Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रचंदगड नगरपंचायतला आम. राजेश पाटील यांनी ५ कोटीचा विकासकामाचा लावला निधी.

चंदगड नगरपंचायतला आम. राजेश पाटील यांनी ५ कोटीचा विकासकामाचा लावला निधी.

चंदगड. प्रतिनिधी. ०७

चंदगड येथील नगरपंचायत साठी ५ कोटी मंजूर करून आणल्याबद्दल आमदार राजेश पाटील यांचे चंदगड वासियांतर्फे मन:पूर्वक आभार मानले जात आहेत. नगरपंचायतच्या सुरुवातीला ३ मार्च २०२१ रोजी नगरपंचायतीद्वारे विविध ३.४८ कोटीं च्या विकास कामांना मंजुरी दिली आहे.
त्यातील बरीच कामे सुरु झाली आहेत.
तसेच ७ मे २०२१ रोजी आमदार राजेश पाटील, दयानंद काणेकर तसेच नगराध्यक्ष प्राची काणेकर,नगरसेवक यांच्या प्रयत्नातून विविध विकासकामांसाठी ५ कोटी मंजूर झाले.
याचधर्तीवर वैशिट्यपूर्ण योजनेतून अजून १५ कोटी ची विकास कामे आमदार श्री. पाटील यांना मागणी वजा सुचवली होती.
यातील पहिल्या टप्प्यात ५ कोटी दि.०६ रोजी मंजूर झाले आहेत.
त्याबद्दल आमदार पाटील तसेच महाविकास आघाडी चे मनपूर्वक आभार चंदगड वासीय मानत आहेत. पहिल्या २ वर्षात आम्ही अंदाजे १५ कोटी ची विकासकामं सुरुवात करत आहोत आम्ही आमच्या कार्यकाळात जास्तीत जास्त विकास कामे पूर्ण करण्यावर महाविकास आघाडीचा भर असेल याबद्दल नगराध्यक्ष प्राची काणेकर यांनी आभार व्यक्त केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.