आर्दाळ येथील वृद्ध निराधार गंगाराम कांबळेंना मदतीचा ओघ सुरू.
उत्तुर – प्रतिनिधी.
आरदाळ येथील ८० वर्षाचे गंगाराम कांबळे यांच्या घराचे छप्पर पावसाने कोसळले. ओल्या, धोकादायक घरात ते राहत होते. गंगाराम कांबळे यांची बातमी वृत्तपत्र व सोशल मीडियात आली व प्रशासन समजले.
त्यांच्या राहण्याची सोय ग्रामसेवक, तलाठी व सरपंच या सर्वांनी मिळून समाज मंदिरात केली.
अवघ्या आठ ते दहा दिवसात मदतीचा ओघ सुरू झाला. तहसीलदार यांच्यापासून सर्वांनी त्यांची काळजी घेतली. उत्तुर येथील हेल्पिंग हँड फाउंडेशन यांनी छताची जबाबदारी घेतली. जमिनीवर भर टाकून ऒल कमी करण्यासाठी भर टाकण्याची जबाबदारी आम्ही आरदाळकर ग्रुपने घेतली तर शंभर रुपयात समाजसेवा या उत्तूर परिसरातील ग्रुपने फरशी बसवण्याची जबाबदारी घेतली आहे.
गंगारामच्या वयाचा विचार करून विघ्नहर्ता सोशल फाउंडेशन यांनी त्यांना चटई, ब्लॅंकेट, स्वेटर यासह काही वस्तू भेट दिल्या आहेत. माणुसकी अजूनही शिल्लक आहे या भावनेतून मदत देणाऱ्यांची गंगाराम कांबळे यांनी भाऊक होत हात जोडून आभार मानले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते शिवाजी गुरव व अमोल बांबरे यांनी देखील मीडियाचे आभार मानले.
