आजरा. प्रतिनिधी.०७.
आजरा येथे नव्याने सुरू होणारा आजरा समृद्धी प्रोड्युसर कंपनी लिमिटेड व्यवसाय अधिक गतिमान होण्यासाठी इच्छुक खातेदाराने सभासद व्हावे असे आवाहन कंपनी व्यवस्थापनाने पत्रकार परिषदेत केले आहे. छत्रपती शाहू महाराज बायोफ्युअल्स प्रा.लि.व एम.सी.एल, मुंबई वतीने आजरा तालुक्यात सुमारे एक लक्ष किग्रँ. दररोज निर्मिती क्षमतेच्या बायो सीएनजी ( Bio-CNG) प्रकल्पाची सुरुवात होत आहे आजरा तालुक्यात सर्वांगीण करण्याच्या दृष्टीकोनातून सदर प्रकल्पाची सुरुवात होत आहे. आजरा तालुक्यातील स्वच्छ इंधन कॅन्सरमुक्त, केमिकलयुक्त, सेंद्रिय शेती या दोन क्षेत्राचा विकास या प्रकल्पाद्वारे या कंपनीला करायचा आहे. सदर प्रकल्पामुळे संपूर्ण तालुक्यात इंजिनामध्ये स्वयंपूर्ण करणारा हा प्रकल्प असून यामध्ये वाहतुकीचे इंडियन पेट्रोल डिझेल खनिज सीएनजी याला १००% पर्याय आहे. स्वयंपाकासाठी इंधन एलपीजी ला १००% पर्याय व औद्योगिक क्षेत्रातील डिझेल यांना १००% पर्याय लागणाऱ्या आंतरराष्ट्रीय गुणवत्तेच्या इंधनाची निर्मिती होणार आहे. या स्वच्छ इंधनामुळे आपला आजरा तालुका प्रदूषण मुक्त होण्यासाठी मदत होणार आहे. इंधन निर्मिती साठी लागणारा कच्चामाल शेतातच निर्माण होणार असून कर्जमुक्त असा करार शेती वतीने शेतकऱ्यांसाठी शाश्वत व चांगले उत्पन्न देऊन आजरा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी ही कंपनी कार्य करणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत दोन हजार हेक्टर ते दहा हजार हेक्टरपर्यंत करार शेती करणे शक्य होणार आहे.
अलीकडे नोकरीसाठी स्थलांतर करावे लागत आहे. तर आजच्या तरुण पिढीला या कंपनीच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबामध्ये शाश्वत व कायमचे असे उत्पन्न मिळविण्याचे साधन या कंपनीतून निर्माण होणार आहे. यासाठी प्रत्येक गावातील तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मजुराच्या कामगारांच्या पदवीधारक तरुणांच्या विकासासाठी संघटित होण्याची गरज आहे. तालुक्याच्या विकासासाठी कोणत्याही बाहेरच्या कंपनीचा संस्थेची वाट न पाहता आपणच जबाबदारी उचलावी व या कंपनीच्या माध्यमातून मासिक वेतनाची जबाबदारी निर्माण करावी यासाठी हा प्रोजेक्ट अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सदर पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली.
या व्यवसायाचे प्रमुख वैशिष्ट्ये. अधिक माहिती-
सदर कंपनीमध्ये सभासद होण्यासाठी रक्कम फक्त पाचशे रुपये आहे
【नवनिर्मिती नैसर्गिक वायू चे उपयोग, शेतकरी उत्पादक संघटना, एम.सी. एल. ची शेतकरी उत्पादक संघटना प्रती भूमिका आणि जबाबदारी, कुटुंबातील सदस्यांसाठी संभाव्य उत्पन्न, सभासद संघटनेच्या सदस्यांना होणारे फायदे, तालुक्यातील जैव इंधन प्रकल्पाच्या वार्षिक नफ्यातून २०% सीएसआर फंड तालुक्याच्या विकासासाठी, समुदायाचा विकास याबाबत शेतकरी उत्पादक संघटनेत सहभागी होण्याकरिता विस्तृत माहिती संबंधित कार्यालयात येऊन इच्छुकांनी घेऊन सभासद व्हावे व या प्रकल्पात सहभागी व्हावे.】
यावेळी कार्यकारी संचालक बाळासाहेब वाघमारे संचालक सुरेश दळवी, शैलेश मुळीक , समीर देशपांडे,सह सर्व संचालक, व्यवस्थापन कर्मचारी उपस्थित होते. आभार संचालक श्री मुळीक यांनी मानले.