्या विविध ठेव योजनांसह कर्ज मागणीलाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. ठेवीदारांकरिता चांगले व्याजदर दिले असल्याने ठेवीनांही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून सध्या २२ कोटी ठेवींचा टप्पा पुर्ण केला आहे. जिल्हा कार्यक्षेत्र वाढीमूळे संस्थेचा व्यवसाय वाढविणे आता सोईचे होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी दिवाकर नलवडे, देगा डिसोझा, दयानंद गजरे, राजू परीट, नितीन कारेकर, संगम गुंजाटी, हुसेन दरवाजकर, मंजुर मुजावर, अबु माणगावकर, संस्थेचे उपाध्यक्ष समीर गुंजाटी, सर्व संचालक, मॅनेजर विश्वास हरेर उपस्थित होते.