🟥पुण्यात गुन्हेगारांचा होणार बंदोबस्त.- पुण्यात नवीन ५ पोलीस ठाणे – १००० पोलीसांचा स्टाफ मंजूर् होणार.- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
पुणे :- प्रतिनिधी
पुण्यात वाढत चाललेल्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. पुण्यात नवीन ५ पोलीस ठाणे देऊ आणि १००० लोकांचा स्टाफ मंजूर करण्यात येईल, पुण्याला २ पोलिस उपायुक्त यांची मागणी मान्य करणार आहोत, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत विविध प्रकल्पांचे उदघाटन आणि भूमिपूजन करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी महत्त्वाची घोषणा केली. एमएसव्ही म्हणजे एक छोटं पोलीस आयुक्तालय म्हणून काम करतील. पाच पोलीस ठाणे एकाचे उद्घाटन आणि ४ चे भूमिपूजन केलं. पुण्याने ७ पोलीस ठाणे मागितले एका झटक्यात आम्ही पोलीस ठाणे मंजूर केलं आणि ८०० जणांचा स्टाफ मंजूर केला. पुण्याचं काही आलं तर मी आणि अजितदादा हो म्हणतो, मी घोषणा करतो की, अजून नवीन ५ पोलीस ठाणे पुण्याला देऊ आणि १००० लोकांचा स्टाफ मंजूर करू, पुण्याला २ पोलिस उपायुक्त यांची मागणी मान्य करणार आहोत, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
१० वर्षांपूर्वी ऑगस्ट २०१५ मध्ये पुण्यातील सीसीटीव्ही पहिला फेज सुरू केला. देशातील सर्वात आधुनिक सी सी टिव्ही प्रणालीचे उद्घाटन पुण्यात होतं आहे. अत्याधुनिक कॅमेरा, नाइट व्हिजन कॅमेरा आहेत. कायदा आणि सुव्यवस्था, गुन्हेगारांचे ट्रॅकिंग, ट्रॅफिकचे नियोजन या प्रणालीमधून करण्यात येतील. एखादा व्यक्ती करून पसार झाला तर त्याला तात्काळ पकडण्यात येईल. ‘बच के रहना रे, तुझं पे नजर है’, हे गाणं मला आठवलं. अनेक ब्लॅक स्पॉट आहेत. तिथे पोलिसिंग करणे सोपं नाही, त्यातील पहिलं बोपदेव घाट याचं काम झालं आहे. पुढील २ महिन्यात इतर टेकड्यांवरचे काम पूर्ण होईल’ असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं.
