🛑स्वातंत्र्य दिनानिमित्त मडिलगे ग्रामपंचायत वतीने विविध उपक्रम..( सरपंच मानधन योग्य विनीयोग, ध्वजवंदन मान दानशूर व्यक्तीला..)
🛑”साहित्यिक श्री नवलकर यांची बांधावरची बाभळ” व प्रकाश वाटा पुस्तके माध्यमिक विद्यालय आरदाळला भेट.
🛑स्वातंत्र्य दिनानिमित्त मडिलगे ग्रामपंचायत वतीने विविध उपक्रम..( सरपंच मानधनाचा योग्य विनीयोग, ध्वजवंदन मान दानशूर व्यक्तीला..)
आजरा.- प्रतिनिधी.

ग्रामपंचायत मडिलगे यांच्या वतीने १५ ऑगस्ट २०२५ रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सरपंच बापू निऊंगरे यांच्या अध्यक्षेतेखाली गावातील दानशूर व्यक्तिमत्व व धार्मिक व सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे ग्रामस्थ महोदेव तुकाराम पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्याचा निर्णय घेऊन ध्वजवंदन करण्यात आले. यानिमित्ताने सालाबादप्रमाणे गावातील विविध क्षेत्रात नाविन्यपूर्ण यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थी व नागरिकांचा सत्कार करण्यात येतो.
यामध्ये प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थी यांचा सत्कार तसेच या वर्षी पत्रकार श्री. संभाजी जाधव यांना जि.प. कोल्हापूर यांचा उत्कृष्ठ आचार्य अत्रे पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. याचबरोबर लोकनियुक्त सरपंच श्री. बापू निऊंगरे यांच्या सरपंच वेनानातून इयत्ता पहिली ते सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांना स्वतःच्या नावाची आयडी कार्ड तसेच दहावीच्या ९०% पेक्षा अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याना प्रशस्तीपत्र व प्रत्यकी १०००/- रुपये रोख बक्षिस देण्यात आले.
चौकट
या कार्यक्रमाला ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. तसेच मागील दोन दिवस दि १३ व १४ ऑगस्ट २०२५ रोजीचे ध्वजवंदन सामाजिक कार्यकर्ते व वारकरी वारकरी सांप्रदायाचे सदस्य व्यसनमुक्तीकडे गावाची वाटचाल घेऊन जाणारे श्री. मारुती येसणे यांच्या हस्ते व पत्रकार श्री. संभाजी जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी ग्राम अधिकारी वीरेंद्र मगदूम, गावातील प्रतिष्ठित नागरिक हनुमान समूह अध्यक्ष के. व्ही. येसणे, भाविश्री समूह अध्यक्ष भिकाजी गुरव, माजी उपसभापती. दिपक देसाई, लोकमान्य समूहाचे अध्यक्ष जनार्धन निऊगरे, प्राथमिक व माध्यमिक शाळेचे मुखाय्ध्यापक सर्व शिक्षक, विविध संस्थेचे चेअरमन, संचालक, ग्रामपंचायत उपसरपंच पांडुरंग जाधव, सर्व ग्रामपंचायत सदस्य, शाळेचे विद्यार्थी, आजी – माजी सैनिक, अंगणवाडी सेविका, आरोग्य विभागाचे कर्मचारी, मदतनीस, ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते. सरपंच श्री. बापू निऊंगरे यांनी सर्वांचे आभार मानले.
🛑”साहित्यिक श्री नवलकर यांची बांधावरची बाभळ” व प्रकाश वाटा पुस्तके माध्यमिक विद्यालय आरदाळला भेट
आजरा.- प्रतिनिधी

आजरा ता. आरदाळ येथील माध्यमिक विद्यालय, आरदाळ — लेखक – साहित्यिक प्रकाश नवलकर यांनी त्यांच्या स्वलिखित ‘बांधावरची बाभळ’ व ‘प्रकाश वाटा’ ही मौल्यवान पुस्तके माध्यमिक विद्यालय आरदाळ शाळेला भेट स्वरूपात दिली. यावेळी
विद्यार्थ्यांनी ही पुस्तके वाचावीत व त्यांच्या मनात वाचनाची गोडी निर्माण व्हावी या उदात्त हेतूने ही पुस्तक भेट देण्यात आली.
या पुस्तक भेटीचा कार्यक्रम शाळेत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. सामाजिक कार्यकर्ते अमोल बांबरे यांच्या हस्ते सदर पुस्तके शाळेचे मुख्याध्यापक श्री. शरद पाटील यांनी सन्मानपूर्वक स्वीकारली. मुख्याध्यापकांनी साहित्यिक प्रकाश नवलकर यांच्या या प्रेरणादायी कृतीबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांचे आभार मानण्यात आले. यावेळी लक्ष्मण लोहार, किरण चव्हाण, रणजीत सुतार, स्वप्नाली बांबरे, चंद्रकांत गुरव, धनाजी ससाने, शेखर कांबळे सह मधुकर चोथे, सातापा कांबळे तसेच विद्यार्थी उपस्थित होते.