Home कोंकण - ठाणे भाजपचे पुन्हा एकदा धक्कातंत्र.- उपराष्ट्रपती पदासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या...

भाजपचे पुन्हा एकदा धक्कातंत्र.- उपराष्ट्रपती पदासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा.🟣धक्कादायक.💥बायको नांदायला येत नसल्याने बापाने चार चिमुकल्यांना विहिरीत ढकलले; स्वतःही विहिरीत उडी घेत संपवले जीवन🟣राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा.- नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन

Oplus_131072

🟣भाजपचे पुन्हा एकदा धक्कातंत्र.- उपराष्ट्रपती पदासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा.
🟣धक्कादायक.💥बायको नांदायला येत नसल्याने बापाने चार चिमुकल्यांना विहिरीत ढकलले; स्वतःही विहिरीत उडी घेत संपवले जीवन
🟣राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा.- नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन

🟣भाजपचे पुन्हा एकदा धक्कातंत्र; उपराष्ट्रपती पदासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा.

नवीदिल्ली- वृत्तसंस्था

उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांच्या राजीनाम्यानंतर भाजपकडून उपराष्ट्रपती पदासाठीची उमेदवारी कोणाला दिली जाईल, याची चर्चा देशभरात रंगली होती. अखेर भाजपने पुन्हा एकदा धक्कातंत्र देत उपराष्ट्रपदीपदासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा केली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी राधाकृष्णन हे भाजपचे उपराष्ट्रपदी पदाचे उमेदवार असतील, असे जाहीर केले. त्यामुळे, आता महाराष्ट्राच्या राज्यपालपदी कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता महाराष्ट्राला लागली आहे.

भाजपनं उपराष्ट्रपती पदासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांचं नाव निश्चित केलं आहे. सीपी राधाकृष्णन यांना एनडीएनं उमेदवारी जाहीर केली आहे. यापूर्वीचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे देखील राज्यपाल पदावरुन उपराष्ट्रपती बनले होते. सीपी राधाकृष्णन हे मूळचे तामिळनाडूचे आहेत. सीपी राधाकृष्णन हे झारखंडचे राज्यपाल देखील होते. यापूर्वी राधाकृष्णन यांनी तेलंगणाचे राज्यपाल आणि पुद्दुचेरीचे नायब राज्यपाल होते. सीपी राधाकृष्णन हे दोनवेळा लोकसभेवर निवडून आले होते, अशी माहिती जे. पी. नड्डा यांनी दिली आहे.

🟣धक्कादायक.💥बायको नांदायला येत नसल्याने बापाने चार चिमुकल्यांना विहिरीत ढकलले; स्वतःही विहिरीत उडी घेत संपवले जीवन

अहिल्यानगर – प्रतिनिधी

बायको नांदायला येत नाही म्हणून बापाने आपल्या चार अपत्यांसह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अहिल्यानगरमधील राहता तालुक्यात घडली. कोऱ्हाळे गावच्या शिवारातील एका विहिरीत पाच मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली. अरुण काळे (वय-३५ वर्ष) याने आपल्या चार मुलांसह आत्महत्या केली.

अरुण काळे हा अहिल्यानगरमधील श्रीगोंदा तालुक्यातील चिखली कोरेगाव या गावात राहायचा. त्याला तीन मुले आणि एक मुलगी होती. घरातील वादामुळे त्याची पत्नी आठ दिवसांपूर्वी त्याला सोडून गेली होती. त्यामुळे अरुण काळेने हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती पोलिसांनी दिली. अरुण काळे याने राहता तालुक्यातील कोऱ्हाळे गावच्या शिवारात हे कृत्य केलं. त्याने रस्त्याच्या बाजूला आपली टू व्हीलर लावल्याचं दिसून आलं. शिवानी अरुण काळे (वय 8 ), प्रेम अरुण काळे (वय 7), वीर अरुण काळे (वय 6) आणि कबीर अरुण काळे (वय 5) अशी मयत मुलांची नावे आहेत. या चौघांना अरुण काळेने पाण्यात ढकलून दिलं. शेवटी स्वतःही हात पाय बांधून आत्महत्या केली.

विहिरीतून तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं असून अद्याप दोघांचा शोध सुरू आहे. जवळपास 45 फूट खोल ही विहीर आहे. त्यातच पाऊस पडत असल्याने शोधकार्यात अडथळा येत आहे. एक हात आणि एक पाय दोरीने बांधलेल्या अवस्थेत विहिरीत अरुण काळेचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे स्वतःचे हात पाय स्वतः बांधून अरुण काळेने आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मृतांपैकी दोन मुलं ही अहिल्यानगरमधील आश्रमशाळेत शिकत होती. 15 ऑगस्टच्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर अरुण काळे याने त्याच्या या दोन्ही मुलांना आश्रमशाळेतून घरी आणलं. या मुलांना पत्नीच्या माहेरी घेऊन जात असताना रस्त्याच्या बाजूला असलेल्या विहिरीत अरुण काळे याने त्याच्या चारही मुलांना ढकलले. आणि नंतर आत्महत्या केली. पती-पत्नीमधील वादामुळे अख्खं कुटुंब संपल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

🟥राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा.- नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन

मुंबई :- प्रतिनिधी.

राज्यात पुन्हा एकदा पावसाने जोरदार कमबॅक केलं आहे. पुढील पाच दिवस पावसाचा जोर वाढणार आहे. विदर्भासह मध्य महाराष्ट्र व कोकणात हवामान विभागाने हाय अलर्ट दिले आहेत. मराठवाड्यात पुढील चार दिवस काही जिल्ह्यात पावसाची हजेरी राहणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने महाराष्ट्रात पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागाने वर्तवली आहे. संभाव्य पावसाचा अंदाज लक्षात घेता नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून करण्यात आले आहे.

सचेत ॲपमार्फत नागरिकांना सूचना आपत्तीपासून सतर्क राहण्यासाठी सद्यस्थितीमध्ये नागरीकांना सचेत ॲपमार्फत अलर्ट संदेश पाठविले जात आहेत. आपत्तीच्या अनुषंगाने प्रशासनातर्फे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल यांना आपत्कालीन परिस्थिती करिता सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार, राज्यात आजपासून ते 21 ऑगस्ट 2024 दरम्यान अतिवृष्टीसह वादळी वाऱ्याची शक्यता वर्तविण्यात आली असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे. ज्यामध्ये कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात काही ठिकाणी अतिवृष्टीसह अत्यंत अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली आहे.

तर मराठवाडामध्ये काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. ज्यामध्ये वीज चमकणे, गडगडाटांसह 40-50 किमी प्रति तास वादळी वारे वाहण्याची ही शक्यता वर्तवली आहे. वाशिम जिल्ह्याला सलग तिसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या पावसाच्या अंदाजानुसार आज सकाळी पुन्हा एकदा मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. परिणामी प्रशासनाने जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून आवश्यकता असेल तरच घरा बाहेर पडा, सखल भागात किंवा नदी, नाल्याकाठी असल्यास सुरक्षित ठिकाणी आसरा घेण्याच आव्हान करण्यात आलंय. रायगड जिल्ह्यातील अंबा नदीने धोका पातळी ओलांडली आहे. तसेच कुंडलीका नदी आणि रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी आणि कोदवली नदीने इशारा पातळी ओलांडली असून याबाबत नागरिकांना सूचित करण्यात आले आहे. नागरिकांनी पूरस्थिती पासून सुरक्षित राहण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत सूचना देण्यात आल्या आहेत. तर खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.