Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रश्री. रवळनाथ' ने दिला कालेकर कुटुंबाला मदतीचा हात.( पेरणोली येथील कुटुंब :...

श्री. रवळनाथ’ ने दिला कालेकर कुटुंबाला मदतीचा हात.( पेरणोली येथील कुटुंब : १५ हजार रुपयांची तातडीची मदत.

‘श्री. रवळनाथ’ ने दिला कालेकर कुटुंबाला मदतीचा हात.
( पेरणोली येथील कुटुंब : १५ हजार रुपयांची तातडीची मदत.)

आजरा : – प्रतिनिधी.

पेरणोली (ता. आजरा) येथील मच्छिद्र नारायण कालेकर यांचे आकस्मिक निधन झाले. त्यामुळे आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची असणाऱ्या कालेकर कुटुंबियांसमोर कुटुंबप्रमुखाच्या निधनाने मोठी आर्थिक समस्या देखील निर्माण झाली. या संदर्भातील माहिती घेऊन श्री रवळनाथ को-ऑप. हौसिंग फायनान्स सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने कालेकर कुटुंबियांची चौकशी केली आणि रु. १५ हजारांची आर्थिक मदत दिली. श्री रवळनाथ हौसिंग फायनान्स सोसायटीचे बॅण्ड अॅम्बेसिडर माजी राजदूत व विदेश मंत्रालयाचे माजी सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्या चांगुलपणाची चळवळ या उपक्रमातंर्गत रवळनाथतर्फे ही मदत देण्यात आली.

मच्छिद्र कालेकर हे भुमिहीन शेतकरी असल्यामुळे गावी शेतमजुरी आणि पशूपालन करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. झोपडीवजा घरात राहणारा त्यांचा आई, पत्नी, मुलगा व विवाहीत मुलगी असा परिवार आहे. गेल्या दोन महिन्यापासून ते आजारी होते त्यांच्या वैद्यकीय उपचारासाठी घरातील पशूधनाची देखील कुटुंबियांना विक्री करावी लागली. त्यामुळे कालेकर कुटुंबिय सर्वबाजुंनी आर्थिक संकटात सापडले आहे.

रवळनाथमार्फत नेहमीच समाजातील अपघातग्रस्त, जळीतग्रस्त, गरीब आणि संकटांत सापडलेल्या दुर्बल घटकांसाठी सहकार्य केले जाते. अशा प्रसंगी माणुसकीच्या नात्याने हतबल होणाऱ्या बांधवांना धीर देण्याचे काम नेहमीच रवळनाथकडून केले जाते. रवळनाथच्या या मदतीबद्दल कालेकर कुटुंबियांनी तसेच ग्रामस्थांनी कृतज्ञता व्यक्त केली. रवळनाथचे संचालक प्राचार्य डॉ. आर. एस निळपणकर यांनी देखील वैयक्तिक रु. ११ हजारांची आर्थिक मदत दिली.

याप्रसंगी संचालक प्रा. व्ही. के. मायदेव, सीईओ डी. के. मायदेव, यांच्यासह पेरणोलीच्या सरपंच सौ. प्रियांका जाधव, माजी सभापती श्री. उदयराज पवार, श्री. वसंत तारळेकर, टी. एस. गडकरी, ग्रा. पं. सदस्या सुनिता कालेकर, रणजीत कालेकर व कालेकर कुटुंबीय, ग्रामस्थ उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.